युक्रेनबरोबरच्या युद्धादरम्यान आता रशिया नवीन संकटाचा सामना करत आहे. रशियामध्ये बटर (लोणी) चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बरेच जण याचा दोष युक्रेन युद्धाला देत आहेत. गेल्या वर्षभरात रशियातील बटरच्या किमती गगनाला भिडल्याने देशभरातील सुपरमार्केटमध्ये चोरीच्या घटना घडत आहेत. वाढत्या किमती कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी रशिया संयुक्त अरब अमिराती आणि तुर्कस्तानमधून बटर आयात करत आहे. नेमके हे प्रकरण काय आहे? बटर वाढण्याची कारणं काय? युक्रेन युद्धाचा बटरच्या किमतीशी काय संबंध? त्याविषयी जाणून घेऊ.

प्रकरण काय?

राज्य सांख्यिकी सेवेनुसार, डिसेंबरपासून बटरच्या ब्लॉकची किंमत २५.७ टक्क्यांनी वाढली आहे. द टेलिग्राफनुसार, ८.६ टक्क्यांच्या अधिकृत महागाई दरापेक्षा हा दर तिप्पट आहे. मॉस्कोमधील ‘ब्रेस्ट-लिटोव्स्क’ या उच्च दर्जाच्या बटरच्या पॅकची किंमत वर्षाच्या सुरुवातीपासून ३४ टक्क्यांनी वाढून २.४७ डॉलर्सवर पोहोचली, असे आढळून आले आहे. ‘मॉस्को टाईम्स’नुसार, अन्न उत्पादक युनियन ‘Rusprodsoyuz’ने म्हटले आहे की, आता एक किलो बटरची किंमत १०.६६ डॉलर्स आहे. जानेवारीपासून त्यात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. रशियन प्रसारमाध्यमांच्या म्हणण्यानुसार, किमतीतील वाढीमुळे काही सुपरमार्केटमध्ये बटर चोरीच्या घटना घडल्या आहेत. फॉर्च्यूनच्या म्हणण्यानुसार, दोन मुखवटा घातलेल्या माणसांनी अलीकडेच एका डेअरीच्या दुकानातून २० किलो बटर चोरले. ‘कीव इंडिपेंडेंट’नुसार, मॉस्कोतील एका सुपरमार्केटमध्ये बटरची २५ पाकिटे चोरण्याचा कथित प्रयत्न केल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. काही किरकोळ विक्रेत्यांनी दुकानातून होणारी चोरी रोखण्यासाठी प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये बटरचे स्वतंत्र ब्लॉक्स ठेवण्यास सुरुवात केली आहे. रशियन स्वतंत्र वृत्त आउटलेट ‘मेडुझा’ने नोंदवले आहे की, काही सुपरमार्केट आता कॅविअर आणि प्रीमियम अल्कोहोल उत्पादनांसाठी वापरल्या जाणाऱ्या अँटी-थेफ्ट केसिंगमध्ये बटर ठेवत आहेत.

ukraine nuclear bomb
रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलणार? युक्रेनची अणुबॉम्बची तयारी? काय होणार जगावर परिणाम?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
rbi governor shaktikanta das on inflation risks and slowing growth
चलनवाढीसह विकासवेग मंदावण्याचा धोका ; शक्तिकांत दास
reality about donald trump and vladimir putin friendship
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?
ukraine israel war increase carbon emissions
युक्रेन, इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ
sex ministry in russia
‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Vladimir putin Narendra Modi Reuters
Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”
डिसेंबरपासून बटरच्या ब्लॉकची किंमत २५.७ टक्क्यांनी वाढली आहे. (छायाचित्र-रॉयटर्स )

हेही वाचा : भारताच्या ‘पिनाका’ रॉकेट लाँचर्सची मागणी जगभरात; कारण काय? काय आहेत याची वैशिष्ट्ये?

युक्रेनमधील युद्धाचा लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार नाही, याची खात्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणारे अधिकारी बारकाईने या घटनांवर लक्ष ठेवून आहेत. कृषी प्रभारी दिमित्री पात्रुशेव २३ ऑक्टोबर रोजी म्हणाले की, सरकार बटरच्या किमतींवर लक्ष ठेवेल. त्यांनी प्रमुख दुग्ध उत्पादक आणि किरकोळ विक्रेत्यांची भेट घेतली आणि सांगितले की आयात वाढवली जात आहे. मजुरी, व्याजदर, इंधन आणि वाहतूक आदींचे खर्च वाढल्याने दुधाच्या किमतीही वाढल्या आहेत. ‘द टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार, रशियाच्या दुग्धउत्पादकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सोयुझमोलोको या गटाने उत्पादन खर्चात वाढ आणि आईस्क्रीम व चीजची वाढलेली मागणी, बटरच्या वाढलेल्या किमतींसाठी कारणीभूत असल्याचे सांगितले आहे.

रशिया बटरची आयात करणार?

बेलारूसमधून बटरची आयात पुरेशी नसल्याने आता रशियाला तुर्कीकडून आणि अगदी इराण व भारताकडून मोठ्या आयातीची अपेक्षा आहे, असे रशियन मीडियाने म्हटले आहे. संयुक्त अरब अमिरातीमधून (यूएई) बटरची आयात १८ ऑक्टोबरपासून सुरू झाली. “यापूर्वी संयुक्त अरब अमिरातीकडून रशियाला कधीही बटरची आयात करण्यात आली नव्हती,” असे एका निवेदनात म्हटले आहे. ‘यूएई’ने रशियाला आतापर्यंत ९० मेट्रिक टन बटरचा पुरवठा केला आहे. रशिया किमती स्थिर करण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारपेठेसाठी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी बटरचा पुरवठा वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. लॅटिन अमेरिकेतून रशियाला होणारी बटरची आयात २०१४ मधील २५,००० टनांवरून यावर्षी घटून २,८०० टनांवर आली आहे. पाश्चात्य निर्बंध हे घटत्या वितरणामागील कारणांपैकी एक आहे.

रशियातील दुकानदार चिंतेत

मॉस्कोच्या तीन सुपरमार्केटला भेट देणाऱ्या पत्रकारांना वेगवेगळ्या किमतीचे वेगवेगळ्या ब्रँडचे बटर ठेवले असल्याचे आढळले. “बटरचे भाव वाढले आहेत. काही फळे आणि भाज्यादेखील महागल्या आहेत. बटाटे आणि कोबी खूप महाग आहेत,” असे मॉस्कोमधील रहिवासी एलेना म्हणाल्या. दुसऱ्या सुपरमार्केटमध्ये आलेले सर्गेई पोपोव्ह म्हणाले की ते काळजीत आहेत. “रोज सकाळी नाश्त्याला बटर खावे लागते. आम्ही दूध, चीज, सॉसेज, अंडी आणि ब्रेड खरेदी करतो आणि त्याचा खर्च १५.३५ डॉलर्स इतका येतो. भाव का वाढत आहेत हे आम्हालाच माहीत नाही,” असे ते म्हणाले.

पुतिन यांनी या वर्षाच्या सुरुवातीला संरक्षण मंत्रालयाचे प्रमुख म्हणून अर्थशास्त्रज्ञ आंद्रेई बेलोसोव्ह यांची नियुक्ती केल्यानंतर तोफ आणि बटर यांच्यातील संबंधांचा उल्लेख केला होता. २०२२ मध्ये पुतिन यांनी युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यानंतर लगेचच, रशियावर पाश्चात्य निर्बंध लादण्यात आले. एका मोठ्या देशावर कठोर पाश्चात्य निर्बंध लादूनही हा देश अमेरिका आणि जवळजवळ सर्व प्रमुख युरोपीय देशांपेक्षा वेगाने वाढला. रशिया संरक्षणावर अधिक खर्च करत आहे, ज्यामुळे किमती वाढत आहेत. २०२५ मध्ये मॉस्को संरक्षणावरील खर्च जीडीपीच्या ६.३ टक्क्यांपर्यंत वाढवणार असल्याचे चित्र आहे. बटाट्याच्या दरात ५० टक्के, तर लसणाच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. रशियाच्या मध्यवर्ती बँकेच्या आकडेवारीनुसार टूथपेस्टची किंमत ४५ टक्क्यांनी वाढली आहे, तर कारच्या किमतीही ४० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. तज्ज्ञ सांगतात की, ही परिस्थिती पुढे आणखी बिघडणार आहे.

हेही वाचा : आर्यन झाला अनाया: क्रिकेटर संजय बांगर यांच्या मुलाने केलेली ‘हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी’ची प्रक्रिया कशी होते? त्याचे दुष्परिणाम काय?

“सोप्या भाषेत सांगायचे तर पुतिनच्या प्रशासनाने लष्करी उत्पादनाला अर्थव्यवस्थेतील इतर सर्व गोष्टींपेक्षा जास्त प्राधान्य दिले आहे. संरक्षण उद्योगाचा विस्तार होत असताना, रशियन ग्राहकांवर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे; ज्यामुळे संभाव्य संकटाची स्थिती निर्माण झाली आहे,” असे रशिया-युक्रेन युद्ध तज्ज्ञांच्या गटाने ऑगस्टमध्ये ‘फॉर्च्यून ऑप-एड’मध्ये लिहिले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने यावर्षी ३.६ टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे. गोल्डमन सॅक्सचे माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञ जिम ओ’नील या परिस्थितीविषयी बोलताना म्हणाले, “हे सर्व प्रचंड रशियन संरक्षण खर्चामुळे आहे.”