९२ वर्षांपूर्वी म्हणजेच १९३० मध्ये अमेरिकेचे वैज्ञानिक क्लाइट टॉमबॉग यांनी प्लूटोचा शोध लावला होता. आपल्या सौरमंडळात एकूण आठ ग्रह आहेत. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनि, हर्षल आणि नेपच्यून. अशात १९३० मध्ये प्लुटो या नवव्या ग्रहाचा शोध लागला. प्लूटोला सौरमालेतील नववा आणि सर्वात लहान ग्रह मानलं गेलं. २००६ च्या आधी सौरमंडळातला सर्वात छोटा ग्रह म्हणून प्लूटो ओळखला जात होता.
प्लूटोचं नाव कसं पडलं?
प्लूटोचं नाव ऑक्सफोर्ड लंडनमध्ये शिकणाऱ्या एका ११ वीच्या विद्यार्थिनीने ठेवलं. या मुलीचं नाव वेनेशिया बर्ने असं होतं. अंधाराच्या देवतेला रोममध्ये प्लूटो असं म्हटलं जातं. या ग्रहावरही कायम अंधार असतो त्यामुळे हेच या ग्रहाचं नाव असलं पाहिजे. या मुलीने जे नाव दिलं त्यानंतर तिला पाच पाऊंड बक्षीस मिळाले होते. आजची त्याची किंमत सुमारे ४७३ रूपये आहे. प्लुटोला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी २४८ वर्षे लागतात. तर या ग्रहावरचा एक दिवस १५३ तासांचा असतो.
प्लूटोवर काय वातावरण?
वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार प्लूटो ग्रहावर बर्फ आहे. या बर्फाचं रूपांतर पाण्यात करायचं ठरवलं तर पृथ्वीवरच्या महासागरांमध्ये जेवढं पाणी आहे त्यापेक्षा तिप्पट हे प्रमाण होईल. तसंच काही भागांमध्ये प्लूटोवर खड्डेही आहेत. सूर्यापासून सर्वात लांब असल्यामुळे या ग्रहावर सूर्यप्रकाश पडण्यासाठी पाच तास लागतात. पृथ्वीवर सूर्यप्रकाश पोहचण्यासाठी आठ मिनिटं २० सेकंद लागतात. प्लुटोवर कुठल्याही प्रकारची जीवसृष्टी नाही आणि असण्याची शक्यताही नाही. कारण या ठिकाणी उष्णताच नाही. प्लुटोवरचं सरासरी तापमान हे मायनस २३३ डिग्री इतकं असतं. या तापमानात माणूस असो किंवा कुठलाही जीव तो क्षणार्धात गोठू शकतो.
१८ फेब्रुवारी १९३० ला या ग्रहाचा शोध लागला त्यानंतर या दिवशी झालेल्या महत्त्त्वाच्या घटना
१८३६: भारतातील महान संत आणि विचारवंत रामकृष्ण परमहंस ऊर्फ गदाधर चटर्जी यांचा पश्चिम बंगालमधील हुगळी येथे जन्म.
१९०५: शामजी कृष्णवर्मा यांनी लंडनमध्ये इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना केली.
१९११: मेल पाठवण्यासाठी पहिल्यांदा विमानाचा वापर करण्यात आला. एअर मेलचे पहिले अधिकृत उड्डाण अलाहाबाद येथे झाले आणि एकूण ६५०० पत्रे नैनीला नेण्यात आली.
१९३०: या दिवशी प्लूटोचा शोध क्लाइड टोम्बाने लावला. बराच काळ हा आपल्या सौरमालेचा नववा ग्रह मानला जात होता, परंतु नंतर या ग्रहाचा दर्जा काढून घेण्यात आला.
१९६५: चीनकडून पाकिस्तानला ६०० दशलक्ष डॉलर बिनव्याजी कर्ज देण्याच्या करारावर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी कराचीमध्ये स्वाक्षरी केली.
१९७९: सहारा वाळवंटात बर्फवृष्टीची अनोखी घटना घडली. हे आधी कधीच घडले नव्हते आणि आजपर्यंत कधीही झाले नाही.
१९९८: सी. सुब्रह्मण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला. समाजसेवेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना देशाचा हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. १९६४ ते १९६६ पर्यंत ते भारताचे कृषी मंत्री होते. हरित क्रांतीतील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.
२००७: दिल्लीहून लाहोरला जाणाऱ्या समझौता एक्स्प्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ६८ जणांचा मृत्यू झाला.
२००८: पाकिस्तानात अनेक वर्षांच्या लष्करी राजवटीनंतर झालेल्या निवडणुकीत पाकिस्तान पीपल्स पार्टीने १२० जागा जिंकल्या. नवाझ शरीफ यांच्या पक्षाला ९० जागा मिळाल्या आणि माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या पक्षाला ५१ जागा मिळाल्या.
२०१४: आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणा म्हणून देशातील २९ वे राज्य स्थापन करण्याचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर करण्यात आला.