पॅलेस्टाईनमधील सत्ताधारी हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये मागच्या काही वर्षांत अनेकवेळा संघर्ष झाला आहे. मात्र, यावेळी हमासने जमीन, पाणी आणि हवेतून अशा तीनही बाजूंनी इस्रायलवर हल्ला केला असून आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला असल्याचे याचे वर्णन केले जाते. या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा इस्रायल – पॅलेस्टाईन युद्धाला तोंड फुटले आहे. शनिवारी (दि. ७ ऑक्टोबर) हमासने मध्यरात्री केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आले. दोन्ही देशांतील एक हजारांहून अधिक लोकांनी युद्धामुळे आतापर्यंत जीव गमावला आहे. रविवारी (८ ऑक्टोबर) इस्रायलने गाझा पट्टीत हवाई हल्ले केल्यामुळे पॅलेस्टाईनला मागच्या १५ वर्षांतील सर्वात मोठ्या हल्ल्याला सामोरे जावे लागले. गाझा पट्टीतील ३०० पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वीही पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये अभूतपूर्व असा संघर्ष झाला होता, ज्याला पॅलेस्टाईनने ‘इंतिफादा’ असे नाव दिले होते. याआधी पॅलेस्टाईनकडून दोन वेळा इंतिफादा पुकारून इस्रायलविरोधात हिंसक कारवाया केल्या होत्या. त्यानंतर आता जो संघर्ष सुरू आहे, तो तिसरा इंतिफादा आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यानिमित्ताने इंतिफादा म्हणजे काय? याआधी दोन वेळा इंतिफादा पुकारला, त्यावेळी काय झाले? याचा घेतलेला हा आढावा ….

Israeli troops 100 hamas militant arrested
इस्रायलकडून हमासच्या १०० दहशतवाद्यांना अटक
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Israel attack 22 killed
इस्रायलच्या हल्ल्यात २२ जण ठार
turkistan surgical strike on iraq
विश्लेषण: तुर्कस्तानकडून इराक, सीरियावर ‘सर्जिकल स्ट्राइक’! तुर्कस्तानातील दहशतवादी हल्ल्यामागे कुर्दिश बंडखोर? त्यांची मागणी काय आहे?
israel, airstrikes across iran
विश्लेषण : इस्रायलचा अखेर इराणवर हल्ला! पश्चिम आशियात पुन्हा युद्धभडका?
Smart Bomb Israel Used to Flatten Buildings in Lebanon
Israel used Smart bomb: लेबनॉनमधील इमारती जमिनदोस्त करण्यासाठी इस्रायलने वापरला स्मार्ट बॉम्ब; नक्की काय आहे स्मार्ट बॉम्ब?
Israel attacks iran live updates
Israel Attack on Iran: इस्रायलचा इराणवर हवाई हल्ला; लष्करी तळांना लक्ष्य केले, पुन्हा युद्ध भडकणार?
Gulmarg Terrorist Attack
Gulmarg Terrorist Attack : काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला; २ जवान शहीद, २ कुली ठार, ३ जवान जखमी

हे वाचा >> इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावरील अग्रलेख:‘बिबीं’चा ‘पुलवामा’

इंतिफादा म्हणजे काय?

इंतिफादा हा अरेबिक शब्द आहे. या शब्दाचा इंग्रजीतील भाषांतरीत अर्थ आहे, “शेकिंग ऑफ.” पण त्याचा अर्थ असो होतो की, सत्ताधाऱ्यांविरोधात स्वातंत्र्यासाठी केलेला उठाव किंवा बंड. १९४९ साली अरब राष्ट्रांच्या मध्यभागी इस्रायलची स्थापना झाली. बरोबर एक वर्षापूर्वी २२ सप्टेंबर १९४८ रोजी अरब राष्ट्रांनी पॅलेस्टाईनच्या निर्मितीची घोषणा केली होती. जॉर्डन, लेबनॉन, सीरिया, इजिप्त आणि पॅलेस्टाईन या अरब देशांच्या सीमांना लागून इस्रायल वसला. इस्रायलने आपल्या भूमीवर कब्जा केला, अशी पॅलेस्टाईनची भावना आहे. तसेच या वादाला धार्मिक भूमिकादेखील आहे. ६ ऑक्टोबर १९७३ रोजी इजिप्त आणि सीरियाच्या संयुक्त आक्रमणाला इस्रायलने कसोशीने तोंड देत विजय मिळविला होता. लेबनॉनच्या हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेलाही वेसण घालण्यात त्यांनी यश मिळविले. पॅलेस्टाईनशीही अधूनमधून खटके उडत होतेच. त्यातच पॅलेस्टाईनमध्ये ऐंशीच्या दशकात इंतिफादा उठावाची सुरुवात झाली.

पहिला इंतिफादा

१९६७ साली इजिप्त आणि सीरियाशी सहा दिवसांच्या युद्धात विजय मिळवून इस्रायलने वेस्ट बँक, गाझापट्टी आणि पूर्व जेरुसलेमवर ताबा मिळवला. इस्रायलने आपली जमीन बळकावल्याच्या असंतोषामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती होती, त्यातच पॅलेस्टाईनमधील आर्थिक अडचणी आणि सततच्या हिंसाचारामुळे इस्रायलविरोधातला राग धुमसत होता.

९ डिसेंबर १९८७ रोजी पहिल्या इंतिफादाची सुरुवात झाली. इस्रायलच्या लष्करी गाडीला धडकून चार पॅलेस्टिनी कामगारांचा मृत्यू झाला. इस्रायलने या घटनेला अपघात असल्याचे सांगून टाळले. मात्र, पॅलेस्टाईनमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली. या घटनेच्या काही दिवस आधी गाझा येथे एका ज्यू नागरिकाची हत्या झाली होती. या घटनेचा सूड उगविण्यासाठीच इस्रायलने निर्वासीत शिबिरातील चार मजुरांची जाणूनबुजून हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यातून इस्रायलविरोधाच्या उठावाला चिथावणी दिली गेली.

हे वाचा >> इस्रायलवर हल्ला करणारी पॅलेस्टाईनमधील ‘हमास’ संघटना नेमकी काय आहे?

पहिल्या इंतिफादामध्ये बहिष्कार आणि हिंसक आंदोलन पाहायला मिळाले होते. ज्यामध्ये पॅलेस्टिनी कामगारांनी इस्रायलला सेवा देण्यास नकार दिला, अनेक कामगारांनी इस्रायलमधून काढता पाय घेतला. इस्रायल सैन्यांवर ठिकठिकाणी दगडफेक आणि पेट्रोल भरलेल्या जळत्या बाटल्या फेकण्यात आल्या. जमेल त्या मार्गाने पॅलेस्टाईनने इस्रायलचा विरोध केला. सध्या ज्या हमासने इस्रायलमध्ये मोठा हल्ला केला आहे, त्या संघटनेची मुहूर्तमेढ याच इंतिफादादरम्यान रोवली गेली. मुस्लीम ब्रदरहूड या अरब राष्ट्रातील आद्य संघटनेत विभाजन होऊन हमासची स्थापना झाली. पॅलेस्टाईनमध्ये अस्तित्वात असलेल्या पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायजेशन (Palestinian Liberation Organisation – PLO) या संघटनेला पर्याय म्हणून हमासची स्थापना झाली.

पहिल्या इंतिफादाचा शेवट १९९३ मध्ये ओस्लो कराराच्या माध्यमातून झाला. इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान यित्झाक रॅबिन आणि पीएलओ संघटनेचे अध्यक्ष यासर अराफत यांच्यादरम्यान अमेरिकेच्या मध्यस्थीने हा करार झाला. पहिल्या इंतिफादा उठावात पॅलेस्टाईनच्या १००० हून अधिक आणि इस्रायलच्या १५० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला.

दुसरा इंतिफादा

ओस्लो करारावर सहमती दर्शविल्यानंतर वर्षागणिक इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील सामाजिक-आर्थिक विषमता वाढतच गेली. कराराच्या माध्यमातून जे उद्देश आखण्यात आले होते, ते वास्तवात उतरत नसल्याची भावना पॅलेस्टाईमध्ये बळावू लागली. १९९३ ते २००० या काळात वेस्ट बँक आणि गाझापट्टीतील समस्या सुटण्याऐवजी त्या आणखी खोलवर पसरल्या. पॅलेस्टिनी नागरिकांना मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य आणि सामाजिक-आर्थिक स्वातंत्र्य लाभेल, अशी अपेक्षा असताना यापैकी काहीही होताना दिसत नाही. जेरेमी प्रेसमॅन यांनी जर्नल ऑफ कॉन्फ्लिक्ट स्टडीजमध्ये लिहिले की, सामाजिक-आर्थिक क्षेत्रातील आघाडीवर प्रगती न साधल्यामुळे पॅलेस्टिनी समाजात असंतोष खदखदत होता.

हे वाचा >> इस्रायलचे रॉकेट हल्ल्यापासून संरक्षण करणारी आयर्न डोम यंत्रणा काय आहे?

सप्टेंबर २००० साली अमेरिकेतील मेरीलँड राज्यात असलेल्या कॅम्प डेव्हिड शहरात इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील वाटाघाटी निष्फळ ठरली आणि त्यानंतर पॅलेस्टाईनमधील तरुणांनी इस्रायल पोलिसांवर दगडफेक केली. इस्रायल आणि पीएलओमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असतानाच इस्रायलचे विरोधी पक्षनेते (नंतर पंतप्रधान झालेले) एरियल शेरॉन यांनी अल-अक्सा मशिदीला भेट दिली. इस्लाम धर्मातील तिसरे पवित्र स्थळ म्हणून याचा उल्लेख होतो. तसेच मशिदीच्या शेजारी पश्चिम भिंत म्हणून ओळखले जाणारे स्थान ज्यू धर्मीयांसाठी पवित्र मानले जाते. या भेटीमुळे संघर्ष आणखी चिघळला. शेरॉन यांच्या भेटीदरम्यान पॅलेस्टाईनमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले आणि त्यातून दुसऱ्या इंतिफादाची सुरुवात झाली.

अल-अक्सा मशिदीमुळे इस्रायल-पॅलेस्टाईनमधील संघर्ष आणखी तीव्र झाला. दुसऱ्या इंतिफादाला अल-अक्सा इंतिफादा असेही म्हटले जाते.

२००२ साली हमासने एका हॉटेलवर केलेल्या हल्ल्यामुळे ३० इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. यानंतर चिडलेल्या इस्रायलने ऑपरेशन डेजर्ट शिल्डची सुरुवात केली. वेस्ट बँक प्रांताजवळ पॅलेस्टाईनने उभारलेल्या प्रकल्पांना लक्ष्य करून ते उदध्वस्त करण्यात आले. दुसऱ्या इंतिफादादरम्यान आधीपेक्षाही अनेक पटींनी हिंसा पाहायला मिळाली. स्नायपर हल्ला, आत्मघाती बॉम्बस्फोट, हिंसक निदर्शने यावेळी पाहायला मिळाली. दुसऱ्या इंतिफादामध्ये १००० इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला, तर पॅलेस्टाईनमधील २००० नागरिकांचे बळी गेले. दुसऱ्या इंतिफादाचा शेवट कधी झाला, याची काही निश्तिच तारीख नाही. मात्र, २००५ च्या दरम्यान शर्म अल-शेख शिखर परिषदेनंतर दुसऱ्या इंतिफादाची समाप्ती झाली.

तिसऱ्या इंतिफादाची सुरुवात?

यावेळी हमासकडून ज्या प्रमाणात आणि ज्या प्रकारे इस्रायलवर हल्ला करण्यात आला, ही घटना अभूतपूर्व असल्याचे म्हटले जाते. याआधी इस्रायलच्या भूभागावर एवढ्या मोठ्या स्तरावर हल्ला झाला होता. इस्रायलच्या सुरक्षा दलानी या हल्ल्याची तुलना अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या ‘९/११’ किंवा ‘पर्ल हार्बर’ हल्ल्याशी केली, अशी माहिती एनडीटीव्हीने दिली आहे.

आणखी वाचा >> Israel-Palestine War : इस्राईलमधील योम किप्पूर युद्धाची पुन्हा आठवण का काढली जात आहे?

यावेळीही अल-अक्सा मशिदीचा वाद केंद्रस्थानी असल्याचे म्हटले जाते. इस्रायलने जेरुसलेम मशिदीविरोधात आक्रमकता दाखविल्यानंतर पॅलेस्टाईन हातावर हात ठेवून शांत बसू शकत नाही, अशी भूमिका हमासचे प्रमुख ईस्माइल हानियेह यांनी मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात व्यक्त केली होती. अल-अक्सा मशिदीजवळ पॅलेस्टिनी नागरिक आणि इस्रायलच्या पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात झटापट झाली होती, यात ४२ लोक जखमी झाले होते.

अल अक्सा मशिदीच्या शेजारीच असलेल्या पश्चिम भिंत या ज्यू धर्मीयांच्या श्रद्धास्थळावर दंगलखोरांनी दगडफेक केली आणि फटाके सोडले असल्याचा आरोप करत नागरिकांवर लाठीमार केला होता. २००७ साली गाझामध्ये हमासने सत्ता स्थापन केल्यापासून इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात अनेकदा खटके उडालेले आहेत.