अमेरिकेत राहस्यमयी ड्रोन्समुळे खळबळ उडाली आहे. अनेक दिवसांपासून अमेरिकेत अनेक शहरांमध्ये रहस्यमयी ड्रोन दिसून येत आहेत. त्यामुळे संपूर्ण अमेरिकेतील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एफबीआय त्या ड्रोन्सबाबत तपास करीत आहेत. या रहस्यमयी ड्रोन्समुळे परकीय आक्रमणे, राजकीय हस्तक्षेप वा एलियनचा धोका, असे एक ना अनेक दावे केले जात आहेत. नेमके हे प्रकरण काय आहे? अमेरिकेत दिसणारे ड्रोन्स नक्की कुठून येत आहेत? त्यावर अधिकाऱ्यांचे म्हणणे काय? या ड्रोन्समागील सत्य नक्की काय आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

नेमकं प्रकरण काय?

न्यू जर्सी, न्यू यॉर्क, कनेक्टिकट, पेनसिल्व्हेनिया, मॅसॅच्युसेट्स व व्हर्जिनिया, अशा किमान सहा राज्यांमध्ये रहस्यमयी ड्रोन दिसल्याच्या वृत्तानंतर गोंधळ आणि भीतीचे वातावरण आहे. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने अहवाल दिला की, मॉरिस काउंटी, न्यू जर्सी या परिसरात १८ नोव्हेंबर रोजी ड्रोन दिसण्यास सुरुवात झाली. न्यू जर्सी असेंब्लीमधील रिपब्लिकन पॉल कनित्रा यांनी ‘सीएनएन’ला सांगितले की, तेव्हापासून दररोज रात्री ड्रोन दिसत आहेत. ते महत्त्वपूर्ण संरचना, प्रतिबंधित क्षेत्रे आणि निवासी क्षेत्रांच्या ठिकाणी आढळून आले आहेत. बेडमिन्स्टरमधील नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोल्फ मालमत्तेवर आणि अमेरिकेच्या लष्करी संशोधन केंद्राच्या पिकाटिनी आर्सेनलजवळ ड्रोन दिसले, ज्यामुळे चिंता वाढली, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.

kites on Makar Sankranti
मकरसंक्रांतीला पतंग उडवितांना कुठल्या दुर्घटना घडतात माहिती आहे का?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mahakumbh mela 2025 Drone Show fact check video
महाकुंभ मेळ्यात पाहायला मिळेल डोळे दिपवणारा भव्य ‘ड्रोन शो’? व्हायरल होणारा ‘तो’ व्हिडीओ नेमका कुठला? सत्य जाणून तुम्हीही व्हाल हैराण
Drones will monitor illegal fishing and boat entry in Thane and Palghars bay
अनधिकृत मासेमारी आणि नौकांवर ड्रोनद्वारे नजर
fisheries department monitor Konkan coast through drones to prevent intrusion of foreign fishing boats
कोकण किनारपट्टीतील समुद्रावर आता ड्रोनची नजर, परप्रांतिय घुसखोरी आणि एलईडी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाचा उपाय
Naxals Blow Up Security Vehicle In Chhattisgarh's Bijapur, 9 Feared Dead
छत्तीसगडमध्ये पोलिसांच्या वाहनावर नक्षलवाद्यांकडून स्फोटक हल्ला; नऊ पोलीस जागीच ठार!
isis history
न्यू ऑर्लीन्समधील हल्लेखोर इस्लामिक स्टेटचा; ‘ISIS’मध्ये कशी केली जाते तरुणांची भरती? या संघटनेचा इतिहास काय?
tibetean plateau
तिबेटच्या पठारावरून विमाने का जात नाहीत? वैमानिकांच्या भीतीचे कारण काय?

हेही वाचा : गहू आणि खाद्यतेलाचे दर आणखी वाढणार? कारण काय? सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

न्यूयॉर्कमधील स्टीवर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळाने शुक्रवारी रात्री कथित ड्रोन क्रियाकलापामुळे धावपट्टी तात्पुरती बंद केली होती. “हे प्रकरण वाढत आहे,” असे न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी शनिवारी सांगितले. गेल्या महिन्यात त्यांनी न्यूयॉर्क स्टेट इंटेलिजेन्स सेंटरला ड्रोन दृश्यांची सक्रियपणे चौकशी करण्याचे आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी फेडरल कायद्याच्या अंमलबजावणीशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले.

अनेक दिवसांपासून अमेरिकेत अनेक शहरांमध्ये रहस्यमयी ड्रोन दिसून येत आहेत. त्यामुळे संपूर्ण अमेरिकेतील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (छायाचित्र-एपी)

अधिकारी काय म्हणतात?

या दृश्यांमुळे विमानाविषयी अधिक माहिती देण्यासाठी फेडरल एजन्सींवर तीव्र दबाव निर्माण झाला आहे. डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी अलेजांद्रो मेयोर्कास यांनी रविवारी एबीसीच्या या आठवड्यात या प्रकरणावर लक्ष वेधले. “मी अमेरिकन जनतेला खात्री देऊ इच्छितो की, आम्ही त्यावर काम करीत आहोत,” असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, फेडरल सरकार हवाई ड्रोनच्या या नवीन संकटासाठी अतिरिक्त संसाधने, कर्मचारी आणि तंत्रज्ञान तैनात करीत आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन किंवा उपाध्यक्ष कमला हॅरिस हे दोघेही या विषयावर सार्वजनिकरीत्या बोलले नाहीत. परंतु, न्यू जर्सी आणि पूर्व किनारपट्टीवरील अनेक निवडून आलेल्या खासदार आणि स्थानिक नेत्यांनी या वस्तूंची चौकशी करण्याची मागणी केली आहे. न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी वाढीव फेडरल हस्तक्षेपाची मागणी केली.

न्यू यॉर्क व न्यू जर्सीमध्ये शुमरने रॉबिन रडार सिस्टीम यांसारख्या विशेष शोध प्रणाली तैनात करण्याची मागणी केली आहे. कारण- त्यांच्या ३६०-डिग्री तंत्रज्ञानामुळे अधिक चांगल्या पद्धतीने ड्रोन शोधता येतो. पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर जोश शापिरो यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे प्रशासन ड्रोनबाबत जागरूक आहे आणि गंभीरपणे अहवाल घेत आहे. डेमोक्रॅटिक गव्हर्नरच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी रात्री त्यांनी पेनसिल्व्हेनिया राज्य पोलिसांना अधिक बारकाईने पाहण्याच्या सूचना दिल्या. “हे ड्रोन कुठून आले आहेत आणि या ड्रोनचा उद्देश काय आहे हे ठरवण्यासाठी पोलिस हेलिकॉप्टर वापरतील,” असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय सुरक्षेला धोका?

एफबीआय आणि डीएचएसने गुरुवारी एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे, “यावेळी नोंदवलेली ड्रोन दृश्ये राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करत असल्याचा किंवा परकीय संबंध असल्याचा कोणताही पुरावा नाही.” डीएचएस सचिव मेयोर्कस म्हणाले, “दक्ष राहणे हे आमचे काम आहे. चिंतेचे कोणतेही कारण असल्यास, आम्हाला कोणताही परदेशी सहभाग किंवा गुन्हेगारी क्रियाकलाप आढळल्यास, आम्ही त्यानुसार अमेरिकन जनतेशी संवाद साधू. आता आम्हाला कोणतीच माहिती नाही.” न्यू यॉर्क राज्य पोलिसांनी शुक्रवारी दुपारी सांगितले की, त्यांना गेल्या २४ तासांमध्ये ड्रोन पाहण्यासंबंधीचे असंख्य अहवाल प्राप्त झाले आहेत आणि ते या अहवालांची चौकशी करीत आहेत. आमच्याकडे या क्षणी कोणताही पुरावा नाही की नोंदवलेल्या कोणत्याही दृश्यांमुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, असे त्यांचे सांगणे आहे.

हाऊस इंटेलिजन्स कमिटीचे सदस्य जिम हिम्स रविवारी ‘फॉक्स न्यूज’वर हजर झाले आणि म्हणाले, “आमच्यापैकी बरेच जण सध्या खूप निराश आहेत,” कनेक्टिकटमधील डेमोक्रॅट असलेल्या हिम्सने फॉक्सला सांगितले, “ते इराणी नाहीत, ते चिनी नाहीत. ते मंगळवासीही नाहीत.” त्यांनी पेंटागॉनच्या प्रवक्त्या सबरीना सिंग यांनी आरोपांविषयी बोलताना सांगितले. “अमेरिकेच्या किनारपट्टीवर कोणतेही इराणी जहाज नाही आणि अमेरिकेच्या दिशेने ड्रोन लाँच करणारी मदरशिप नाही,” असेही त्यांनी सांगितले.

उडणाऱ्या वस्तू नक्की काय आहेत?

एफबीआय आणि डीएचएसच्या मते, काहींना हे ड्रोन असल्याचा भास झाला. अनेकदा कायदेशीररीत्या कार्यरत मानवयुक्त विमानांनाही ड्रोन म्हणून ओळखले जाते. मेयोर्कसने शुक्रवारी सीएनएनला सांगितले की, काही दृश्ये संभाव्यतः व्यावसायिक ड्रोन असू शकतात. “आम्हाला कोणतीही धमकी किंवा कोणतेही वाईट क्रियाकलाप लक्षात आले नाहीत,” असे मेयोर्कस म्हणाले. “आम्हाला चिंतेचे कोणतेही कारण जाणवले, तर आम्ही आमच्या संवादात पारदर्शक राहू,” असेही ते म्हणाले.

हेही वाचा : ‘या’ देशाने काढून घेतला भारताचा ‘Most Favoured Nation’चा दर्जा, भरावा लागणार अधिक कर; कारण काय?

अमेरिकेमध्ये बऱ्याच लोकांकडे ड्रोन आहेत. ‘एफएए’ने एकूण ७.९१,५९७ ड्रोन नोंदणीकृत केले आहेत, जे व्यावसायिक आणि मनोरंजक वापरामध्ये समान प्रमाणात विभाजित आहेत. ते कायद्याची अंमलबजावणी, शेती व छायाचित्रण यांसह अनेक क्षेत्रांमध्ये वापरले जातात. एफबीआयच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी एका न्यूज ब्रीफिंगदरम्यान सांगितले की, बहुतेक मानवचलित विमाने होती, जी ड्रोन म्हणून चुकीची ओळखली गेली होती. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, टिप लाईनवर पाठविलेल्या ५,००० टिपांपैकी १०० पेक्षा कमी अशा लीड्स मिळाल्या आहेत, ज्यांचा सखोल तपास केला जाणार आहे.

Story img Loader