शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि इतर आर्थिक साधने गुंतवणुकीच्या पर्यायांचा भाग होण्याच्या आधीपासूनच भारतात संपत्ती जमवण्यासाठी सोने हा एक पसंतीचा मार्ग आहे. महागाई किंवा कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अनिश्चिततेपासून बचाव करण्यासाठी सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहिले जाते. सोने खरेदी करण्याव्यतिरिक्त (जसे की सोन्याचे दागिने, नाणी इ.), कोणीही सार्वभौम गोल्ड बाँड्स (SGBs), डिजिटल सोने आणि गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) यांसारख्या साधनांचा वापर करून सोन्यात गुंतवणूक करू शकतो. भारतातील सोन्याच्या किमती ऐतिहासिक पातळीपर्यंत वाढत असताना गुंतवणूकदारांनी काय करायला हवे ते जाणून घेऊ यात.

सोन्याला गुंतवणुकीसाठी प्राधान्य का दिले जाते?

मूल्य, भांडवल, तसेच क्रयशक्ती जपण्यासाठी सोन्याला सर्वोत्कृष्ट गुंतवणूक म्हणून सर्वत्र ओळखले जाते. ॲक्सिस सिक्युरिटीजचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक देवेया गगलानी यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांमध्ये देशांतर्गत बाजारात सोन्याने ५० टक्क्यांहून अधिक चक्रवाढ वार्षिक वाढीच्या दराने (CAGR) परतावा दिला आहे.

Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Rupee depreciated by 5 paise against the dollar
ढासळता रुपया नव्या तळाला; डॉलरच्या तुलनेत ५ पैशांनी घसरून ८४.३७ चा नीचांक
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Gold Silver Price Today 08 November 2024 in Marathi
Gold Silver Price Today : लग्नसराईपूर्वी सोने -चांदीच्या दरात घसरण! जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील दर
Exports of the country crossed the mark of 800 billion dollars
देशाची निर्यात ८०० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडेल!
On Wednesday November 6 Nagpur saw slight fall in silver prices and increase in gold prices
दिवाळीनंतर सोने चांदीच्या दरात बदल; एकात वाढ, दुसऱ्यात घट…
swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे प्रादेशिक सीईओ सचिन जैन यांच्या मते, भारतात अक्षय्य तृतीया किंवा लग्नसोहळ्यांसारख्या शुभ प्रसंगी सोने हे जनतेच्या केंद्रस्थानी असते, जेथे ग्राहक नाणी, बार, दागिने या स्वरूपात सोने खरेदी करून आनंद साजरा करतात. डिजिटल सोने खरेदी करण्याकडेही लोकांचा कल वाढला आहे.

“भारतीय घरांमध्ये सोन्याबद्दल मजबूत सांस्कृतिक आत्मीयता आहे आणि किमतीतील वाढीमुळे गुंतवणूक मालमत्ता म्हणून सोन्याची मागणी अधिक बळकट झाली आहे, परिणामी गोल्ड ETF मध्ये ग्राहकांची आवड वाढली आहे. मजबूत सांस्कृतिक संबंध लक्षात घेता सोन्याच्या किमतीतील कोणत्याही अल्पकालीन नरमाईमुळे अक्षय्य तृतीयेला सोन्याची विक्रमी मागणी दिसून येईल,” असेही जैन म्हणाले.

सोन्याचे भाव किती वाढले?

प्रामुख्याने भू राजकीय तणावामुळे आणि केंद्रीय बँकांकडून सोन्याचा साठा जमा झाल्यामुळे सोन्याच्या किमती अलीकडेच भारतातील ७० हजार रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचल्या आहेत, जे यंदा यूएस फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांनी अवलंबलेल्या बेगडी भूमिकेपेक्षा जास्त आहे, असेही गगलानी म्हणाले.

“देशांतर्गत सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकाच्या जवळ असल्याने तत्काळ सोन्याच्या किमतीत तांत्रिक सुधारणा होण्याची शक्यता आहे,” असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे कमोडिटीजचे प्रमुख हरेश व्ही म्हणाले. परंतु दीर्घकाळात मजबूत परदेशातील किमती आणि वाढलेली भौतिक मागणी अन् कमकुवत रुपया यामुळे सोने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधणार आहे, असेही ते म्हणाले.

सोन्याच्या गुंतवणुकीवर परताव्याची अपेक्षा काय?

“गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सोन्याने मिळणाऱ्या उत्पन्नात यंदाच्या मंदीचा अनुभव घेतलाय, असा आम्हाला विश्वास आहे. या वर्षाच्या अखेरीस फेडने व्याजदरात अपेक्षित शिथिलता दिल्याने अमेरिकन डॉलरचे मूल्य मजबूत होणे हे महत्त्वाचे आहे,” असंही पीएल वेल्थ मॅनेजमेंटचे मुख्य व्यवसाय अधिकारी शशांक पाल म्हणाले. तसेच जगातील मध्यवर्ती बँका सध्या खरेदीच्या मोहिमेवर आहेत. पुढील एक किंवा दोन तिमाहीत अशा प्रकारचा वेग निश्चितपणे कमी होणार आहे, त्यामुळे मागणी लक्षणीयरीत्या कमी होईल, असे पाल पुढे म्हणाले.

गुंतवणूकदारांनी काय करावे?

सोने ही सर्वोत्तम दीर्घकालीन संपत्तीपैकी एक आहे, जी तिच्या गुंतवणूकदारांना सुरक्षितता आणि योग्य परतावा देते. गेल्या ५ वर्षांत देशांतर्गत सोन्याचे दर दुप्पट झाले आहेत आणि २००३ पासून ते १० पटीने वाढले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार दीर्घकालीन फायद्यासाठी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सोने जोडू शकतात, असे हरेश म्हणाले. विश्लेषक मोठी खरेदी करण्यापेक्षा लहान मूल्यांमध्ये सोने खरेदी करण्याचा सल्ला देतात. अक्षय्य तृतीयेदरम्यान सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी बाजारातील कल, मध्य पूर्व संकटासारख्या भू-राजकीय घटना आणि यूएस फेडरल रिझर्व्हद्वारे व्याजदर कपातीला होणारा विलंब आणि स्वतःची आर्थिक उद्दिष्टे यांसारख्या घटकांचा विचार करावा, असेही एलकेपी सिक्युरिटीजचे जतीन त्रिवेदी म्हणाले. धोरणात्मकपणे खरेदीची वेळ ठरवून आणि गुंतवणुकीत वैविध्य आणल्याने जोखीम कमी करण्यात आणि दीर्घकाळात जास्तीत जास्त परतावा मिळण्यास मदत होऊ शकते, असे ते म्हणाले. BankBazaar.com चे CEO Adhil Shetty यांच्या मते, सोन्याच्या किमती तेजीत वाढतात आणि त्यानंतर कमी कालावधीत किमती स्थिर राहतात किंवा घसरतात.

दुसरे म्हणजे भौतिक सोन्यामध्ये खूप तरलता असते. सोन्याचे दागिन्यांमध्ये मेकिंग चार्जेस आणि जीएसटी यांसारख्या घटकांचाही समावेश असतो, त्यामुळे काही प्रमाणात सोन्याचे मूल्य २०-२५ टक्क्यांपर्यंत घसरते. “सोन्याची नाणी ही समस्या सोडवत असताना भौतिक सोन्याची विक्री करणे कठीण आहे. बऱ्याचदा सोन्याची देवाणघेवाण केली जाऊ शकते. परंतु ते पूर्णपणे विकले जाऊ शकत नाही,” असेही त्यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

हेही वाचाः बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता? तृणमूलसमोर बालेकिल्ला राखण्याचे आव्हान?

गुंतवणुकीसाठी सोन्याशी संबंधित इतर कोणत्या पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो?

सोन्याच्या भौतिक मालकीशिवाय गुंतवणूकदार बाजारात उपलब्ध असलेल्या सोन्याशी संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करू शकतात. दीर्घकालीन गुंतवणूकदार गुंतवणुकीवर निश्चित व्याजाचा अतिरिक्त लाभ घेण्यासाठी SGBs कडे वळू शकतात, असे पटेल म्हणाले. अडखळत किंवा एकरकमी खरेदीद्वारे मध्यम ते अल्प मुदतीची गुंतवणूक शोधत असलेले गुंतवणूकदार गोल्ड ईटीएफ योजनेची निवड करू शकतात.

“सरकारकडून SGBs किंवा भांडवली बाजारात गोल्ड ETF आणि अत्याधुनिक फंड ऑफ फंड योजनांसारखे पर्याय उपलब्ध आहेत,” असेही पाल यांनी स्पष्ट केले. या प्रकारची साधने सुलभ तरलता मिळवून देतात आणि शुद्धतेच्या चाचणीबद्दल वाढलेल्या चिंता दूर करतात. स्टोरेज ही आणखी एक समस्या आहे, जी सोन्यावर आधारित आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक करून टाळता येऊ शकते, असे ते म्हणाले.

“तुम्ही सोन्यात गुंतवणूक करू इच्छित असाल तर ईटीएफ आणि म्युच्युअल फंडाच्या स्वरूपात डिजिटल सोने हा एक चांगला पर्याय असू शकतो. तरीसुद्धा तुमच्या पोर्टफोलिओच्या ५-१० टक्क्यांपेक्षा जास्त नसलेल्या सोन्यातील तुमची गुंतवणूक मर्यादित करणे चांगले आहे,” असेही शेट्टी म्हणाले. सोन्याशी संबंधित कोणत्याही गुंतवणुकीची निवड करताना गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचे क्षितिज, कर आकारणी आणि तरलता यांसारख्या बाबी विचारात घेतल्या पाहिजेत, असे विश्लेषकांनी सांगितले आहे.