तालिबानने अफगाणिस्तानमध्ये पोलिओ लसीकरण मोहीम स्थगित केली आहे. संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये सप्टेंबर महिन्यापासून पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार होती. मात्र त्याआधीच तालिबानने ही मोहीम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानने पाच वर्षांत पहिल्यांदाच जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेले घरोघरी लसीकरणाचे धोरण वापरले होते. परंतु, दक्षिण कंदाहार प्रांतात तालिबानने मशिदींमध्ये लसीकरण मोहीम चालवली आणि ही मोहीम कमी प्रभावी असल्याचे सांगितले. त्यामुळे कंदाहारमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण न झालेल्या बालकांना आता संसर्ग होण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे.

स्थानिक पातळीवर लसीकरण मोहीम थांबविल्यामुळे अफगाणिस्तानच्या मुलांनाच नव्हे, तर पाकिस्तानच्या सीमेवरील मुलांनाही धोका आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवर दोन्ही देशांमधील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू असते. त्यामुळे अफगाणिस्तानइतकाच धोका पाकिस्तानलाही आहे. “अफगाणिस्तान हा एकमेव शेजारी आहे की, जिथून अफगाण लोक मोठ्या संख्येने पाकिस्तानात येतात आणि नंतर परत जातात,” असे पोलिओ निर्मूलनासाठी राष्ट्रीय आपत्कालीन ऑपरेशन सेंटरचे समन्वयक अनवारुल हक यांनी ‘असोसिएटेड प्रेस’ला सांगितले. अफगाणिस्तानातील एकूण परिस्थितीवर एक नजर टाकू आणि पोलिओच्या वाढत्या प्रसार आणि त्याच्या धोक्यांविषयीही जाणून घेऊ.

Israeli PM Netanyahu at UN Shows India map as Blessing
Israeli PM Netanyahu : इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंनी UN मध्ये भारताचा नकाशा दाखवला; मध्य-पूर्वेतील संघर्षावर मोठं वक्तव्य
mukhyamantri vayoshri yojana
‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी पात्रता काय? अर्ज करण्यासाठी कोणती…
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
russian spy whale death
नॉर्वेमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या रशियन गुप्तहेर व्हेलची कहाणी; हेरगिरीसाठी कसा केला जातो प्राण्यांचा वापर?
oil and gas reserves found in the sea of ​​Pakistan how equation can change for Pakistan
पाकिस्तानच्या समुद्रात आढळला प्रचंड खनिज तेलसाठा? उत्खननाची क्षमता किती? उद्ध्वस्त अर्थव्यवस्थेची भाग्यरेखा बदलेल?
Lebanon Walkie-Talkies Explode
Lebanon Explosion : लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरच्या स्फोटानंतर आता वॉकीटॉकी आणि रेडिओचा स्फोट; ९ जणांचा मृत्यू, ३०० जण जखमी
Sharad Pawar Reaction on Akshay Shinde Death
Sharad Pawar : “गृहविभागाने दाखवलेला हलगर्जीपणा…”, अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये सप्टेंबर महिन्यापासून पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार होती. मात्र त्याआधीच तालिबानने ही मोहीम स्थगित करण्याचा निर्णय घेतला. (छायाचित्र-एपी)

हेही वाचा : सुनीता विल्यम्स धरतीवर परतणार, ‘स्पेसएक्स’च्या क्रू-९ चे यशस्वी प्रक्षेपण; मोहिमेला विलंब का झाला? याचा नक्की परिणाम काय?

पोलिओचा व्यापक प्रसार

अफगाणिस्तानमध्ये आधीच २०२४ मध्ये अर्धांगवायू (लकवा) पोलिओच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. २०२३ मध्ये केवळ सहा प्रकरणांची नोंद करण्यात आली होती. आता हा आकडा १४ वर पोहोचला आहे. अर्धांगवायू पोलिओ २०० पैकी एका संसर्गामध्ये होतो आणि त्यामुळे अर्धांगवायू पोलिओमध्ये झालेली ही वाढ या प्रदेशात संसर्गाचा व्यापक प्रसाराचा धोका सूचित करते. पाकिस्तानचाही यात समावेश आहे. कारण- पाकिस्तानमध्ये या वर्षी १३ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. त्यामध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे. कारण- पाकिस्तानमध्ये या वर्षात आतापर्यंत १२ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत.

स्थानिक पातळीवर लसीकरण मोहीम थांबविल्यामुळे अफगाणिस्तानच्या मुलांनाच नव्हे, तर पाकिस्तानच्या सीमेवरील मुलांनाही धोका आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

लसीकरणाची घटलेली संख्या आणि पोलिओ संसर्गाच्या कारणास्तव असुरक्षित मुलांची वाढती संख्या यांमुळे, भविष्यात अर्धांगवायू पोलिओच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. विषाणूचा प्रसार आणि प्रदेशातून बाहेर जाणाऱ्या लोकांची संख्या पाहता, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या पलीकडे भारत आणि इराणसारख्या प्रांतांतही पोलिओचा प्रसार होऊ शकतो. ज्या भागात लसीकरण कमी आहे, त्या भागांतही पोलिओचा प्रसार सहज वाढू शकतो. तालिबानकडून या मोहिमेला स्थगिती देणे हा अफगाणिस्तानातील पोलिओ निर्मूलनाला मोठा धक्का आहे. तालिबाननेही या मोहिमेवर स्थगिती आणण्यामागचे कारण स्पष्ट केले नाही. मात्र, या स्थगितीमुळे भविष्यात अफगाणिस्तानसह इतरही शेजारी राष्ट्रांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

हेही वाचा : हिजबुल प्रमुखाच्या हत्येनंतर संघर्ष पेटणार? भारतासह इतर देशांवर काय परिणाम होणार?

अर्धांगवायू पोलिओ कसा होतो?

पोलिओ हा संसर्गजन्य विषाणूमुळे होणारा आजार आहे. या आजाराची लागण पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना होते. मुख्य म्हणजे पोलिओची लागण होणाऱ्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांमध्ये आजाराची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. पोलिओचा विषाणू मज्जासंस्थेवर आघात करतो आणि त्यामुळे काही तासांत अर्धांगवायू होऊ शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. त्यामुळे पायांना कायमस्वरूपी अर्धांगवायू होतो. ज्या मुलांना अर्धांगवायू पोलिओ होतो, त्यापैकी १० टक्के मुलांच्या श्वसनक्रियेच्या स्नायूंवरही परिणाम होतो आणि त्यांचा मृत्यू होतो. हा प्रकार २०० पैकी एका रुग्णात आढळतो, अशी जागतिक आरोग्य संघटनेची माहिती आहे आणि अफगाणिस्तानमध्ये याच प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.