मनी लाँड्रिंगप्रकरणी तुरुंगात असलेला कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर विविध कारणांसाठी अनेक वेळा बातम्यांत चर्चेचा विषय ठरत असतो. सध्या तो एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. कोट्यवधींची फसवणूक करून शिक्षा भोगत असलेल्या सुकेशने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून ओडिशा रेल्वे अपघातामधील पीडितांना १० कोटींची मदत देण्याची इच्छा प्रकट केली आहे. अनेक राजकीय नेते, कलाकार आणि व्यावसायिक यांना कोट्यवधीचा गंडा घालणारा सुकेश चंद्रशेखर सध्या दिल्लीच्या मंडोली तुरुंगात आहे.

सुकेशने नेमके काय म्हटले?

सुकेश चंद्रशेखरने रेल्वेमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, माझ्या वैयक्तिक उत्पन्नामधून मी ओडिशातील रेल्वे अपघातामधील पीडितांना मदत देऊ इच्छितो, हे पैसे माझ्या कायदेशीर उत्पन्नाच्या स्रोतामधून आलेले आहेत. त्याच्यावर कर भरलेला आहे. मी जी १० कोटींची मदत देईन, त्यासोबत कराच्या पावत्या आणि इतर सर्व कागदपत्रे माझ्याकडून पुरविण्यात येतील, अशी माहिती सुकेश चंद्रशेखरने दिली.

Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “त्यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, पण…”, चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Dhankawadi gambling den, Raid on gambling den,
पुणे : धनकवडीत जुगार अड्ड्यावर छापा; दहाजणांविरुद्ध गुन्हा
What Justice Chandiwal Said About Sachin Waze?
Justice Chandiwal : जस्टिस चांदिवाल यांचं वक्तव्य, “सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, त्यांनी मला समित देशमुखांचा मेसेज..”
Justice Chandiwal Said This Thing About Devendra Fadnavis
Justice Chandiwal : “सचिन वाझे आणि अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना गुंतवण्याचा प्रयत्न केला, मी..”, जस्टिस चांदिवाल यांचा खुलासा
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!

चंद्रशेखर पुढे म्हणाला, आपले सरकार पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे. मी या देशाचा जबाबदार आणि आदर्श नागरिक असल्या कारणाने मी या अपघातात मरण पावलेल्या पीडित कुटुंबातील मुलांसाठी १० कोटींची मदत करू इच्छितो. शेवटी ही मुले देशाचे भविष्य आहेत. ज्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्ती गमावल्या त्यांच्या शिक्षणासाठी मला ही मदत करायची आहे. “ही मदत फक्त ज्यांनी आपले पालक गमावले त्या मुलांच्या शिक्षणासाठीच खर्च करण्यात यावी. मग ते शाळा, माध्यमिक किंवा महाविद्यालयीन शिक्षण असेल,” असेही सुकेशने आपल्या पत्रात म्हटले आहे.

हे वाचा >> ५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर जॅकलिनवर उधळपट्टी करणारा सुकेश चंद्रशेखर आहे तरी कोण?

आरोग्य, शिक्षण आणि अन्नदान यांसारख्या क्षेत्रामध्ये माझ्या श्रद्धा फाउंडेशन, चंद्रशेखर कॅन्सर फाउंडेशन, एल. एस. एज्युकेशन या संस्थामार्फत महत्त्वाचे योगदान दिले जात आहे. दक्षिण भारतातील पाचही राज्यांत कुणीही उपाशी राहू नये, यासाठी माझ्या संस्था कार्यरत असतात, अशीही माहिती सुकेशने दिली. “मी आपणास नम्र विनंती करत आहे की, आपण माझे मदतीचे निवेदन स्वीकारावे आणि थेट संबंधित विभागाची माहिती द्यावी. त्याप्रमाणे मदतीचा डिमांड ड्राफ्ट तयार करून माझ्या संस्थेकडून सुपूर्द करण्यात येईल,” असेही त्याने पत्रात नमूद केले.

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या माहितीनुसार सुकेश चंद्रशेखरने या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही स्तुती केली आहे. त्याने पत्रात लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने अतिशय उत्कृष्ट काम करत अतिशय कमी वेळेत परिस्थिती नियंत्रणात आणली. ज्या लोकांना या अपघातामुळे जवळचे लोक गमवावे लागले, त्या प्रत्येकासोबत शासन ठामपणे उभे राहिले. तसेच या अपघातासाठी जे लोक जबाबदार आहेत, त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येत आहे. ही चांगली बाब आहे.

सुकेशकडून याआधीही मदतीचा प्रस्ताव

सुकेश चंद्रशेखरने मदत देऊ करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी २२ मार्च रोजी कारावास अधीक्षकांना पत्र लिहून सुकेशने पाच कोटींची मदत देण्याची इच्छा व्यक्त केली होती. ज्या कैद्यांचा न्यायालयीन खटला सुरू आहे, अशा कैद्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी माझ्या वाढदिवसानिमित्त (२५ मार्च) हे पैसे द्यायचे आहेत, अशी भावना त्याने पत्रात नमूद केली होती.

हे वाचा >> सुकेश-जॅकलिनची प्रेम कहाणी येणार रुपेरी पडद्यावर; तिहार तुरुंगाच्या जेलरची ‘या’ दिग्दर्शकाने घेतली भेट

‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या बातमीनुसार, २२ मार्च रोजी लिहिलेल्या पत्रात सुकेशने तुरुंगातील योजनांसाठी पाच कोटी ११ लाखांचा निधी देण्याची इच्छा प्रकट केली. तुरुंगातील जे कैदी जामिनासाठी पैसे देऊ शकत नाहीत, न्यायालयीन लढाईसाठी पैसे नसल्यामुळे अनेक वर्षांपासून तुरुंगात खितपत पडलेल्या कैद्यांच्या कुटुंबासाठी, विशेषकरून त्यांच्या मुलांसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी हा निधी खर्च करावा, असे त्याने म्हटले होते. घरातील कुटुंबप्रमुख तुरुंगात असल्यामुळे अशा कुटुंबांना घर चालवणे अवघड झालेले असेल, असेही त्याने पत्रात लिहिले होते.

लोकसभा निवडणूक लढविण्याची सुकेश चंद्रशेखरची इच्छा

द प्रिंटच्या बातमीनुसार, सुकेशने एप्रिल महिन्यात सांगितले की, तो २०२४ ची लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. तसेच दिल्लीतील उत्पादन शुल्क विभागाच्या मद्य घोटाळ्यात आम आदमी पार्टी (AAP) आणि भारत राष्ट्र समिती (BRS) यांचा काही तरी संबंध असल्याचाही दावा त्याने केला होता. चंद्रशेखरने एप्रिल महिन्यात ‘आप’चे नेते सत्येंद्र जैन आणि इतर काही प्रमुख राजकीय नेत्यांसोबतचे व्हॉट्सअप चॅट सार्वजनिक केले होते. ‘द प्रिंट’ने सुकेश चंद्रशेखरच्या प्रतिक्रियेला बातमीत प्रसिद्धी दिली होती. त्यात तो म्हणाला, मी याआधीही ही गोष्ट सांगितली आहे की, “मी पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उतरण्यासाठी इच्छुक आहे. मला वाटते, मी निर्दोष बाहेर पडावे. अनेक लोकांची गुपिते माझ्या मनात आणि डोक्यात साचली आहेत, त्याचे ओझे मला मोकळे करायचे आहे.”

जॅकलिनलाही तुरुंगातून लिहिले पत्र

सुकेश चंद्रशेखरने मार्च महिन्यात त्याच्या वाढदिवसानिमित्त बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पत्र लिहून त्याच्या कथित प्रेमाचा उल्लेख केला होता. मनी लॉड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसलाही ईडीने आरोपी केलेले आहे. सुकेशने पत्रात म्हटले की, वाढदिवसानिमित्त त्याला जॅकलिनची खूप आठवण येत आहे. जॅकलिनचा उल्लेख त्याने ब्युटीफल डॉल असा केला होता. तेलगू भाषेतील बुम्मा असा उल्लेख करत सुकेशने जॅकलिनसाठी पत्र लिहिल्याचे ‘फर्स्टपोस्ट’ने म्हटले आहे. “माझी बुम्मा, मला तुझी वाढदिवसानिमित्त खूप आठवण येत आहे. तुझा सहवासात मिळालेला आनंद मला आठवतोय. माझ्याकडे व्यक्त होण्यासाठी शब्द नाहीत, पण मला माहितीये की माझ्यासाठीचे तुझे प्रेम कधीच संपणार नाही. मला माहितीये तुझ्या सुंदर मनात काय विचार आहेत. मला त्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही. बेबी, तुला माहितीये मी तुझ्यावर किती प्रेम करतो, मला तुझी खूप आठवण येते माझी बुटा बम्मा,” अशा शब्दात सुकेशने आपले प्रेम व्यक्त केले होते.

हे वाचा >> लीना पॉलसोबत लग्न आणि जॅकलिनसोबत प्रेमप्रकरण, महाठग सुकेशच्या आयुष्यातला लव्ह ट्रँगल काय आहे?

दिल्लीच्या नायब राज्यपालांनाही पत्र लिहिले

जानेवारी महिन्यात सुकेश चंद्रशेखरने दिल्लीचे नायब राज्यपाल यांनाही पत्र लिहून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांची तक्रार केली होती. दोन्ही नेते माझा छळ करीत असल्याचा आरोप सुकेशने केला होता. सुकेशने पत्रात म्हटले होते की, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि सत्येंद्र जैन हे तुरुंगातील प्रशासन आणि त्यांच्याशी निष्ठावान असलेल्या कर्मचाऱ्यांकडून माझा छळ करीत आहेत. एक महिन्यापूर्वी मला मंडोली तुरुंगात आणण्यात आले. त्यानंतर सत्येंद्र जैन यांनी त्यांच्या जवळचा कर्मचारी राजेंद्र, मुख्य कारावास अधीक्षक आणि जय सिंह नावाच्या उपअधीक्षकास तुरुंगात पाठवून मला धमकावले. त्यानंतर माझ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांच्या धमक्यांना भीक घातली नाही.

आणखी वाचा >> “अरविंद केजरीवालांच्या घरातील फर्निचरसाठी मी स्वत: पैसे दिले”, सुकेश चंद्रशेखरचा मोठा दावा; नायब राज्यपालांना लिहिले पत्र

नायब राज्यपाल यांना लिहिलेल्या पत्रात सुकेशने असाही दावा केला की, सत्येंद्र जैन यांनी त्याच्याकडून प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली दहा कोटींची खंडणी मागितली. तसेच तुरुंग महासंचालक संदीप गोयल यांनीही १२.५ कोटींची लाच मागितली असल्याचा खळबळजनक आरोप त्याने केला.