भारतात २००० रुपयांची नोटबंदी नुकतीच जाहीर करण्यात आली. एखादे चलन रद्द करण्याची ही पहिलीच घटना नाही. या आधीही ५००-१००० च्या नोटा व्यवहारातून बाद करण्यात आल्या होत्या. नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर चलनांचा इतिहास आणि भारतातील चलनबंदीची गाथा जाणून घेणे रंजक ठरेल.

गोष्ट चलनाची

मुळात चलन म्हणजे, विनिमयाचे सर्वमान्य साधन होय. सरकारने अधिग्रहित केलेले चलन सर्वत्र वापरले जाते. सर्वसामान्यपणे चलनाला ‘पैसा’ ही व्यापक संकल्पना योजिली जाते. नाणी आणि नोटा यांचा यामध्ये समावेश होतो.
मानवाची प्रगती होऊ लागली तशा त्याच्या गरजाही वाढू लागल्या. सर्वच गरजा तो एकटा पूर्ण करू शकत नसे. आपल्या गरजांच्या पूर्तीसाठी तो इतरांवर अवलंबून राहू लागला. आपली गरज पूर्ण करून घेत असताना त्या बदल्यात दुसऱ्याला मोबदला देत असे. प्रारंभीच्या काळात हा मोबदला वस्तू स्वरूपात होता. त्यामुळे ‘वस्तुविनिमय’ पद्धत अस्तित्वात आली. परंतु या पद्धतीत अनेक अडचणी होत्या.वस्तूंची उपलब्धता, समयोग्य वस्तू यामधून वस्तुविनिमय पद्धत अडचणीची ठरू लागली. त्यामुळे एकच सर्वमान्य आणि योग्य किंमत ठरवू शकेल अशी वस्तू निर्माण करणे गरजेचे होते, यातून चलनाची निर्मिती झाली.

neem leaves cancer cure (1)
कडुलिंबाची पाने खाऊन नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीची कॅन्सरवर मात? हे खरंच शक्य आहे का? तज्ज्ञ काय सांगतात?
mahayuti landslide victory in maharashtra vidhan sabha election 2024
‘बटेंगे…’ , लाडकी बहीण, पायाभूत सुविधा या त्रिसूत्रीमुळे…
japan emerging sex hub
वाढत्या गरिबीमुळे ‘हे’ आशियाई शहर ठरत आहे ‘सेक्स टुरिझम हब’; कारण काय?
methanol liquor poison
विश्लेषण : लाओसमध्ये ‘मिथेनॉल’मिश्रित मद्याचे ७ परदेशी पर्यटक बळी… मिथेनॉल मद्यामध्ये सर्रास का मिसळले जाते? ते घातक कसे?
Russia Ukraine war
विश्लेषण : रशियाने युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्र का डागले? पुतिन यांच्या खेळीतून अमेरिका, ‘नेटो’ला कोणता इशारा?
Air pollution air quality delhi burning of agricultural waste Uttar Pradesh, Punjab Haryana states
विश्लेषण : दिल्लीतील भीषण प्रदूषणास बाजूच्या राज्यांतील शेती कशी कारणीभूत? कृषी कचरा जाळण्याची गरज तेथील शेतकऱ्यांना भासते?
Hitler Volkswagen Porsche
Volkswagen: अ‍ॅडॉल्फ हिटलरने स्वप्नपूर्तीसाठी ‘फोक्सवॅगन’ गाडीला आकार का दिला?
Kim Yong Bok, the secretive North Korean general leading troops in the Russia-Ukraine war
किम जोंग उनचे सैन्य रशियाच्या मदतीला; याचा काय परिणाम होणार? कोण आहेत सैन्याचे नेतृत्व करणारे जनरल किम योंग बोक?

हेही वाचा : विश्लेषण : रविवारनंतर सोमवारच का येतो ? आठवड्याची रचना कोणी केली ?

नाणी येण्यापूर्वीचे चलन

वस्तुविनिमय पद्धतीस चलन हा पर्याय निर्माण करण्यात आला. परंतु, तो नाणी स्वरूपात नव्हता. परस्पर समन्वयाने काही वस्तू याच चलन म्हणून ठरवण्यात आल्या. अगदी प्राचीन काळी प्राण्यांच्या कातड्याचा उपयोग चलन म्हणून करण्यात येत असे. कृषियुग चालू झाले तेव्हा जनावरांचा आणि धान्यांचा वापर चलन म्हणून करण्यात येऊ लागला. समुद्रकिनारी राहणाऱ्यांकडून सुके मासे, मगरीचे दात चलन म्हणून वापरण्यात येत असत. थंड प्रदेशात राहणारे लोक लोकरीचा वापर चलन म्हणून करत असत. इथिओपियामधील लोक मिठाचे खडे पैसे म्हणून वापरीत. पॅसिफिक बेटांवरील लोक २५ शेर वजनाच्या प्रचंड दगडापासून पक्ष्याच्या पिसापर्यंत विविध वस्तू विनिमयासाठी वापरत असत. सीलोन म्हणजेच श्रीलंकेमधील लोक हत्तीचा उपयोग चलन म्हणून काही काळ करीत होते. आफ्रिका खंडातील अनेक देशांत चलनासाठी कवड्या वा कवड्यांच्या माळा वापरीत असत, अशी माहिती A History of India, Hermann Kulke and Dietmar Rothermund या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीत मिळते. परंतु यामध्येही नाशवंत पदार्थ, जनावरांची अतिरिक्त साठवणूक अशाही समस्या निर्माण झाल्या.

हेही वाचा : विश्लेषण : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या शुद्धीकरणावरून शाब्दिक चकमक; ही ‘शुद्धता’ नेमकी आली कुठून ?

या समस्या टाळण्यासाठी योग्य किंमत, अविनाशी, अविभाज्य, टिकाऊ अशा चलनाची आवश्यकता होती. त्यातून धातूंच्या चलनाची कल्पना निर्माण झाली. चीनमध्ये इसवी सन पूर्व २३०० वर्षे तांब्याचा उपयोग चलनासाठी केल्याचा उल्लेख सापडतो. अनेक देशांत प्रारंभी सोने, चांदी, तांबे यांसारख्या धातूंचे तुकडे चलन म्हणून वापरात होते. दरवेळी धातूच्या तुकड्यांचे वजन करावे लागे व सोने, चांदी शुद्ध आहे की नाही, हे पारखून घ्यावे लागे. हळूहळू ठराविक वजनाची व विशिष्ट शुद्धता असलेली नाणी प्रचारात आली. छोट्यामोठ्या नाण्यांमुळे लहानमोठे व्यवहार सुलभतेने करता येऊ लागले. सरकारी शिक्क्यामुळे नाण्यांस कायदेशीर मान्यता प्राप्त झाली.

नाण्यांचा जन्म

वस्तुरूपी चलनाच्या मर्यादेमुळे धातुरूपी चलनाची निर्मिती झाली. वेद काळापासून चलन अस्तित्वात असल्याचे उल्लेख आढळतात. वेदांमध्ये नाण्याचा ‘निष्क’ असा उल्लेख आढळतो. लिडिया आणि ग्रीस देशांत सोने व चांदी यांच्या मिश्रणापासून बनविलेली इलेक्ट्रम धातूची नाणी वापरीत असत. इसवी सन पूर्व ७०० मध्ये लिडियाचा धनाढ्य राजा क्रीसस याने प्रथमच शुद्ध सोन्याचे नाणे प्रचारात आणले. रोममध्ये वापरात असलेली नाणी ब्राँझ धातूची व आकाराने बरीच ओबडधोबड होती. इसवी सन पूर्व २६८ साली रोममध्ये टांकसाळीत चांदीची नाणी पाडण्यात आली. अलेक्झांडरने पाडलेल्या नाण्यांवर दोन्ही बाजूंस ग्रीक देवतांची चित्रे होती. ज्यूलियस सीझरने प्रथमच नाण्यांवर देवदेवतांची चित्रे न कोरता स्वतःचे चित्र कोरण्यास सुरुवात केली. बहुतेक देशांनी प्रचारात आणलेली नाणी वर्तुळाकार व चपटी होती, असे दिसून येते.

मराठी राज्यात सोन्याची नाणी वापरात होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी राजमुद्रा निर्माण केल्याचे उल्लेख आढळतात. ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली, तेव्हा भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील स्वतंत्र राजे आपापली नाणी पाडत होते. १७६० च्या सुमारास कमीअधिक वजनाची व दर्जाची सुमारे ९९४ नाणी चलनात होती. साहजिकच सराफाची मदत घेतल्यावाचून ती पारखणे अशक्य होई आणि नाणी असंख्य असल्याने सर्वसामान्य लोकांचा गोंधळ होई. औरंगजेबाच्या कारकीर्दीत टांकसाळींची संख्या दोनशेपर्यंत होती. ईस्ट इंडिया कंपनीने औरंगजेबाच्या विरोधाला न जुमानता मुंबईत टांकसाळ स्थापन करून नाणी पाडली. हळूहळू कंपनीने कलकत्ता, पाँडेचेरी, अर्कांट, ढाक्का आदी ठिकाणी टांकसाळी सुरू केल्या. १८३५ साली नाण्यांसंबंधी करण्यात आलेल्या कायद्यानुसार मद्रास येथे चालू असलेला १८० ग्रेनचा चांदीचा रुपया देशभर प्रमाणभूत चलन म्हणून मान्यता पावला. सोन्याच्या मोहरा रद्द करण्यात आल्या. लोकांना चांदीच्या बदल्यात टांकसाळीतून रुपये मिळण्याची व्यवस्था करण्यात आली. रुपयाची दर्शनी किंमत व त्यासाठी वापरण्यात आलेल्या चांदीची किंमत समान ठेवण्यात आली. अशा प्रकारे भारतात १८३५ मध्ये चांदीचे चलन अगर रौप्यमापनपद्धती अस्तित्वात आली.

हेही वाचा : विश्लेषण : कार्ल मार्क्स जयंती २०२३ : आजही मार्क्सवाद सर्वांना पुरून का उरतोय ?

नोटा कधी निर्माण झाल्या ?

सरंजामशाहीच्या काळात चीनमध्ये कूब्लाईखान हा राजा कागदी चलनाचा उपयोग करीत असल्याची नोंद प्रख्यात प्रवासी मार्को पोलो याने केली आहे. जगातील हे पहिले कागदी चलन म्हणता येईल. तुतीच्या झाडाच्या सालीपासून तयार केलेल्या या नोटा वेगवेगळ्या आकारांच्या होत्या व त्या सर्वग्राह्य होण्यासाठी राजाने त्यांना कायदेशीर पाठिंबा जाहीर केला होता. १६९० साली मॅसॅचूसेट्‌समध्ये कागदी चलन वापरात हाते. १८६१ मध्ये अमेरिकेने कागदी चलनाचा सर्रास वापर सुरू केला. चलनासाठी केवळ नाण्यांचाच उपयोग करणे अनेक दृष्टींनी गैरसोयीचे होते. नाण्यांची संख्या खाणीतून काढण्यात येणाऱ्या धातूच्या उपलब्धतेवर अवलंबून ठेवावी लागते. औद्योगिकीकरण होऊ लागले, म्हणजे पैशाची मोठ्या प्रमाणावर गरज भासते. ती पूर्ण करण्यासाठी आणि पैशाचा संचय करणे सुलभ ठरावे यासाठी नाण्याच्या बरोबरीने कागदी नोटा प्रचारात आल्या. सुरुवातीस कागदी चलनास आधार म्हणून आवश्यक तितका सुवर्णसाठा मध्यवर्ती बँकेकडे ठेवण्यात येई. कागदी चलन सुवर्णात परिवर्तनीय होते. हवे तेव्हा कागदी नोटांच्या बदली सरकारी खजिन्याकडून वा मध्यवर्ती बँकेकडून सोने मिळे. या तरतुदीमुळे लोकांना कागदी चलन विश्वासार्ह वाटे. १९६७ मध्ये १० रुपयाची नोट, १९७२ मध्ये २० रुपये, १९८१ मध्ये ५० रुपये आणि १९६७ ते १९७९ च्या दरम्यान १०० रुपयांची नोट जारी करण्यात आली.

भारतीय नाण्यांचा इतिहास

भारतात गोल, सुबक आणि एकाच धातूची नाणी बनवण्याचे श्रेय जेम्स प्रिन्सेप यांना जाते. त्यांना भारतीय नाणकशास्त्राचे जनक मानले जाते. भारतीय नाणी साचेबद्ध आणि समान वजनाची असावीत, म्हणून एक अहवाल तयार करून लॉर्ड विल्यम बेंटिक यांना पाठवला. त्यांनी सहा नमुन्यांपैकी तत्कालीन ब्रिटिश राजे चौथे विल्यम यांची भावमुद्रा असणारे नाणे स्वीकारले. त्यानंतर राणी व्हिक्टोरिया, पंचम जॉर्ज, आठवे एडवर्ड यांच्या भावमुद्रा नाण्यांवर स्वीकारण्यात आल्या. १ पै, ३ पै, १ पैसा, ६ पैसे अशा नाण्यांची निर्मिती करण्यात आली. काही नाण्यांवर ब्रिटिश राणीची अथवा राजाची भावमुद्रा आणि दुसऱ्या बाजूला ईस्ट इंडिया कंपनीचे चिन्ह असे नाणे अस्तित्वात आले. भारताला स्वातंत्र्य मिळण्याचे निश्चित झाल्यावर नाण्यांमध्ये थोडा बदल करण्यात आला. नाण्याच्या एका बाजूला सहावे जॉर्ज तर दुसऱ्या बाजूला अशोकस्तंभावरील सिंह अशी नाणी निर्माण करण्यात आली. इसवी सन १९५० पासून पूर्ण भारतीय नाणी तयार करण्यात आली.

हेही वाचा : विश्लेषण : भारतीय निवडणूक पद्धतीवर श्रीलंकेचा प्रभाव ? जाणून घ्या निवडणूक चिन्हांचा रंजक इतिहास

रद्द झालेली चलने

२ रुपयाच्या नोटेपासून २००० रुपयाच्या नोटेपर्यंत विविध रुपयांच्या नोटा अस्तित्वात आहेत. पूर्वी असणाऱ्या २ आणि ५ रुपयाच्या नोटांची छपाई २००५ च्या अगोदरच बंद करण्यात आली. आरबीआयच्या माहितीनुसार, १००० रुपयांच्या नोटा १९७८ मध्ये बंद करण्यात आल्या होत्या . रिझर्व्ह बँकेने १९३८ आणि १९५४ मध्ये १०००० रुपयांच्या सर्वोच्च मूल्याच्या नोटा छापल्या होत्या. तसेच १९५४ पासून ५००० रुपयांच्या नोटांचीही छपाई करण्यात येऊ लागली होती. परंतु, १९७८ मध्ये या सर्व नोटांवर तत्कालीन सरकारने बंदी घालण्याचे ठरवले आणि जानेवारी १९७८ पासून ही चलने रद्द झाली. १९८७ मध्ये ५०० रुपयांची नोट अस्तित्वात आली, तसेच २००० मध्ये १००० रुपयांची नोट पुन्हा व्यवहारात आणण्यात आली. २०१६ मध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आली. तसेच २०१६ मध्ये अस्तित्वात आलेली २००० रुपयांची नोट एप्रिल २०२३ मध्ये रद्द करण्यात आली.

चलन हे व्यवहारातील अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. आजवर एकच चलन कायमस्वरूपी राहिलेले दिसत नाही. त्यामुळे सतत बदलणारी चलने ही काळाला अनुसरून असल्याचे दिसते.