मंगल हनवते

ठाण्यावरून बोरिवलीला जाण्यासाठी आज सव्वा ते दीड तास लागतो. वर्दळीच्या वेळी दोन तासही लागतात. या पार्श्वभूमीवर प्रवासी-वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी आणि हे अंतर केवळ २० मिनिटांत पार करता यावे यासाठी एमएसआरडीसीने ठाणे-बोरिवली भूमिगत मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. आता या प्रकल्पाच्या कामासाठी निविदा काढण्यात आल्या असून पावसाळ्यात कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या भूमिगत मार्गामुळे मुंबईकर आणि ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा प्रकल्प नेमका कसा आहे आणि हा कधी पूर्ण होणार याबाबत घेतलेला हा आढावा…

The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
BJP Ghar Chalo , Ghar Chalo, BJP target members booth ,
पुणे : भाजपचे ५ जानेवारीला ‘घर चलो’, प्रत्येक बूथवर २०० सदस्यनोंदणीचे उद्दिष्ट
The murder of a minor girl will be tried in a fast track court thane news
अल्पवयीन मुलीचे हत्याप्रकरण जलदगती न्यायालयात चालणार

वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी विविध पर्याय पुढे?

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून विविध पायाभूत सुविधा प्रकल्प राबविले जात आहेत. हे प्रकल्प राबविताना वाहतूक व्यवस्थेचे विविध पर्यायही पुढे येत आहेत. त्यातूनच मेट्रो, मोनो, सागरी सेतू, सागरी मार्ग, जोडरस्ता, उन्नत मार्ग असे पर्याय आज पुढे आले आहेत. त्यात आता भूमिगत/भुयारी मार्गाचीही भर पडली आहे. एमएमआरडीएतर्फे ऑरेंज गेट ते नरिमन पॉइंट असा एक भूमिगत मार्ग बांधण्यात येणार आहे. तसेच एमएमआरडीए ठाणे – बोरिवली भूमिगत मार्गही बांधणार आहे.

मूळ प्रकल्प ‘एमएसआरडीसी’चा?

ठाण्याहून बोरिवलीला रस्तेमार्गे जाण्यासाठी सध्या बराच वेळ लागतो. वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन एमएसआरडीसीने ठाणे- बोरिवली भूमिगत मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. काही कारणांमुळे हा प्रकल्प २०२१ पर्यंत मार्गी लावणे एमएसआरडीसीला शक्य झाले नाही. मात्र या प्रकल्पाची आवश्यकता लक्षात घेऊन राज्य सरकारने अखेर हा प्रकल्प २०२१ मध्ये एमएमआरडीएकडे वर्ग केला. सरकारच्या निर्णयानुसार आज एमएसआरडीसीचा मूळ प्रकल्प एमएमआरडीए मार्गी लावत आहे.

विश्लेषण: रखडलेल्या गृहप्रकल्पांना वाली कोण?

कसा असेल भुयारी मार्ग?

ठाणे-बोरिवली भूमिगत मार्ग ११.८ किमी लांबीचा असून या भूमिगत मार्गात १०.२५ किमी लांबीचे दोन बोगदे आहेत. हे दोन्ही बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहेत. तर हा मार्ग सहा मार्गिकेचा (येण्यासाठी तीन-जाण्यासाठी तीन) असणार आहे. या प्रकल्पासाठी ११,२३५.४३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ भुयारी मार्गिकेप्रमाणेच या प्रकल्पाच्या भुयारीकरणासाठी टीबीएम (टनेल बोअरिंग मशीन) यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

प्रकल्पाची सद्य:स्थिती काय? मार्ग कधी पूर्ण होणार?

एमएसआरडीसीकडून ताब्यात आलेला प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएने कामाला सुरुवात केली आहे. एमएसआरडीसीच्या आराखड्यात काही बदल करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. नव्याने आराखडा तयार केल्यानंतर त्याला मंजूर घेण्यास काही काळ गेला; पण आता सुधारित आराखडा मंजूर झाला आहे. त्यामुळे आता प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार बांधकामासाठी नुकतीच निविदा जारी करण्यात आली आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून पावसाळ्यात कामाला सुरुवात करण्यात येण्याची शक्यता आहे.

विश्लेषण: खेळणी जप्त का केली जात आहेत?

ठाणे-बोरिवली अंतर २० मिनिटांत पार करण्यासाठी आणखी पाच वर्षे वाट पाहावी लागणार?

ठाणे-बोरिवली भूमिगत मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. ही दिलासादायक बाब आहे. मात्र ठाणे-बोरिवली दरम्यानचे अंतर भूमिगत मार्गे २० मिनिटांत पार करण्यासाठी प्रवाशांना आणखी पाच वर्षे वाट पाहावी लागणार आहे.

Story img Loader