गुगलनंतर आता अॅपलही वापरात नसलेले अॅप्स काढून टाकण्याच्या तयारीत आहे. अॅपलने त्यांच्या अॅप स्टोरमधून बऱ्याच काळापासून अपडेट न केलेले अॅप्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. युजर्स काही अॅप डाउनलोड करत नसल्याचं अॅपलच्या लक्षात आलं आहे. अॅपल ज्या डेव्हलपर्सने गेल्या तीन वर्षांत त्यांचे अॅप्स अपडेट केले नाहीत, तसेच अॅप्स किमान डाउनलोड संख्येपर्यंत पोहोचत नाहीत त्यांना नोटीस पाठवत आहे. अॅपलने डेव्हलपर्संना ईमेल पाठवला असून शीर्षक ‘App Improvement Notice’ असं लिहिलं आहे. या ईमेलमध्ये अॅपलने डेव्हलपर्सला इशारा दिला आहे की, अॅप स्टोअरमध्ये बऱ्याच काळापासून अपडेट न केलेले अॅप्स काढून टाकले जाणार आहेत. यासाठी डेव्हलपरला अॅप्स अपडेट करण्यासाठी फक्त ३० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. यामुळे अॅप्स डेव्हलपर्सचे धाबे दणाणले आहेत. गेल्या ६ वर्षांत कंपनीने २८ हजारांहून अधिक अॅप्स आणि गेम्स स्टोअरमधून काढून टाकले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा