भारतात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. लस हाच सध्या तरी करोनाला रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे लस कधी उपलब्ध होणार याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. भारतात सिरम इन्सिट्यूटकडून उत्पादन सुरु असलेली ऑक्सफर्डची लस आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन ही स्वदेशी लस मानवी चाचणीच्या तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्यावर आहे. जगातील काही लशी अंतिम फेज पूर्ण करण्याच्या खूप जवळ पोहोचल्या आहेत. मॉर्डना, फायझर, ऑक्सफर्ड आणि रशियाने स्पुटनिक व्ही लस किती टक्के परिणामकारक आहे, ते सुद्धा जाहीर केले आहे. लसीची परिणामकारकता आणि प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी ती एक ठराविक तापमानात स्टोअर करुन ठेवणे आवश्यक आहे. कारण निकषानुसार लशीचे स्टोअरेज झाले नाही, तर त्यातून अपेक्षित निकाल मिळणार नाही. एकच टेक्निक वापरुन लशीची निर्मिती केली असली तरी प्रत्येक लशीला वेगवेगळया तापमानात ठेवावे लागेल. लस उपलब्ध झाल्यानंतर ती स्टोअर करणे आणि वाहतूक एक मोठे आव्हान असणार आहे.
Explained: करोनाच्या वेगवेगळया लशी स्टोअर करण्यासाठी किती तापमान लागेल? समजून घ्या…
लस उपलब्ध झाल्यानंतर ही असतील आव्हाने....
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-11-2020 at 18:08 IST
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The optimal temperature for storage of front runner covid 19 vaccines dmp