काही महिन्यांपूर्वी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. ट्रम्प इराणचे लक्ष्य असल्याचे वारंवार बोलले जात होते. मात्र, आता एफबीआयने याची पुष्टी केली आहे की, इराणने निवडणुकीच्या काळात ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला होता, जो एफबीआयने उधळून लावला. फरहाद शकेरीवर इराणी रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC)च्या मदतीने हत्येचा कट रचण्यात आल्याचा आरोप आहे. जोनाथन लोडहोल्ट व कार्लिस्ले रिवेरा या आणखी दोन लोकांना न्यूयॉर्कमध्ये अटक करण्यात आली आणि शुक्रवारी त्यांच्यावर हत्येचे आरोप ठेवण्यात आले. या दोन अमेरिकन नागरिकांवर दुसऱ्या इराणी-अमेरिकन नागरिकावर पाळत ठेवण्यासाठी इराण सरकारला मदत केल्याचा आरोप आहे. नेमके हे प्रकरण काय? इराणने हा कट का रचला होता? कोण आहे फरहाद शकेरी? त्याविषयी जाणून घेऊ.

कोण आहे फरहाद शकेरी?

शकेरी तेहरानमध्ये राहणारा अफगाण नागरिक आहे. शकेरी लहानपणी अमेरिकेत स्थलांतरित झाल्यानंतरच गुन्हेगारी कृत्यांमध्ये गुंतला होता. तो १९९४ मध्ये चोरीच्या गुन्ह्यात दोषी आढळला आणि न्यूयॉर्कमधील राज्य कारागृहात त्याला १४ वर्षांची शिक्षा झाली. २००५ मध्ये शकेरीला बीकन सुविधेमध्ये स्थानांतरित करण्यात आले, जिथे त्याची भेट कार्लिस्ले रिवेरालाबरोबर झाली. न्यूयॉर्क डिपार्टमेंट ऑफ करेक्शन्सच्या माहितीनुसार, त्याच्या पॅरोल पर्यवेक्षणाची मुदत २०१५ मध्ये संपली. २००८ मध्ये हद्दपार होईपर्यंत तो युनायटेड स्टेट्समध्ये राहिला. परंतु, आरोपपत्रात नमूद केल्यानुसार, शकेरीला २०१९ मध्ये ९२ किलो हेरॉईनसह श्रीलंकेत अटक करण्यात आली होती. तुरुंगात असताना शकेरीचे इराण रिव्होल्युशनरी गार्ड्सशी असलेले संबंध अधिक घट्ट झाले. अफगाणिस्तानमध्ये असे मानले जाते की, तो इराण सरकारमध्ये सामील आहे.

women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Donald Trump
विश्लेषण: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची जागतिक समुदायाला धास्ती का वाटते? शांतता, पर्यावरण, आर्थिक मदतीचे मुद्दे बासनात?
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा : कॅनडात शिक्षणासाठी जाणे कठीण, फास्ट ट्रॅक व्हिसावर घातली बंदी; याचा भारतीय विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार?

हत्येच्या प्रयत्नात त्याचा सहभाग कसा?

सप्टेंबर २०२४ मध्ये मॅनहॅटन फेडरल कोर्टात दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीनुसार, शकेरीला इराणच्या नेतृत्वाने डोनाल्ड ट्रम्पबाबत हेरगिरी करण्यासाठी आणि अखेरीस त्यांची हत्या करण्यासाठी नियुक्त केले होते. हा कट रचण्यासाठी अनेक गुप्त बैठका झाल्या. तक्रारीत शकेरीने दिलेल्या माहितीनुसार, ही योजना अमलात आणणे महागात पडेल, असे ऑपरेटरकडून सांगण्यात आले होते. निवडणुकीच्या काळात ट्रम्प यांची हत्या करणे सोपे होईल, असे चर्चेत अनेकांचे मत पडले. त्यामुळे ही योजना अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीपर्यंत पुढे ढकलण्यात आली. शकेरी याने तुरुंगात असताना त्याचा सहकारी ब्रुकलिन येथील रहिवासी कार्लिस्ले रिवेरा आणि स्टेटन आयलँड येथील रहिवासी जोनाथन लोडहोल्ट यांची भेट घेतली.

फरहाद शकेरीवर इराणी रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC)च्या मदतीने हत्येचा कट रचण्यात आल्याचा आरोप आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

ट्रम्प यांच्यासह ब्रुकलिनमध्ये राहणारे मानवाधिकार वकील मसिह अलिनजाद यांना ठार मारण्याचा या तिघांचा कट मोठ्या इराणी प्रयत्नांचा एक भाग होता. सरकारी वकिलांचा दावा आहे की, आयआरजीसी अधिकाऱ्यांनी शकेरी याला श्रीलंकेत इस्त्रायली पर्यटकांना लक्ष्य करणाऱ्या सामूहिक गोळीबारात मदत करण्यासही सांगितले होते. शकेरी पुढे म्हणाला की, न्यूयॉर्क शहरात राहणारे ज्यू व्यापारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन लोकांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि त्यांना ठार मारण्यासाठीही त्यांना नेमण्यात आले होते.

ट्रम्प यांना लक्ष्य करण्याचे कारण काय?

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात हत्येचा कट हा त्यांच्या इराणबद्दलच्या प्रतिकूल धोरणामुळे उद्भवला आहे. ट्रम्प यांच्या प्रचंड आर्थिक निर्बंधांमुळे आणि इराणबरोबरचा ऐतिहासिक अणुकरार सोडून दिल्याने इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. २०२० मध्ये जेव्हा ट्रम्प यांनी इराणी जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येला मान्यता दिली, तेव्हा अमेरिका आणि इराणमधील तणाव आणखीनच वाढला. सुलेमानी यांच्या हत्येपासून ट्रम्प यांना लक्ष्य करण्यात आले आहे. शकेरी, लोडहोल्ट व रिवेरा यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप सिद्ध होणे, हा अमेरिकी अधिकाऱ्यांच्या मोठ्या मोहिमेचा भाग आहे. तक्रारीत ट्रम्प यांच्या कटाव्यतिरिक्त मसिह अलिनजादला मारण्याच्या प्रयत्नाचीही माहिती आहे. ब्रुकलिन येथील अलिनजाद महिलांच्या हक्कांचे मुख्य समर्थक आहेत आणि त्यांनी अनेकदा इराणी हुकूमशाहीच्या जाचक पद्धतींचा निषेध केला आहे.

हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?

फिर्यादींनी फेब्रुवारीमध्ये दावा केला होता की, कनेक्टिकटमधील फेअरफिल्ड युनिव्हर्सिटीमध्ये एका मेळाव्यादरम्यान कार्यकर्त्यावर लक्ष ठेवण्यासाठी शकेरीने रिवेरा व लोडहोल्ट यांना सुमारे १,००० डॉलर्स दिले होते. न्यायालयाच्या नोंदीनुसार, पाळत ठेवण्याचे काम सुरू असताना दोघांनी मार्चमध्ये कार्यकर्त्याच्या ब्रुकलिनमधील घरी अनेक फेऱ्या मारल्या. शकेरीने दावा केला की, त्याला पत्रकारांना मारण्यासाठी ‘आयआरजीसी’ने कामावर नियुक्त केले होते आणि एप्रिलमध्ये काम पूर्ण करण्यासाठी रिवेरा व लोडहोल्ट यांना १,००,००० डॉलर्स देण्याचे वचन देण्यात आले होते.

Story img Loader