या आठवड्याच्या शेवटी नवी दिल्लीच्या प्रगती मैदानात भारत मंडपमसमोर G20 नेत्यांना अभिवादन करताना ‘२७ फूट उंचीची नटराज मूर्ती ’ म्हणजेच भगवान शिवाच्या नृत्याविष्काराची जगातील सर्वात उंच मूर्ती दिसेल. ही मूर्ती तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील स्वामीमलाई येथील शिल्पकारांनी तयार केली आहे. ही मूर्ती अष्टधातू (आठ-धातूंचा मिश्र धातु) पासून तयार केलेली असून सुमारे १८ टन वजनाची आहे. या मूर्तीचे स्थानांतर ३६ चाकांच्या ट्रेलरवरून करण्यात आले. ६१ वर्षीय श्रीकांदा स्थापथी, यांनी आपल्या भावांच्या मदतीने ही मूर्ती तयार केल्याचेनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, इतकेच नव्हे तर या मूर्तीचे नक्षीकाम आणि रचना यांची प्रेरणा भारतातल्या तीन मुख्य प्रसिद्ध मंदिरांमधील नटराजांच्या मूर्तींपासून घेतलेली आहे, असेही ते म्हणाले. या तीन प्रसिद्ध मंदिरांमध्ये चिदंबरममधील थिलाई नटराज मंदिर, कोनेराजापुरममधील उमा महेश्वर मंदिर आणि तंजावर येथील बृहदीश्वर मंदिर (बृहदेश्वर) यांचा समावेश होतो.

भगवान शिवाच्या नृत्य प्रकाराचा इतिहास आणि धार्मिक प्रतीके.

चोल आणि नटराज

भारत मंडपम नटराजाच्या शिल्पाने प्रेरणा घेतलेली तिन्ही मंदिरे मूलतः चोलांनी बांधली होती, चोल हे इसवी सन ९ व्या ते ११ व्या शतकात यशाच्या शिखरावर होते. चोलांनी भारताच्या बहुतांश द्वीपकल्पावर राज्य केले. चोल हे कला आणि उच्च संस्कृतीचे महान संरक्षक होते. कला आणि संस्कृतीचे इतिहासकार आणि ससेक्स विद्यापीठातील सेवानिवृत्त प्राध्यापक पार्थ मित्तर यांनी ‘इंडियन आर्ट’ (२००१) मध्ये नमूद केल्याप्रमाणे : “दक्षिण भारतातील चोलाकालीन कला आणि स्थापत्य हे तत्कालीन समृद्ध साम्राज्याच्या काळात निर्माण झाले होते.” यावरूनच चोला साम्राज्याचे सामर्थ्य लक्षात येते.

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Hashtag Tadev Lagnam
तेजश्री प्रधान-सुबोध भावे पहिल्यांदाच एकत्र झळकणार; ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

चोल हे धर्माभिमानी शैव होते, त्यांनी त्यांच्या प्रदेशात विस्तीर्ण शिवमंदिरे बांधली (तंजावरमधील मंदिरे ही चोला कलेचे प्रतिनिधित्त्व करतात). “चोल शिल्पकलेचा सर्वात महत्त्वाचा भाग असलेल्या प्रतिकांमध्ये, शैव शिल्पांचे प्राबल्य आहे, यात अतिशय उत्तम वैष्णव आणि जैन प्रतिमा फारश्या आढळत नाहीत” असे दक्षिण भारतातील अग्रगण्य इतिहासकार के.ए. नीलकांत शास्त्री यांनी ‘द चोलाज’ (१९३७) या आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. पाचव्या शतकापासून शिवाला शिल्पकलेत नटराजाच्या रूपात चित्रित करण्यात येत असले तरी, त्याचे सध्याचे, जगप्रसिद्ध स्वरूप चोलांच्या काळात विकसित झाले आहे. “नटराजाला वेगवेगळ्या स्वरूपात चोला काळात दर्शविण्यात आले .. नटराजाला चोल कांस्यांमध्ये प्रथम स्थान मिळाले,” असे शास्त्री यांनी नमूद करतात. शिवाच्या नटराजाच्या स्वरूपातील पाषाणात घडविलेल्या अनेक प्रतिमा आहेत, असे असले तरी गेल्या अनेक शतकांपासून नटराजाच्या कांस्य प्रतिमांनी सांस्कृतिक अनुबंध साधला आहे.

आणखी वाचा: मृत्यूनंतर खरंच जीवन आहे का? काय सांगतेय नवीन संशोधन?

नटराज- नृत्याचा देव

शिव, हा वैदिक देव रुद्रापासून उत्क्रांत झाल्याचे अभ्यासक मानतात. शिवाचा ठाव कोणालाही लागलेला नाही, पुराणे त्याने वर्णन करण्यास अनेकदा असमर्थ ठरतात. शिव नक्की कसा? ‘तो योगी आहे, तो पार्वतीचा प्रिय पती आहे, भक्तांचा लाडका भोळा सांबदेखील आहे. तो मृत्यू आणि काळ ( महाकाल ) आहे जो सर्व गोष्टींचा नाश करतो. परंतु तो एक महान तपस्वी आणि तपस्वींचा संरक्षकदेखील आहे; असे महान भारतशास्त्रज्ञ ए.एल. बाशम यांनी त्यांच्या क्लासिक ‘द वंडर दॅट वॉज इंडिया’ (१९५४) मध्ये शिवाचे वर्णन केले आहे. शिव हा ‘नृत्याचा देव’ किंवा नटराज देखील आहे, ज्याने “१०८ पेक्षा अधिक नृत्य प्रकारांचा शोध लावला होता, त्यात काही शांत आणि सौम्य, तर काही उग्र, कामुक आणि रौर्द्र नृत्य प्रकारांचा समावेश होतो,” असे बाशम यांनी नमूद केले आहे.

सर्वसाधारण शिव शंकरची नटराजाच्या स्वरूपात मूर्ती साकारताना, नटराज हा प्रभामंडलात दर्शविला जातो, शास्त्रींनी नमूद केल्याप्रमाणे हे प्रभामंडल जगाच्या- पृथ्वीच्या परिघाची प्रतिकृती आहे, जे प्रत्यक्ष शिव शंकर आपल्या नटराजाच्या रूपात व्यापतात, अशी व्याख्या शास्त्रींनी केली आहे. शिवाच्या नृत्यातील ऊर्जेमुळे त्याच्या जटा विस्तारल्या आहेत. नटराजाच्या पायाखाली एक बटू सारखी आकृती आहे, जी भ्रम दर्शवते, जी मानवजातीला भरकटवते. नागराजाच्या रूपात शिवाचे संपूर्ण शरीर लयबद्ध असून पायाखाली त्याने अज्ञानाला दाबले आहे. त्याच्या वरच्या उजव्या हातात त्याने डमरू ,धरले आहे, ज्याचा आवाज “सर्व प्राण्यांना त्याच्या लयबद्ध गतीमध्ये आकर्षित करतो”, आणि त्याच्या वरच्या डाव्या हातात, त्याने अग्नी (अग्नी) धारण केला आहे, ज्याचा वापर करून तो विश्वाचा नाश करू शकतो, असे शास्त्री यांनी नमूद केले आहे. तरीही, सर्व विध्वंसक प्रतिकांमध्ये, नटराज धीर देणारा आहे आणि या रूपात शिवाला संरक्षक म्हणून दर्शविले जाते. त्याच्या पुढच्या उजव्या हाताने, तो ‘अभयमुद्रा’ धारण करतो, त्याच्या पुढच्या डाव्या हाताने तो त्याच्या उंचावलेल्या पायांकडे निर्देश करतो आणि त्याच्या भक्तांना त्याच्या चरणांचा आश्रय घेण्यास सांगतो. नटराज नेहमीच एक व्यापक स्मित परिधान करतो. फ्रेंच इतिहासकार रेनी ग्रॉसेट यांनी नटराजाचे वर्णन करताना लिहिले आहे की, “तो मृत्यू आणि जीवन, वेदना आणि आनंदात सारखेच हसतो, किंवा त्याच्यासाठी मृत्यू आणि जीवन, आनंद आणि वेदना सारखेच आहेत.” ( हे शास्त्री यांनी ‘अ हिस्ट्री ऑफ साउथ इंडिया’, १९५५ मध्ये नमूद केले आहे).

आणखी वाचा: बंगालमधील ‘हे’ मारवाडी व्यापारी घराणे ठरले होते मुघल आणि ईस्ट इंडिया कंपनीचे कर्जदाते !

‘लॉस्ट-वॅक्स कास्टिंग’

२७ फूट उंच भारतमंडपम नटराजाची निर्मिती साकारणाऱ्या शिल्पकारांच्या गेल्या ३४ पिढ्या चोला पद्धतीच्या नटराजाच्या मूर्ती तयार करण्याच्या कलेत पारंगत होत्या. नटराजाच्या कांस्य मूर्ती ज्या प्रक्रियेद्वारे बनविल्या जातात त्या प्रक्रियेला ‘लॉस्ट-वॅक्स कास्टिंग’ पद्धत म्हटले जाते, ही पद्धत चोल काळापासून चालत आलेली आहे, असे स्थपथी यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. ‘लोस्ट-वॅक्स कास्टिंग’ पद्धत किमान ६,००० वर्षांपूर्वीच निर्माण झालेली असू शकते. मेहरगढ, बलुचिस्तान (सध्याचे पाकिस्तान) येथील नवाश्मयुगीन स्थळांवर या पद्धतीचा वापर करून तयार केलेला तांब्याच्या वस्तू सुमारे इसवी सन पूर्व ४००० वर्षांपूर्वी घडविण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे मोहेंजोदारोची डान्सिंग गर्ल देखील याच तंत्राचा वापर करून तयार करण्यात आली होती.
लोस्ट-वॅक्स कास्टिंग हे धातूची शिल्पे तयार करण्याचे सर्वात महत्त्वाचे तंत्र चोलांच्या काळात प्रगतीच्या शिखरावर होते. या पद्धतीमध्ये, प्रथम, तपशीलवार मेणापासून अपेक्षित प्रतिकृती बनविली जाते. त्यानंतर ती आकृती कावेरी नदीच्या काठावर सापडलेल्या गाळाच्या मातीपासून बनवलेल्या मिश्रणाने झाकली जाते. या मिश्रणाचे आवरण अनेक वेळा लावल्यानंतर, ते वळविले जाते, त्यानंतर हे मातीचे आवरण असलेली प्रतिकृती उच्च तापमानात भाजली जाते, ज्यामुळे त्याच्या आतील मेणाची प्रतिकृती वितळते, आणि एक पोकळी निर्माण होते आणि शेवटी मातीचा एक साचा उरतो, या साच्यात धातूचे मिश्रण ओतले जाते.

स्थापथी सारख्या कुशल कारागिरांसाठी, ही पद्धत द्वितीय स्वरूपाची आहे. सध्याच्या G20 लीडर्स समिटच्या स्थळावर असलेल्या नटराजाच्या शिल्पाचे आकारमान पाहता ते त्यांच्यासाठी वेगळे आव्हान होते. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एकूण सात महिने लागले आणि सुमारे १० कोटी रुपये खर्च आला.