गुगलनंतर आता अॅपलही वापरात नसलेले अॅप्स काढून टाकण्याच्या तयारीत आहे. अॅपलने त्यांच्या अॅप स्टोरमधून बऱ्याच काळापासून अपडेट न केलेले अॅप्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. युजर्स काही अॅप डाउनलोड करत नसल्याचं अॅपलच्या लक्षात आलं आहे. अॅपल ज्या डेव्हलपर्सने गेल्या तीन वर्षांत त्यांचे अॅप्स अपडेट केले नाहीत, तसेच अॅप्स किमान डाउनलोड संख्येपर्यंत पोहोचत नाहीत त्यांना नोटीस पाठवत आहे. अॅपलने डेव्हलपर्संना ईमेल पाठवला असून शीर्षक ‘App Improvement Notice’ असं लिहिलं आहे. या ईमेलमध्ये अॅपलने डेव्हलपर्सला इशारा दिला आहे की, अॅप स्टोअरमध्ये बऱ्याच काळापासून अपडेट न केलेले अॅप्स काढून टाकले जाणार आहेत. यासाठी डेव्हलपरला अॅप्स अपडेट करण्यासाठी फक्त ३० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. यामुळे अॅप्स डेव्हलपर्सचे धाबे दणाणले आहेत. गेल्या ६ वर्षांत कंपनीने २८ हजारांहून अधिक अॅप्स आणि गेम्स स्टोअरमधून काढून टाकले आहेत.
अॅपल अॅप स्टोअरमधून जुने अॅप्स काढून टाकले तरी, ज्या युजर्सच्या फोनवर आधीपासून डाउनलोड केलेले अॅप्स आहेत. त्यांच्या डिव्हाइसवर अॅप्स तसेच राहतील. प्रोटोपॉप गेम्स डेव्हलपर रॉबर्ट काबवे सारख्या अनेक अॅप निर्मात्यांनी या अपडेटबद्दल त्यांच्या चिंता व्यक्त केल्या आहेत. “युनिटी इंजिनच्या नवीनतम आवृत्तीवर मोटिवोटो अद्यतनित करणे, पुनर्बांधणी करणे आणि पुन्हा सबमिट करण्यास बराच वेळ लागेल. अॅपलने अॅप निर्मात्याला सांगितले नाही की, गेममध्ये काही तांत्रिक समस्या आहेत की नाही, ज्यामुळे चाचणी दरम्यान वेळ वाचू शकला असता.
अॅपल अॅप स्टोअरमधून कालबाह्य अॅप्स काढणार!
- गुगलने जे अॅप कालबाह्य झाले आहेत आणि प्ले स्टोरच्या सुरक्षा मानकांनुसार नाहीत ते लवकरच अॅप स्टोअरमधून काढले जातील, असा पवित्रा घेतला आहे. आता अॅपलने डेव्हलपर्संना ईमेल पाठवण्यास सुरुवात केली आहे. बऱ्याच काळापासून अपडेट न केलेले अॅप्स अॅप स्टोअरमधून काढले जातील, असं सांगितलं आहे.
- अॅपलने कालबाह्य अॅप्लिकेशन्स काढून टाकण्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी, कंपनीकडून ईमेल मिळाल्यानंतर अनेक डेव्हलपर्संनी ट्विटरवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्यापैकी काहींनी मायक्रोब्लॉगिंग साइटवर मत व्यक्त करत लिहिलं आहे की, अॅपल त्यांना त्यांचे अॅप्स अपडेट करण्यासाठी पुरेसा वेळ देत नाही. दुसरीकडे काही अॅप्सना अपडेट किंवा लाइव्ह सर्व्हिस मॉडेलची आवश्यकता नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
- अॅपलने अहवालात नमूद केले आहे की कालबाह्य अॅप्स नवीन युजर्संना दिसतील आणि डेव्हलपर्संनी ३० दिवसांत अपडेट केल्यास ते अॅप स्टोअरवरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील.
- ३० दिवसांत कोणतेही अपडेट सबमिट न केल्यास, अॅप विक्रीतून काढून टाकले जाईल. पण पूर्वी डाउनलोड केलेले अॅप्स वापरकर्त्यांच्या डिव्हाइसवर राहतील. कारण अॅपल कदाचित कालबाह्य अॅप्स लपवू शकते.
- गुगलने अँड्रॉइड डेव्हलपर्सना त्यांचे अॅप अपडेट करण्यासाठी काही महिन्यांचा वेळ दिला आहे. त्यांच्याकडे १ नोव्हेंबर २०२२ पर्यंत वेळ आहे आणि डेव्हलपर्स वेळेवर अपडेट सबमिट करू शकत नसल्यास सहा महिन्यांच्या मुदतवाढीसाठी अर्ज करण्याचा पर्याय देखील कंपनीने दिला आहे.