गेल्या काही वर्षांपूर्वी “जर बोईंग नाही, तर मी काही विमान प्रवास करणार नाही” असं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून म्हटलं जायंच. खरं तर अमेरिकन एरोस्पेस कंपनीच्या गुणवत्ता अन् सुरक्षेवर प्रवाशांचा असलेल्या विश्वासाचा हा एक पुरावाच असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मागील काही दिवसांपासून बोइंग कंपनीचे ७३७ MAX विमान संकटात सापडले आहे, ज्यामुळे सुरक्षेच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. अमेरिकेत बोईंग ७३७ मॅक्स ९ विमानांच्या वापरावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. विमान वाहतूक नियामकांनी ही बंदी घातली आहे. या आदेशामुळे सुमारे १७१ बोईंग ७३७ मॅक्स ९ विमानांवर परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अलास्का एअरलाइन्सच्या उड्डाणदरम्यान बोईंग ७३७ मॅक्स ९ मधल्या विमानाच्या खिडकी आणि मुख्य भागाचे नुकसान झाले होते. त्यानंतर हवाई वाहतूक नियामक DGCA ने देशांतर्गत विमान कंपन्यांना त्यांच्या ताफ्यात समाविष्ट असलेल्या सर्व ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ विमानांच्या आपत्कालीन एक्झिट गेट्सची त्वरित तपासणी करण्याचे निर्देश दिले होते.

५ वर्षांत २ सीईओ बदलले

विमान उत्पादक कंपनी बोईंगचे सीईओ डेव्ह कॅल्हॉन या वर्षाच्या अखेरीस आपले पद सोडणार आहेत. प्रसिद्ध अमेरिकन कंपनी सतत अपघातांमुळे संकटाचा सामना करीत आहे. व्यावसायिक विमान विभागाचे प्रमुख स्टॅन डील यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी स्टेफनी पोप यांनी केली आहे. कंपनीच्या बोर्डाचे अध्यक्ष लॉरेन्स केलनर मेमध्ये पुन्हा निवडणूक घेणार नसून त्यांची जागा क्वालकॉमचे माजी सीईओ स्टीव्ह मोलेनकॉफ यांना मिळणार आहे. अलास्का एअरलाइन्सची घटना हा एक दुर्दैवी क्षण होता. बोइंगने संपूर्ण पारदर्शकतेने त्याला प्रतिसाद दिलेला असून, आमच्या कंपनीच्या प्रत्येक स्तरावर सुरक्षितता आणि गुणवत्तेसाठी संपूर्ण वचनबद्धता पाळली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितले. इंडोनेशियामध्ये २०१८ मध्ये आणि इथिओपियामध्ये २०१९ मध्ये विमान अपघातात अनेकांचा मृत्यू झाला. या घटनांनंतर ७३७ मॅक्स विमान सुमारे २० महिने उडू शकली नव्हती.

Youth killed after being hit by vehicle Mumbai news
वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
mh 370 flight
१० वर्षांनंतर उलगडणार २३९ प्रवाशांसह बेपत्ता झालेल्या विमानाचे गूढ? नेमके प्रकरण काय?
Jaipur Chemical tanker Explosion
Jaipur Chemical Tanker Explosion : केमिकल टँकरचा भीषण स्फोट, ४ जणांचा होरपळून मृत्यू; महामार्ग ठप्प, कुठे घडली धक्कादायक घटना?
56 people rescued due to JNPA vigilance
जेएनपीएच्या सतर्कतेने ५६ जण बचावले; बचावकार्यात पायलट बोटीची महत्त्वाची भूमिका
Tarun Bhati boating accident survivor doctors of St George Hospital
प्रवासी बोटीला जलसमाधी, नौदलाच्या ‘स्पीड बोटी’ची धडक; १३ मृत्युमुखी
Loksatta explained What is the new controversy related to the Bangladesh war victory
विश्लेषण: बांगलादेश युद्धविजयाशी संबंधित नवा वाद काय?
navi Mumbai in last few years accident and death decreased
पालिकेच्या परिवहन उपक्रमात अपघातांच्या संख्येत मात्र घट

हेही वाचाः काँग्रेसने अख्खे बेट श्रीलंकेला आंदण दिले? पंतप्रधान मोदींनी टीका केलेले हे प्रकरण नक्की आहे तरी काय?

विमानाचा एक दरवाजा १६ हजार फूट उंचीवर निखळला

५ जानेवारी २०२४ रोजी अमेरिकेत अलास्का एअरलाइन्सच्या विमानाचा एक दरवाजा १६ हजार फूट उंचीवर निखळल्यामुळे या विमानाला तातडीने जवळच्याच विमानतळावर उतरावे लागले. विमानातील १७१ प्रवासी आणि सहा कर्मचाऱ्यांपैकी कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. उड्डाणानंतर काही मिनिटांनी विमानाचा संकटकालीन दरवाजा निसटला. तो विमानापासून वेगळा होऊन खाली पडला. यामुळे १६ हजार फूट उंचीवर असलेल्या विमानात हवेचा जोरदार प्रवाह शिरला. त्यामुळे तातडीने विमान जवळच्याच विमानतळावर उतरवावे लागले. त्यावेळी अमेरिकेतील विमान उत्पादक कंपनी बोईंगने या प्रकरणात आपली चूक मान्य केली. ‘पहिली गोष्ट म्हणजे आम्ही आमची चूक कबूल करीत आहोत. यात १०० टक्के पारदर्शक पद्धतीने पावले उचलली जातील, असा प्रकार पुन्हा कधीच घडणार नाही,’ असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह कॅल्हॉन यांनी म्हटले आहे.

बोइंगच्या विमानात नेमक्या समस्या काय?

बोईंगचे ७३७ मॅक्स मॉडेल सर्वाधिक वादग्रस्त राहिले. इंडोनेशियामध्ये २०१८ मध्ये आणि इथिओपियामध्ये २०१९ मध्ये विमान अपघातात ३४६ जणांचा मृत्यू झाला. या घटनांनंतर ७३७ मॅक्स विमानं सुमारे २० महिने उडू शकली नव्हती. ही विमानं जगभर चर्चेत राहिली. यानंतर कंपनीने आपल्या फ्लाइट कंट्रोल सिस्टमच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल केले. परिणामी, २०२१ मध्ये या मॉडेलची उड्डाणे पुन्हा सुरू झाली. फ्रेंच कंपनी एअरबसची विमाने बहुतेक भारतात वापरली जातात. देशातील डझनभर विमान कंपन्यांकडे ४७८ एअरबस आहेत, त्यानंतर बोईंग १३५ विमाने आहेत. बोइंगची विमाने मे २०१७ मध्ये सेवेत दाखल झाली. ऑक्टोबर २०१८ मध्ये इंडोनेशियातील लायन एअर ७३७ मॅक्स विमान दुर्घटनाग्रस्त झाले. त्यात १८९ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर मार्च २०१९ मध्ये इथियोपियन एअरलाइन्स ७३७ मॅक्स दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्यातही १५७ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर विमानातील सदोष प्रणालीला यासाठी जबाबदार धरण्यात आले होते. त्यावेळी नव्या प्रणालीची माहिती लपवल्याबद्दल बोइंगकडून FAA ने शुल्कही आकारले होते. तेव्हा बोइंगने २.५ अब्ज डॉलर दंड भरण्याचे मान्य केले. अनेक महिन्यांच्या तपास, सुधारणा अन् चाचणीनंतर नोव्हेंबर २०२० मध्ये ७३७ मॅक्स विमानाला पुन्हा उड्डाणासाठी मंजुरी मिळाली. त्यानंतर भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) ऑगस्ट २०२१ ७३७ मॅक्स विमानांना आकाशात उड्डाणास परवानगी दिली. गेल्या काही वर्षांमध्ये ७३७ मॅक्स विमानाने हळूहळू विश्वास परत मिळवला होता, परंतु विमानाला सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या गुणवत्तेच्या समस्यांना वारंवार सामोरे जावे लागत आहे.

विमान कंपनीनं गुणवत्तेपेक्षा नफ्याकडे दिला जास्त भर

विमान वाहतूक तज्ज्ञ आणि बोईंगचे माजी कर्मचारी, तसेच उद्योग निरीक्षक अन् विश्लेषकांनी बोइंगवर गंभीर आरोप केले आहेत. खरं तर संकटाच्या मुळाशी बोइंगचे नफ्याचे वेड असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे गुणवत्ता आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यात आले. परंतु गुणवत्तेपेक्षा नफ्याला प्राधान्य दिल्याचा आरोपांचं बोइंगने खंडन केले आहे. खरं तर अमेरिकेतील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या बोइंगने त्यांचे दीर्घकाळचे विमान निर्माता प्रतिस्पर्धी मॅकडोनेल डग्लस यांना विकत घेतले होते, जे त्यावेळी देशातील दहाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे विलीनीकरण होते. परिणामी मॅकडोनेल डग्लस यांनी बोइंगचे नाव घेतले. त्यानंतर अभियांत्रिकी, गुणवत्ता आणि सुरक्षितता यावरचा खर्च कमी करून नफा वाढवण्यावर त्यांनी भर दिला. बोइंगने स्वतःलाच त्यांच्या सर्व विमानाचे पार्ट्सच्या निर्मात्यांपैकीच एक म्हणून विमान डिझायनर आणि असेम्बलर म्हणून पाहण्यास सुरुवात केली. काही अडचणीतून बाहेर पडण्यासाठी बोइंगने काही युनिट्स बंदसुद्धा केली. उदाहरणार्थ, बोइंगने कॅन्सस येथील विभाग २००५मध्ये बंद केला होता. ते फ्यूजलेज आणि इतर काही भाग तयार करीत होते आणि बोइंगसाठी एक प्रमुख पुरवठादार झाले होते. गेल्या काही वर्षांमध्ये बोइंग विमानांच्या गुणवत्तेशी संबंधित अनेक समस्या उद्भवल्या होत्या. ज्यात ७३७ मॅक्स विमानामध्ये काही समस्या असल्याचं समोर आलं होतं.

भारत आणि 737 MAX

आकासा एअरने १५० बोईंग ७३७ मॅक्स विमानांची ऑर्डर दिली होती. दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत अस्तित्वात आलेली एअरलाइन आपल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्सचा विस्तार करू इच्छित आहे, ज्यासाठी तिने ही ऑर्डर दिली आहे. एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे की, नव्या ऑर्डरमध्ये ७३७ मॅक्स १० आणि ७३७ मॅक्स ८ जेटचा समावेश आहे. यामुळे एअरलाइन्सला २०३२ पर्यंत २०० विमाने मिळू शकणार आहेत. यामुळे कंपनीच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विस्तार योजनांना बळ मिळेल. Akasa Air ने २०२१ मध्ये ७२ Boeing ७३७ Max विमानांची प्रारंभिक ऑर्डर दिली होती. यानंतर कंपनीने जून २०२३ मध्ये चार बोईंग ७३७ मॅक्स ८ विमानांची ऑर्डर दिली. भारताकडे सध्या ७३७ मॅक्स प्रकारातील ४० पेक्षा जास्त विमाने आहेत. एअर इंडिया समूहानेही गेल्या वर्षी १९० मॅक्स विमानांची ऑर्डर दिली होती. परंतु जानेवारीमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर DGCAनेही सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे. सध्या DGCA ७३७ मॅक्सवरील FAA च्या कृतींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत आकासा आणि एअर इंडिया या दोन्ही समूहाने बोइंगच्या विमानांवर विश्वास व्यक्त केला आहे.

Story img Loader