4,000-year-old Egyptian tomb: जगाच्या इतिहासात इजिप्त हा नेहमीच आकर्षणाचा विषय राहिला आहे. नाईल नदीच्या किनाऱ्यावर विकसित झालेल्या या संस्कृतीने वसाहतवादी कालखंडात साऱ्या जगाचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले. मोठं मोठाले पिरॅमिड्स, त्यातील ममीज, सभोवतालचे विस्तृत पसरलेले वाळवंट यांनी नेहमीच या प्रदेशाच्या इतिहासाविषयी गूढता निर्माण केली. म्हणूनच या ठिकाणच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे काही सापडले की, तो नेहमीच कुतूहलाचा विषय ठरतो. अलीकडेच याच इतिहासावर प्रकाश टाकणाऱ्या एका महत्त्वाच्या ममीचा शोध पुरातत्त्व अभ्यासकांना लागला आहे. २ ऑक्टोबर रोजी इजिप्तच्या पर्यटन आणि पुरातत्त्व मंत्रालयाने फेसबुकवर जाहीर केले की, असियुत प्रदेशाच्या प्राचीन राज्यपालाच्या मुलीचे थडगे असियुतच्या पश्चिम पर्वतावरील एका दफनभूमीत सापडले आहे. या मुलीची ओळख ‘लेडी ऑफ दी हाऊस’ अशी करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर या शोधाचा घेतलेला हा आढावा.

हा शोध लागणेच विलक्षण आहे

या नव्याने उघडकीस आलेल्या थडग्याचे स्थान कैरोपासून सुमारे २४० मैल अंतरावर आहे. दफनात सापडलेल्या या महिलेचे नाव ‘इडी’ असे आहे. तिचे दफन दोन अत्यंत सुशोभित केलेल्या शवपेट्यांमध्ये करण्यात आले होते. एक शवपेटी दुसऱ्या शवपेटीच्या आत ठेवलेली होती, असे इजिप्तच्या पर्यटन आणि पुरातत्त्व मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. या शवपेटीत सापडलेली इडी इजिप्तमध्ये इसवीसन पूर्व २०३० ते १६४० या कालखंडात होऊन गेली आणि अंदाजे ४० व्या वर्षी तिचा मृत्यू झाला, असे लाइव्ह सायन्सच्या अहवालात म्हटले आहे. UCLA इजिप्तोलॉजिस्ट कॅथलिन कुनी यांनी लाइव्ह सायन्सला सांगितले की, दोन अखंड मिडल किंगडम शवपेटीचा शोध लागणे हे विलक्षण आहे. ही शवपेटी मिडल किंगडमच्या (मध्यसाम्राज्यकाळ) कालखंडातील आहे.

Successful treatment of an elderly woman suffering from hernia and comorbidities Pune news
हर्नियासह सहव्याधींनी ग्रस्त ज्येष्ठ महिलेवरील उपचारांचे आव्हान, दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर यशस्वी
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
rekha lata mangeshkar
“देवा पुढल्या जन्मी…”, रेखा यांनी सांगितला लता मंगेशकरांबद्दलचा ‘तो’ किस्सा; म्हणाल्या, “मला त्यांनी…”
Allu Arjun
‘पुष्पा 2’ च्या प्रिमियरमध्ये चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू, अल्लू अर्जुनने २५ लाखांच्या मदतीचं दिलं आश्वासन
The woman's remains were contained in two painted coffins, one stacked inside the other. Egyptian Ministry of Tourism and Antiquities
फोटो: इजिप्शियन पर्यटन आणि पुरातन वस्तू मंत्रालय

अधिक वाचा: Queen Nefertiti bust: ३,३७० वर्षे प्राचीन इजिप्तची राणी परंतु तिचा पुतळा जर्मनीत; नेफरतितीचा अर्धपुतळा इजिप्तला परत मिळणार का?

इजिप्तच्या इतिहासातील कालखंड

मराठी विश्वकोशात म. श्री. माटे यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘उत्तर आफ्रिका खंडात ईशान्येस नाईल नदीच्या खोर्‍यात इ. स. पू. ५००० ते इ. स. ६४० च्या दरम्यान अस्तित्वात असणारी एक प्राचीन समृद्ध संस्कृती म्हणजे इजिप्तची संस्कृती. तिचा विस्तार मुख्यत्वे नाईल नदीच्या खोर्‍यात उत्तरेकडील पहिल्या प्रपातापर्यंत व नाईलच्या त्रिभुज प्रदेशात झाला होता. नाईल हीच इजिप्तची अन्नदात्री आहे आणि प्रागैतिहासिक काळापासून इजिप्तचे जीवन तिच्याभोवतीच गुंफले गेले, म्हणून त्याला ‘नाईलची देणगी’ हे नाव प्राप्त झाले. त्याकाळी तत्कालीन लोकांनी इजिप्तचे उच्च अथवा दक्षिण व निम्‍न अथवा उत्तर असे दोन प्रादेशिक विभाग कल्पिले होते. आरंभी राजकीय दृष्ट्याही हे दोन स्वतंत्र प्रदेश होते व त्यांच्या एकीकरणानंतर इजिप्तचे साम्राज्य स्थापन झाले.

स्थूल मानाने इजिप्तच्या प्राचीन इतिहासाचे अभ्यासाच्या सोयीसाठी खालीलप्रमाणे विभाग करण्यात येतात; (१) प्रागैतिहासिक काल : इ. स. पू. सु. ५००० ते ३२००, (२) प्राचीन काळ : इ. स. पू. सु. ३२०० ते २६६० : पहिला व दुसरा राजवंश, (३) प्राचीन साम्राज्यकाळ : इ. स. पू. सु. २६६० ते २१८० : राजवंश ३ ते ६, (४) पहिला मध्यकाळ : इ. स. पू. सु. २१८० ते २०८० : राजवंश ७ ते १०, (५) मध्यसाम्राज्यकाळ : इ. स. पू. सु. २०८० ते १६४० : राजवंश ११ ते १३, (६) द्वितीय मध्यकाळ : इ. स. पू. सु. १६४० ते १५७० : राजवंश १४ ते १७, (७) नवसाम्राज्यकाळ : इ. स. पू. सु. १५७० ते १०७५ : राजवंश १८ ते २०, (८) उत्तर साम्राज्यकाळ : इ. स. पू. सु. १०७५ ते ३३२ : राजवंश २१ ते ३०. या काळाच्या विभागणीबद्दल एकमत नाही. काही विद्वान २१ ते २५ राजवंश असा एक कालखंड मानतात व त्यानंतर सेत काळ (सव्विसावा राजवंश) आणि अस्तकाळ (राजवंश २६ ते ३०) योजतात. यांच्या कालनिश्चितीबद्दलही दुमत आहे, (९) ग्रीक अंमल व टॉलेमी शासन : इ. स. पू. ३३२ ते ३०, (१०) रोम व बायझंटिन यांचा अंमल : इ. स. पू. ३० ते इ. स. ६४०.

Idi's burial chamber was located some 50 feet below the ground. Egyptian Ministry of Tourism and Antiquities
इडीची दफनभूमी जमिनीपासून ५० फूट खोलवर होती. (फोटो: इजिप्शियन पर्यटन आणि पुरातन वस्तू मंत्रालय)

इडी नेमकी कोण होती?

शवपेट्यांवरील चित्रलिपींमध्ये इडीला घरातील मुख्य स्त्री (lady of the house) असे संबोधले आहे, असे लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजचे वोल्फ्राम ग्राजेत्स्की यांनी या संदर्भात सांगितले. फेसबुक पोस्टमध्ये इजिप्तच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले की, इडी असियुत प्रदेशाच्या राज्यपालाची एकमेव मुलगी होती. राजा स्नोसर्ट पहिला, ‘जफाय-हबी’ म्हणून ओळखला जात असे, त्याच्या राज्यकाळात ती होऊन गेली. त्यांनी असेही म्हटले आहे की, राज्यपाल ‘प्राचीन इजिप्तमधील प्रदेशांचा एक महत्त्वाचा शासक होता’ आणि पिता आणि मुलगी यांना ‘त्या काळातील इजिप्तमधील सर्वात मोठ्या गैर-राजघराण्यातील दफनभूमीत’ दफन केले होते.

अधिक वाचा: Ancient India Egypt connection: प्राचीन इजिप्तमध्ये गौतम बुद्ध आणि हिंदू देवतांची पूजा; सांस्कृतिक देवाणघेवाणीचा पुरातन वारसा नेमकं काय सांगतो?

पायात जन्मजात दोष

दफन केलेल्या महिलेच्या कवटी आणि हाडांच्या अवशेषांच्या प्राथमिक तपासणीत असे लक्षात आले की, तिचा मृत्यू वय वर्षे ४० च्या आतच झाला होता. तसेच तिच्या पायात जन्मजात दोष होता. इजिप्तच्या सर्वोच्च पुरातत्त्व परिषदेचे (SCA) सरचिटणीस डॉ. मोहम्मद इस्माईल खालेद यांच्या मते, इडीच्या दफन कक्षाचे खोदकाम केले असता असे आढळले की, उत्तरेच्या बाजूला सुमारे १५ मीटर (४० फूट) खोलीवर दोन शवपेट्या एकात एक ठेवलेल्या होत्या. त्या आतून आणि बाहेरून पूर्णपणे कोरलेल्या होत्या, ज्यावर मजकूर कोरलेला देखील आहे. लहान शवपेटी ७.५ फूट लांब होती, तर मोठी शवपेटी ८.५ फूट लांब होती. असेही आढळून आले की, प्राचीन काळात चोरांनी शवपेटीच्या चेंबरमध्ये प्रवेश केला आणि इडीची ममी (शव) फोडली. स्वच्छतेचे कार्य आणि हाडांवरील वैज्ञानिक अभ्यास राज्यपाल आणि त्याच्या मुलीबद्दल आणि तत्कालीन ऐतिहासिक युगाबद्दल अधिक माहिती प्रकट करत राहतील, असे परिषदेच्या निवेदनात म्हटले आहे.

पाठिंब्याचे आश्वासन

“पर्यटन आणि पुरातत्त्व मंत्री शरीफ फथी यांनी प्राचीन इजिप्तच्या इतिहासातील आणखी रहस्ये उघड केल्याबद्दल इजिप्शियन पुरातत्त्व मोहिमांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि या मोहिमांना सर्वोत्तम प्रकारे कार्य पूर्ण करता यावे, यासाठी मंत्रालय पूर्ण पाठिंबा देईल,” असे पर्यटन आणि पुरातत्त्व मंत्रालयाने आश्वासन दिले आहे

Story img Loader