दत्ता जाधव

पंजाबमध्ये ढोबळी मिरचीचे दर कोसळले आहेत. एक किलो ढोबळी मिरचीला जेमतेम एक रुपया दर मिळत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ढोबळी मिरची रस्त्यावर फेकून राज्य सरकारचा निषेध नोंदविला आहे. पंजाबमध्ये ढोबळी मिरची मातीमोल का झाली, त्या विषयी…

chess player Magnus Carlsen withdraws from world championship over dress code controversy
‘ड्रेसकोड’ वादावरून विख्यात बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनची जागतिक स्पर्धेतून माघार! नक्की प्रकरण काय?
japan prime minister house
‘या’ देशातील पंतप्रधान निवासस्थान आहे पछाडलेले? ‘Haunted House’चे…
suicide disease
‘Suicide Disease’ काय आहे? असह्य वेदना निर्माण करणाऱ्या या गंभीर आजाराची लक्षणे आणि उपाय काय?
nagpur airport recarpeting nitin gadkari
विश्लेषण : नागपूर विमानतळाचे ‘रिकार्पेटिंग’ काय प्रकरण आहे? गडकरी विमानतळ प्रशासनावर का संतापले?
How many properties does Dawood Ibrahim own in Mumbai and Konkan
दाऊद इब्राहिमच्या मुंबई आणि कोकण परिसरात किती मालमत्ता… जप्तीनंतर त्यांचे काय होते?
brahmos missile loksatta news
प्रथम फिलिपिन्स, आता व्हिएतनाम, मग इंडोनेशिया… चीनच्या भयाने भारतीय ब्रह्मोस क्षेपणास्त्रांना आग्नेय आशियात वाढती मागणी?
Who was Abdul Rehman Makki
२६/११ दहशवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याचा पाकिस्तानात मृत्यू; कोण होता अब्दुल रहमान मक्की?
china biggest dam
तिबेटमधील चीनच्या महाकाय धरणामुळे वाढली भारताची चिंता; कारण काय?
indian post packet service
लाखो पुस्तक विक्रेते अडचणीत; पोस्ट खात्याकडून ‘बुक पॅकेट’ सेवा बंद, कारण काय? याचा काय परिणाम होणार?

पंजाबमध्ये ढोबळी मिरचीच्या दराची स्थिती काय?

पंजाबमधील शेतकऱ्यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीचा सामना केला. हक्काच्या, हमखास पैसे मिळवून देणाऱ्या गहू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आता त्यात भर म्हणून ढोबळी मिरचीचे दर पडले आहेत. स्थानिक बाजारात ढोबळी मिरचीला प्रति किलो सरासरी एक रुपया दर मिळतो आहे. मानसा जिल्ह्यातील भाईनीबाघा गावातील शेतकरी गोरा सिंग यांनी पाच एकरात ढोबळी मिरचीची लागवड केली आहे. त्यांनी १७ किलो मिरचीची प्लास्टिकची एक पिशवी होलसेल व्यापाऱ्याला विकली, व्यापाऱ्याने फक्त १५ रुपये त्यांच्या हातात टेकवले. प्रति किलो एक रुपयांहून कमी दर मिळाला. चार रुपये नफा मिळणे दूरच राहिले, ढोबळी मिरचीचा तोडणी, वाहतूक खर्चही निघत नाही. शेतकऱ्यांना एक एकर क्षेत्रावर लागवडीसाठी सुमारे एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च आला आहे.

भगवंत मान सरकारने काय आवाहन केले होते?

पंजाबमध्ये प्रामुख्याने गहू-तांदळाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. त्याचा परिणाम बाजारातील दरावर होतो आहे. सातत्याने एकच पीक घेतल्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी होत आहे. गहू-तांदूळ पिकाला जास्त पाण्याची गरज असल्यामुळे पाण्याचा उपसाही वाढला आहे, भूजलाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. गहू-तांदळाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे आणि उत्पादनही चांगले असल्यामुळे दरावरही दबाव निर्माण होतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अन्य पिकांकडे वळावे. लोकांना दैनदिन गरज असलेल्या भाजीपाल्याची लागवड करण्याचे आवाहन मान सरकारने केले होते.

पंजाबमध्ये किती क्षेत्रावर होते भाजीपाल्याची लागवड?

पंजाबमध्ये एकूण शेतीयोग्य जमीन ७८ लाख हेक्टर आहे. खरीप हंगामातील (एप्रिल ते ऑक्टोबर) आणि रब्बी (ऑक्टोबर ते मार्च) या दोन्ही हंगामात मिळून प्रामुख्याने अन्नधान्य, गहू, तांदूळ, मक्याचे उत्पादन घेतले जाते. सुमारे ३५ लाख हेक्टरवर गहू आणि ३०-३१ लाख हेक्टरवर तांदळाचे (बासमती) उत्पादन घेतले जाते. एकूण शेतीयोग्य जमिनीपैकी ८४ टक्के जमिनीवर गहू आणि तांदळाची लागवड होते. १९६०-६१मध्ये हरित क्रांती झाल्यानंतर पंजाबमध्ये गहू आणि तांदळासोबत डाळी, तेलबिया, मका, ऊस, बाजरी, बार्ली आणि कापसाची लागवड वाढली आहे. रासायनिक खते, मुबलक पाणी आणि तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पंजाबमध्ये प्रति एकर उत्पादकता देशात सर्वात जास्त आहे. गहू, तांदळाची हमीभावाने खरेदी होत असल्यामुळे गहू-तांदूळ हीच शेतकऱ्यांना हमखास पैसे मिळून देणारी पिके ठरली आहेत. अलीकडे पंजाबमध्ये भाजीपाल्याची लागवड वाढली आहे. आजघडीला पंजाबमध्ये सुमारे तीन लाख हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड होते. त्यात ढोबळी मिरचीची लागवड सुमारे १५०० हेक्टरवर होते. प्राधान्याने संगरुर, फिरोजपूर आणि मानसा जिल्ह्यांत लागवड होते.

हवामान बदलाचा फटका बसला?

महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये प्रामुख्याने ढोबळी मिरची उत्पादित केली जाते. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील आणि मार्च-एप्रिलमध्ये पंजाबमधील मिरची काढणीला येते. पण, यंदा थंडीचे दिवस कमी होणे, अवकाळी पाऊस आणि तापमान वाढ अशा विविध कारणांमुळे ढोबळी मिरचीची काढणी एकाच वेळी सुरू झाली आहे. याशिवाय यंदा पंजाबमध्ये ढोबळी मिरचीचे भरघोस उत्पादन आले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून मिरचीची बाजारातील उपलब्धता वाढून, दर कोसळले आहेत, अशी माहिती पंजाबच्या फलोत्पादन विभागाचे संचालक शैलेंद्र कौर यांनी दिली.

शेतकरी संघटना, शेतकऱ्यांची मागणी काय?

शेतकऱ्यांनी पंजाब सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत पीक पद्धतीत बदल करीत पालेभाज्यांचे उत्पादन घेणे सुरू केले आहे. हमीभावाने खरेदी होणारा गव्हासारखा शेतीमाल उत्पादित करणे टाळून भाजीपाला आणि विशेषकरून ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले आहे. एक एकर क्षेत्रावर ढोबळी मिरची लागवडीसाठी सरासरी एक लाख रुपये खर्च येत असताना आता प्रति किलो एक रुपयाही दर मिळत नाही. राज्यात दर मिळत नाही, ढोबळी मिरची राज्याबाहेर कोलकातासारख्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी सरकारने आम्हाला आर्थिक मदत करावी, वाहतुकीसाठी अनुदान द्यावे, अशी मागणी मानसा जिल्ह्यातील कोटली कलान गावातील शेतकरी सुखदेव सिंग यांनी केली आहे. पंजाब किसान युनियनचे नेते गोरा सिंग भैणीबाघा आणि राम सिंह यांनी म्हटले आहे, की सरकारने पर्यायी पिके घेण्याचे आवाहन केल्यानंतर शेतकऱ्यांनी ढोबळी मिरचीसारखे पर्यायी पीक घेतले आहे. नोटबंदी, करोना काळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने भाजीपाल्याच्या खरेदी-विक्रीबाबत बाजार व्यवस्थेत बदल करण्याची गरज आहे. रेल्वेतून भाजीपाला वाहतूक करण्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी हे शेतकरी करत आहेत.

बाजार व्यवस्थेत बदलाची गरज?

पंजाबमधील बाजार समित्यांची रचना प्रामुख्याने गहू, तांदूळ, मका अशा पिकांना पूरक आहे. आता भाजीपाल्यांची लागवड वाढू लागली आहे. तशी व्यवस्था बाजार समित्यांमध्ये करण्याची गरज आहे. पंजाबमधील ढोबळी मिरची आजवर जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान, दिल्ली, हैदराबाद आणि उत्तर प्रदेशात जात होती. पण, आता ढोबळी मिरची या ठिकाणी पाठविण्यात अडचणी येत असल्याची माहिती मानसा बाजार समितीतील व्यापारी संघटनेचे नेते लकी मित्तल यांनी दिली आहे. केंद्र सरकारतर्फे ई-नाम द्वारे शेतीमालाची बाजार समिती अंतर्गत, राज्याअंतर्गत दोन बाजार समित्यांमध्ये ई-लिलावाद्वारे व्यवहार करण्याची सोय उपलब्ध आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्याची गरज आहे. शेतकरी संघटनांच्या आंदोलनानंतर मोदी सरकारने तीन कृषी कायदे माघारी घेतले होते. त्यानंतर शेतीमालाच्या खरेदी-विक्रीत सुधारणा घडवून आणण्याची प्रक्रियाच ठप्प झाली आहे. त्यामुळे बाजार व्यवस्थेत पारदर्शकता आणणारी, शेतकऱ्यांना जास्तीचे चार पैसे मिळतील, अशा शेतकरी हिताच्या सुधारणांची गरज प्रकर्षाने समोर आली आहे.

dattatray.jadhav@expressindia.com

Story img Loader