दुचाकींच्या वितरण प्रणाली विस्ताराची उभी चढण आणि नव्या मोटारसायकल आणि स्कूटरचा विक्रमी पल्ल्याने वाहनउद्योगात उल्हासी वातावरण आहे. त्यात होंडा मोटारसायकलने इलेक्ट्रिक अॅक्टिवा बाजारात आणली आहे. त्यामुळे २०२६ या आर्थिक वर्षात दुचाकींच्या एकूण खपातील चौथी वा पाचवी स्कूटर ही विजेवर धावणारी स्कूटर असेल, असा आत्मविश्वास दुचाकी निर्मिती कंपन्यांनी बाळगला आहे. ई-स्कूटर निर्मितीतील आघाडीच्या कंपन्यांतील वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मते, दोन गोष्टी अपेक्षित आहेत. सध्या दुचाकी निर्मितीतील दरमहा सरासरी वेग हा एक लाख २० हजार युनिट इतका आहे. २०२६ या आर्थिक वर्षात तो एक लाख ५० हजार युनिटपर्यंत जाणे अपेक्षित आहे. थोड्या अधिक प्रयत्नांच्या आधारे बाजारातील हे लक्ष्य २५ टक्क्यांपर्यंत वेधणे शक्य आहे.
किमतींतील घसरणीमुळे खप वाढेल?
वितरणातील शीघ्र वाढीमुळे दुचाकी निर्मिती कंपन्यांसमोर हे आशादायी चित्र तयार झाले आहे. एकूण खपाच्या ६० टक्के इतका वाटा दुचाकी विक्रीचा कंपन्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. बाजारात नव्याने आलेल्या ई-स्कूटरच्या किमतींतील घसरण हेही एक कारण ई-स्कूटर वृद्धीसाठी गृहित धरले जात आहे.
होंडाचा ईव्ही प्रवेश वाढीसाठी पूरक?
२०२५ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस ई-स्कूटरचा बाजारातील शिरकाव हा १३ ते १५ टक्के इतका राहील, असा अंदाज आहे. वाहन विदेच्या आधारे २०२५ या आर्थिक वर्षात ०.७९ दशलक्ष इतक्या ई-स्कूटरची नोंदणी झाली आहे आणि याच वर्षात ही नोंदणी एक दशलक्षाहून अधिक युनिट इकी असेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षातील अद्याप तीन महिने शिल्लक आहेत. दुचाकींच्या एकूण देशांतर्गत खपाच्या ३३ टक्के इतका वाटा स्कूटरचा असून तो १७.४ दशलक्ष युनिटहून अधिक आहे. बजाज, टीव्हीएस, अथेर आणि हिरो मोटोकॉर्प यासारख्या आघाडीच्या कंपन्यांनी त्यांच्या देशभरातील वितरण जाळ्यात आणखी दोन हजार नवे विक्रेते, उप-विक्रेते समाविष्ट करण्याचे नियोजन केले आहे. ई-स्कूटर निर्मितीतील होंडाचा प्रवेश हा या वितरणरप्रणालीतील वाढ दर्शवत आहे.
हेही वाचा >>> विमान प्रवासात आता फक्त एकच बॅग नेता येणार? लगेज नियमांमध्ये काय बदल करण्यात आले?
ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारी ई-स्कूटर?
`बिझनेस स्टँडर्डʼमधील वृत्तानुसार, २०२६च्या आर्थिक वर्षात बजाज कंपनीच्या वितरण जाळ्यात २,००० ते ३,००० विक्रेते, उपविक्रेत्यांची भर पडेल. त्याप्रमाणे अथेरची विक्रेते, उपविक्रेत्यांची २६० ही संख्या ६०० ते ७००च्या आसपास जाईल.
ओलानेही २०२५च्या अखेरीस देशभरात ३२,०० दालने उघडण्याचे जाहीर केले आहे. यात छोटी शहरे, तालुकास्तरीय आणि मोठ्या गावांचा समावेश असेल. यात ओला कंपनीने कमी किमतीतील ई-स्कूटर निर्मितीवर भर दिला आहे. त्यामुळे ई-स्कूटर सर्व स्तरांतील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारी असेल, असा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.
ई-स्कूटरसाठी आगामी काळ कसा असेल?
दरमहा सरासरी एक लाख २० हजार ते एक लाख ५० हजार ई-स्कूटर खपाचे लक्ष्य असेल. शिवाय १५ ते २० नव्या ई-स्कूटर निर्मितीच्या प्रक्रियेत असून ई-स्कूटरसाठी बाजारातील किंमत ३९ हजार ९९९ ते १ लाख ५० रुपये इतकी असेल. शिवाय ई-स्कूटर पणन प्रक्रियेतील प्रमुख घटक असलेल्या विक्रेते आणि उप-विक्रेत्यांच्या जाळ्याचा विस्तार हेही महत्त्वाचे पाऊल असेल. होंडा कंपनी लवकरच ई-स्कूटर बाजारात पाऊल ठेवत आहे. होंडा कंपनीचे ई-स्कूटर निर्मितील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे होंडाची ई-स्कूटरच्या बॅटरीची अदलाबदल करता येईल. त्यामुळे ई-स्कूटर बाजाराला उसळी मिळू शकेल.