केंद्र सरकारने भारतीय युवकांना लष्करी सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी मागच्या वर्षी ‘अग्निपथ’ योजना सुरू केली. या माध्यमातून भारतीय लष्करात चार वर्षांकरिता सेवा देण्याचा मार्ग मोकळा झाला. योजना सुरू होण्यापूर्वी देशभरात या योजनेविरोधात युवकांचा असंतोष पाहायला मिळाला. विरोधकांनीही या योजनेची आवश्यकता नसल्याचे सांगितले. आता पुन्हा एकदा ही योजना चर्चेत आली आहे. अग्निपथ योजनेंतर्गत सैन्यात भरती झालेल्या एका अग्निवीराचा शनिवारी सियाचीन येथे मृत्यू झाला. त्यानंतर अग्निवीरांच्या सुरक्षेसंबंधी प्रश्न निर्माण झाला आहे. तरुण अग्निवीर मृत्युमुखी पडल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना काय मिळणार? पेन्शन सुरू होणार का? याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. काँग्रेसने आरोप केला की, देशासाठी बलिदान देणाऱ्या हिरोंचा हा अवमान आहे. शहीद झालेल्या अग्निवीराच्या कुटुंबीयांना कोणताही मोबदला किंवा पेन्शन दिली गेली नाही, असा आरोप काँग्रेसने केला. केंद्र सरकारने या आरोपांची दखल घेतली असून लष्कराने यावर प्रत्युत्तर दिले आहे.

अग्निवीराचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना मोबदल्यात काय मिळणार? त्याबाबत नियम काय आहेत? यासंबंधी फर्स्टपोस्ट या संकेतस्थळाने आढावा घेतला आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी देत आहोत.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
fox death Mumbai, Third fox death, fox ,
मुंबई : रेबीजमुळे आणखी एका कोल्ह्याचा मृत्यू, तीन महिन्यांतील कोल्ह्याच्या मृत्यूची तिसरी घटना
container ran into food court, Khalapur,
खालापूर जवळ नियंत्रण सुटल्याने कंटेनर फुड कोर्टमध्ये घुसला; एकाचा मृत्यू, तीन वाहनांचे नुकसान
deputy chief minister validity loksatta
विश्लेषण : ‘उपमुख्यमंत्री’ असे घटनात्मक पदच नाही… मग शपथ घेणे कितपत योग्य? न्यायालय काय म्हणते?
nashik youth murder latest marathi news
नाशिकमध्ये युवकाची हत्या, चार संशयित ताब्यात

महाराष्ट्रातील अग्निवीराचा मृत्यू

शनिवारी (२१ ऑक्टोबर) सियाचिन हिमनदी येथे महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील अक्षय लक्ष्मण गवते या अग्निवीराचा मृत्यू झाला. सियाचीन ही जगातील सर्वांत उंचावरील युद्धभूमी म्हणून ओळखली जाते. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार- उंचावर तैनात केल्यानंतर अक्षयच्या शरीरात वैद्यकीय गुंतागुंत निर्माण झाली; ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्स या तुकडीने एक्स या सोशल मीडियावर (जुने ट्विटर) अक्षयला श्रद्धांजली वाहिली.

हे वाचा >> बुलढाणा : अग्निवीर अक्षय गवतेंच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार; देशप्रेमी ग्रामस्थांचीही मानवंदना

“सियाचीनच्या उत्तुंग अशा उंचीवर फायर अँड फ्युरी कॉर्प्स तुकडीतील रँकवरील सर्व जवान अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते याने कर्तव्यावर असताना दिलेल्या बलिदानाबद्दल मानवंदना देत आहोत. अक्षयच्या कुटुंबाप्रति आम्ही मनापासून शोक व्यक्त करतो”, असे ट्विटमधील मजकुरात लिहिण्यात आले आहे.

मागच्या वर्षी सुरू झालेल्या अग्निपथ योजनेंतर्गतचा अक्षय गवते हा पहिलाच अग्निवीर आहे; ज्याचा मृत्यू झाला. त्याआधी आणखी एक अग्निवीर; ज्याची नंतर ओळख पटली त्याl अमृतपाल सिंग याने ११ ऑक्टोबर रोजी जम्मू व काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये सेन्ट्री ड्युटीवर असताना आत्महत्या केली. तथापि, त्याने स्वतःला दुखापत केल्यामुळे त्याला कोणताही सन्मान देण्यात आला नाही.

पेन्शन आणि आर्थिक मोबदल्यावरून वाद

भारतीय लष्कराने अग्निवीर अक्षय गवतेचा मृत्यू झाल्याचे जाहीर करताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका करीत हा देशातील शूर वीरांचा अवमान असल्याचे म्हटले. “एका तरुणाने देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्याला ग्रॅच्युइटी नाही, लष्करी सेवेतील काहीही सुविधा नाहीत आणि तो शहीद झाल्यावर त्याच्या कुटुंबीयांना कोणतीही पेन्शन नाही. अग्निपथ योजना भारतातील वीर जवानांचा अवमान करण्यासाठी तयार करण्यात आलेली योजना आहे”, अशी टीका राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवर केली.

देशातील अनेक राजकारणी आणि लष्करातून निवृत्त झालेल्या अनेक अधिकाऱ्यांनी अक्षयच्या कुटुंबीयांना पेन्शन मिळणार नसल्याचे सांगितले.

वकील नवदीप सिंग यांनी लष्करी पेन्शन या विषयावर पुस्तक लिहिलेले आहे. त्यांनी एक्सवर लिहिले, “गंमत म्हणजे नागरी सेवेत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणाऱ्या तो किंवा तिचा सुटीवर असताना मद्याच्या अमलाखाली अपघाती मृत्यू झाल्यास किंवा घरी असताना आत्महत्या केल्यास त्याच्या किंवा तिच्या कुटुंबाला पेन्शनचा लाभ मिळतो. परंतु, सियाचीनसारख्या कठीण प्रदेशात सेवा देत असताना मृत्यू झाल्यानंतर अग्निवीरांच्या कुटुंबीयांना मोबदला किंवा पेन्शन मिळत नाही. (अतिशय भेदक आणि असंवेदनशील उदाहरण दिल्याबद्दल क्षमस्व)”

हवाई दलातील निवृत्त व्हाइस मार्शल मनमोहन बहादूर यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, सियाचीनमध्ये अक्षय गवतेसह नियमित सेवेत असणाऱ्या दुसऱ्या सैनिकाचा मृत्यू झाला असता, तर त्याच्या कुटुंबीयांना सेवेचे सर्व लाभ मिळाले असते. याचा अर्थ तेच काम, तीच सेवा देऊनही लाभ वेगवेगळे मिळत आहेत.

हे वाचा >> अग्निवीरांचे प्रशिक्षण कुठे आणि कसे सुरु आहे? त्यांचे पुढे काय होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती

लष्कराचे अधिकारी काय म्हणाले?

अक्षय गवतेच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना काही मोबदला मिळणार की नाही? हा वाद उफाळल्यानंतर लष्कराने कर्तव्यात असताना मृत्यू होणाऱ्या अग्निवीरांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या मानधनासंदर्भात एक निवेदन काढून स्पष्टीकरण दिले.

लष्कराने सांगितले की, सेवेत रुजू होण्यापूर्वी ठरलेल्या अटी-शर्तींनुसार शहीद होणाऱ्या अग्निवीरांच्या कुटुंबीयांना ४८ लाखांच्या विम्याचा लाभ मिळेल. तसेच नुकसानभरपाई म्हणून आणखी ४४ लाख रुपये देण्यात येतील. अग्निवीराच्या मानधनातील ३० टक्के सेवा निधीमध्ये सरकारकडून तेवढ्याच प्रमाणातील रक्कम टाकली जाईल आणि त्यावरील व्याज मिळून जी रक्कम होईल, तीही कुटुंबीयांना प्रदान करण्यात येईल.

तसेच ज्या तारखेला अग्निवीराचा मृत्यू झाला, त्या तारखेपासून ते त्याची सेवा समाप्त होण्याच्या तारखेपर्यंत (१३ लाखांहून अधिकची रक्कम) अग्निवीराच्या मानधनाचाही लाभ कुटुंबीयांना मिळेल. अक्षयच्या शिल्लक रहिलेल्या सेवेच्या कार्यकाळानुसार होणारे मानधन आणि सशस्त्र सेना लढाई अपघात निधीतून आठ लाखांचे योगदानही यासह देण्यात येणार आहे. AWWA (Army Wives Welfare Association) कडून ३०,००० रुपयांची तत्काळ मदत शहिदाच्या कुटुंबीयांना दिली जाईल, असेही यावेळी जाहीर करण्यात आले.

राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवर टाकलेला मजकूर पूर्णपणे टाकाऊ आणि बेजबाबदार स्वरूपाचा आहे, अशी टीका भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केली. मालवीय म्हणाले की, राहुल गांधी यांनी खोट्या बातम्या (#FakeNews) पसरविणे बंद केले पाहिजे. तुमची पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा आहे; मग त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा.

हे वाचा >> “…म्हणून अग्निवीर अमृतपाल सिंग यांच्या पार्थिवाला गार्ड ऑफ ऑनर दिला नाही”, भारतीय लष्कराने दिलं स्पष्टीकरण

अग्निवीरासंबंधी आणखी काय काय वाद झाले?

या महिन्याच्या सुरुवातीला जम्मू-काश्मीरमध्ये अग्निवीराच्या मृत्यूनंतर अशाच प्रकारे वाद निर्माण झाला होता. लष्करी इतमामात संबंधित अग्निवीरावर अंत्यसंस्कार न केल्यामुळे सैन्यदलाला टीकेचा सामना करावा लागला होता. त्यांतर जम्मूमधील व्हाइट कॉर्प्सने एक निवेदन जाहीर करून सांगितले की, १९ वर्षीय अमृतपाल सिंग याने राजौरी जिल्ह्यात कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून घेतली. लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्वतःवर गोळी झाडून घेणाऱ्याला कोणतीही सैनिकी सलामी मिळत नाही.

Story img Loader