अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लास वेगास येथील हॉटेलच्या बाहेर बुधवारी सायबर ट्रकचा स्फोट झाल्याची घटना घडली. फटाके वाहून नेत असताना टेस्ला सायबर ट्रकला आग लागली आणि त्याचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली होती. या घटनेला अनेकांनी दहशतवादाशी जोडण्याचा प्रयत्न केला, तर अनेकांचा असा दावा होता की, ट्रकचालकाचे ट्रम्प यांच्याशी वैर होते. परंतु, एफबीआयने स्पष्ट केले की, त्याचे कोणतेही वैर नसून तो पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी)ने ग्रस्त होता. अधिकाऱ्यांनी न्यू ऑर्लीन्समधील प्राणघातक ट्रक हल्ल्यावरही भर दिला, ज्यामध्ये नवीन वर्षाच्या दिवशी १४ जणांचा मृत्यू झाला होता आणि स्पष्ट केले की, लास वेगासमधील स्फोटाशी या घटनेचा काहीही संबंध नाही. एफबीआयची ही माहिती समोर येताच पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणजे काय, हा प्रश्न उपस्थित होतो. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

नेमकं प्रकरण काय?

अमेरिकेतील लास वेगास येथील डोनाल्ड यांच्या हॉटेल बाहेर टेस्ला कंपनीच्या सायबर ट्रकचा स्फोट झाला, ज्यात एकाचा मृत्यू तर सात जण जखमी झाले. न्यू ऑर्लिन्समध्ये एका विकृत व्यक्तीने गर्दीत भरधाव ट्रक घातल्याने अनेकांचा मृत्यू झाला, त्यानंतरच ही घटना घडली; त्यामुळे या दोन्ही घटनांचा संबंध असल्याचा आणि हा दहशतवादी हल्ला असल्याचा दावा केला जात होता. परंतु, यावर एफबीआयने स्पष्टीकरण दिले. “या दोन घटनांचा संबंध असल्याचा कोणताही पुरावा नाही,” असे लास वेगास एफबीआय एजंट स्पेन्सर इव्हान्स यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले आणि अधिकाऱ्यांनी घटनेची नवीन माहिती दिली. “लष्कराच्या माहितीवरून असे स्पष्ट होते की, तो कदाचित पीटीएसडीने ग्रस्त होता आणि आम्हाला हेदेखील माहीत आहे की, त्यासाठी त्याच्या स्वतःच्या जीवनातील कौटुंबिक समस्या किंवा इतर वैयक्तिक गोष्टी कारणीभूत असू शकतात,” असे इव्हान्स म्हणाले. ट्रकमध्ये असणाऱ्या लिव्हल्सबर्गरच्या फोनवरून अनेक गोष्टी उघडकीस आल्या, ज्यातील काही नोट्समध्ये त्याने पीटीएसडीचा त्रास असल्याचे नमूद केले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

watermelon vendor and his colleague were seriously injured in Koyta gang attack in kalyan east
Delhi Crime : धक्कादायक! बसच्या सीटवर अन्न सांडल्याने वाद; ड्रायव्हरने तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घुसवला, तरुणाचा मृत्यू
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
insurance policy latest news
विमा कवच घेताय…मग हे महत्त्वाचे!
truck vandalism by bikers in pune
दुचाकी नीट चालव म्हटल्याने ट्रकची तोडफोड
Nitin Kamath On Donald Trump Tariff Wars
Nitin Kamath : “असं वाटतंय की आपण सगळे अमेरिका साम्राज्याचे भाग आहोत”, नितीन कामथ यांची ट्रम्प यांच्या ‘टेरिफ’ धोरणांवर टीका
Donald Trump
ISIS च्या तळांवर अमेरिकेचं एअर स्ट्राइक, दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर ट्रम्प यांची पोस्ट, “आता तुमच्यापैकी प्रत्येकाला….”
Accident
Accident : दाट धुक्याने घात केला! १२ प्रवासी असलेली क्रूझर कार कोसळळी कालव्यात; १० जण बेपत्ता
Plane Crashes In Philadelphia
US Plane Crash : अमेरिकेत भीषण विमान अपघात; टेकऑफनंतर ३० सेकंदातच विमान कोसळलं, अनेक घरांना लागली आग

हेही वाचा : अफगाणिस्तानच्या ‘चिकन नेक’वर पाकिस्तानचा ताबा? काय आहे वाखान कॉरिडॉर?

पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर किंवा पीटीएसडी म्हणजे काय?

पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर ही एक मानसिक आरोग्य स्थिती आहे, जी एखाद्या क्लेशकारक घटनेनंतर विकसित होऊ शकते. पीटीएसडी असलेल्या लोकांमध्ये घटनेशी संबंधित तीव्र, त्रासदायक विचार असतात आणि त्यांना सतत या गोष्टी आठवू शकतात आणि याची स्वप्ने येऊ शकतात. एखाद्या गोष्टीची भीती किंवा धक्का हा आघातांचा नैसर्गिक प्रतिसाद असतो आणि बहुतेक लोक यातून वेळोवेळी बरे होतात. जर चिंता आणि इतर नकारात्मक भावना कायम राहिल्या तर पीटीएसडीचे निदान होऊ शकते. पीटीएसडीमुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक वर्षांसाठी व्यत्यय येऊ शकतो, परंतु यावरील उपचार त्यांना बरे होण्यास मदत करू शकतात.

पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर ही एक मानसिक आरोग्य स्थिती आहे, जी एखाद्या क्लेशकारक घटनेनंतर विकसित होऊ शकते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

क्लेशकारक घटना कोणत्या?

क्लेशकारक घटनांमध्ये अपघात, युद्धे, गुन्हे, आग, एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू, गैरवर्तन किंवा भीती निर्माण करणारी कोणतीही घटना यांचा समावेश होतो. धोका संपला तरीही विचार आणि आठवणी पुन्हा उद्भवू शकतात.

  • कॉम्प्लेक्स पीटीएसडी : वारंवार झालेल्या आघातानंतर, विशेषतः बालपणात ही स्थिती विकसित होऊ शकते.
  • डिसोसिएटिव्ह पीटीएसडी (डी-पीटीएसडी) : डी-पीटीएसडी असणाऱ्या लोकांना वेगळेपणाची लक्षणे दिसू शकतात, जसे की त्यांना सभोवतालचे जग वास्तविक नाही असे वाटू शकते.
  • बर्थ ट्रॉमा : बाळाच्या जन्माच्या अत्यंत क्लेशकारक अनुभवानंतर ही स्थिती विकसित होऊ शकते.

प्रौढांमधील पीटीएसडीची लक्षणे

लक्षणे सामान्यतः तीन महिन्यांच्या आत सुरू होतात. मृत्यू किंवा वैयक्तिक मृत्यूची धमकी, गंभीर दुखापत किंवा लैंगिक हिंसा, एखाद्या प्रिय व्यक्तीशी किंवा व्यावसायिक कर्तव्यादरम्यान आलेल्या अनुभवानंतर यांचे निदान होऊ शकते. सामान्य लक्षणांमध्ये फ्लॅशबॅक आणि घटना पुन्हा घडत असल्याची खळबळजनक भावना, भीतीदायक विचार यांचा समावेश होतो. त्यासह प्रसंगाची आठवण करून देणारी परिस्थिती टाळणे, व्यक्तीमध्ये अपराधीपणाची आणि दोषाची भावना, इतरांपासून अलिप्त वाटणे, जीवनात रस कमी होणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे, मानसिक आरोग्याच्या समस्या, जसे की नैराश्य यांसारखी लक्षणे दिसून येतात.

पीटीएसडीची शारीरिक लक्षणे

लोकांमध्ये पीटीएसडीची शारीरिक लक्षणेदेखील असू शकतात. जसे की, घाम येणे, थरथरणे, डोकेदुखी, पोटाच्या समस्या, चक्कर येणे, वेदना होणे आणि छातीत दुखणे. त्यासह झोपेचा त्रास होऊ शकतो; ज्यामुळे थकवा आणि इतर समस्या उद्भवू शकतात. एखाद्या व्यक्तीला दीर्घकालीन वर्तनात्मक बदलांचा अनुभव येऊ शकतो; ज्यामुळे कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होतात आणि त्यांच्या नातेसंबंधात बिघाड होतो. ते अल्कोहोल, ड्रग्स किंवा इतर व्यसनाच्या आहारी जाऊ शकतात.

हेही वाचा : चीनच्या कुरापती सुरूच; लडाखमधील भाग गिळंकृत करण्याचा प्रयत्न, नेमके प्रकरण काय?

पीटीएसडीची कारणे आणि जोखीम घटक

कोणत्याही क्लेशकारक घटनेनंतर पीटीएसडी विकसित होऊ शकतो. भीती, धक्का, भय किंवा असहायता निर्माण करणारी कोणतीही परिस्थिती पीटीएसडीसाठी कारणीभूत ठरू शकते. जसे की:

  • लष्करी सेवा
  • नैसर्गिक आपत्ती
  • गंभीर अपघात
  • दहशतवादी हल्ले
  • एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावणे
  • बलात्कार किंवा इतर प्रकारचे अत्याचार
  • वैयक्तिक हल्ला

Story img Loader