भारतात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. लस हाच सध्या तरी करोनाला रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे लस कधी उपलब्ध होणार याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. भारतात सिरम इन्सिट्यूटकडून उत्पादन सुरु असलेली ऑक्सफर्डची लस आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन ही स्वदेशी लस मानवी चाचणीच्या तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्यावर आहे. जगातील काही लशी अंतिम फेज पूर्ण करण्याच्या खूप जवळ पोहोचल्या आहेत. मॉर्डना, फायझर, ऑक्सफर्ड आणि रशियाने स्पुटनिक व्ही लस किती टक्के परिणामकारक आहे, ते सुद्धा जाहीर केले आहे. लसीची परिणामकारकता आणि प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी ती एक ठराविक तापमानात स्टोअर करुन ठेवणे आवश्यक आहे. कारण निकषानुसार लशीचे स्टोअरेज झाले नाही, तर त्यातून अपेक्षित निकाल मिळणार नाही. एकच टेक्निक वापरुन लशीची निर्मिती केली असली तरी प्रत्येक लशीला वेगवेगळया तापमानात ठेवावे लागेल. लस उपलब्ध झाल्यानंतर ती स्टोअर करणे आणि वाहतूक एक मोठे आव्हान असणार आहे.

जगात लवकरच उपलब्ध होणाऱ्या काही लशी आणि त्यांना किती तापमानात ठेवावे लागेल, त्याबद्दल जाणून घेऊया.

Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
Dengue, chikungunya fever, Dengue Pune,
दिवाळीनंतर पुण्यात डेंग्यू, चिकुनगुन्याचा ताप अचानक कमी! जाणून घ्या कारणे
sex ministry in russia
‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?

फायझर लस

अमेरिकेतील फायझर आणि त्यांची भागीदार कंपनी बायोनटेकने मिळून लस बनवली आहे.

ही लस ९५ टक्के प्रभावी असल्याचा फायझरने म्हटले आहे. लवकरच ही लस अमेरिकेत उपलब्ध होईल.

भारतात ही लस स्टोअर करण्यासाठी तशा प्रकारची कोल्ड चेनची व्यवस्था नाहीय.

ही लस स्टोअर करण्यासाठी मायनस ६० डिग्री सेल्सिअस ते मायनस ९० डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्यकता आहे.

अंटार्क्टिकात हिवाळ्यात जे तापमान असते, त्या तापमानात लस स्टोअर करावी लागणार आहे.

भारतातच नाही तर जगातील अनेक देशात ही लस स्टोअर करण्यासाठी तशी सुविधा उपलब्ध नाहीय.

या तापमानात अन्य कुठल्या गोष्टी स्टोअर केल्या जातात ?

मायनस ४५ डिग्री सेल्सिअस ते मायनस ८६ डिग्री सेल्सिअस या तापमानात काही विषाणू, औषधे, रसायन, पेशींचे नुमने स्टोअर केले जातात.

 

मॉर्डना लस

मॉर्डनाची लस स्टोअर करण्यासाठी मायनस २० डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्यकता आहे.

पण ही लस + २ डिग्री ते + ८ डिग्री सेल्सिअस तापमानात स्टोअर करता येईल. (साध्या फ्रिजमध्ये महिनाभर ही लस राहू शकते.)

भारतामध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.

या तापमानात अन्य कुठल्या गोष्टी स्टोअर केल्या जातात ?

भारतात पोलिओची लस -२० डिग्री सेल्सिअस तापमानात स्टोअर केली जाते.

 

रशियाची स्पुटनिक व्ही लस

ही लस स्टोअर करण्यासाठी मायनस १८ डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्यकता आहे.

पण ही लस + २ डिग्री ते + ८ डिग्री सेल्सिअस तापमानात स्टोअर करता येईल.

भारतामध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. पण अजून किती कोल्ड चेनची गरज लागेल ते स्पष्ट नाहीय.

 

अस्त्राझेनेका-ऑक्सफर्ड लस

+ २ डिग्री ते + ८ डिग्री सेल्सिअस तापमानात ही लस स्टोअर करता येते.

भारतामध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. पण अजून किती कोल्ड चेनची गरज लागेल ते स्पष्ट नाहीय.

या तापमानात अन्य कुठल्या गोष्टी स्टोअर केल्या जातात ?

HEP-B अशा अनेक लशी या तापमाना स्टोअर केल्या जातात.

मॉर्डना आणि फायझर या अमेरिकन कंपन्यांनी MRNA तंत्र वापरुन लस बनवली. त्याच तंत्राने उबदार वातावरणात राहू शकेल, अशी लस निर्मिती करता येईल का?
जीनोव्हा बायोफर्मासिटिकल कंपनी + २ डिग्री ते + ८ डिग्री सेल्सिअस मध्ये स्टोअर करता येईल, अशी व्हॅक्सीन बनवण्याचा प्रयत्न करत आहे..
जर्मनी कंपनी क्युअर व्हॅक सुद्धा याच तंत्राने लस निर्मितीचा प्रयत्न करतेय