Discover the historic display of the Kiswah: इस्लामिक आर्ट्स बिएनाले २०२५ मध्ये मक्का (मक्काह) येथील पवित्र काबाला झाकणारे ‘किस्वाह’ प्रदर्शित करण्यात येणार आहे. या बिएनालेचे उद्घाटन शनिवारी २५ जानेवारी रोजी म्हणजेच आज जेद्दामधील किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वेस्टर्न हज टर्मिनलमध्ये होणार आहे.

डिरियाह बिएनाले फाऊंडेशनच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पवित्र शहराच्या बाहेर पूर्ण किस्वाह प्रथमच प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. इस्लामिक आर्ट्स बिएनालेचे आयोजन या फाऊंडेशनकडून करण्यात येते. या बिएनालेचे पहिले संस्करण २०२३ साली आयोजित करण्यात आले होते. दुसरे संस्करण ‘अँड ऑल दॅट इज इन बिटविन’ या नावाने प्रसिद्ध आहे. दुसरे संस्करण २५ मेपर्यंत सुरू राहील. या बिएनालेत किस्वाहसह ऐतिहासिक इस्लामिक वस्तूंचा आणि आधुनिक कलाकृतींचा आगळा संग्रह प्रदर्शित केला जाईल. तसेच, हे प्रदर्शन इस्लामिक संस्कृतीच्या समृद्धीचा आणि सर्जनशील कलांचा विचार करण्यासाठी प्रेरणा देईल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

AI in archaeology
AI ने शोधले ५००० वर्षांपूर्वीचे वाळवंटाखाली दडलेले प्राचीन संस्कृतीचे रहस्य; का आहे हे तंत्र महत्त्वाचे?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Ajit pawar gives Sharad Pawar Health Update
Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अजित पवारांची महत्त्वाची माहिती; म्हणाले, “त्यादिवशीच त्यांना…”
udayanraje Bhosle called chhava director laxman utekar
‘छावा’तील ‘ती’ दृश्ये बदलणार? उदयनराजेंनी थेट फोन केल्यावर दिग्दर्शक म्हणाले, “चित्रपटामध्ये फक्त आपले राजे…”
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
What Are the Most Popular Jobs Worldwide_
जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय नोकऱ्या कोणत्या? नवीन सर्वेक्षण काय सांगते?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

किस्वाह

किस्वाह म्हणजे रोब किंवा आच्छादन. हे काळ्या रंगाचे अतिशय कलात्मक भरतकाम केलेले कापड आहे. हे कापड मक्का येथील मशीद अल-हरमच्या मध्यभागी असलेल्या घनाकार काबावर आच्छादित केले जाते. इस्लाममधील हे सर्वांत पवित्र स्थळ मानले जाते.

किस्वाह आणि त्यावरील आयते व अलंकरण इस्लामिक कलेतील सर्जनशीलतेचा उत्कृष्ट नमुना मानला जाते असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. “किस्वाहचे प्रदर्शित करून या कलाकृतीच्या ऐतिहासिक विकासप्रक्रियेचे व त्याच्याशी निगडीत कौशल्याचे अनोखे दर्शन बिएनाले घडवेल. या कापडावर असलेल्या गुंतागुंतीच्या विणकाम व भरतकामातील रेशीम, सोने आणि चांदीच्या धाग्यांनी केलेल्या नक्षीकामाचा आनंद रसिकांना मिळेल,” असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. किस्वाह दरवर्षी एका विशेष समारंभादरम्यान बदलण्यात येते. बिएनालेत प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणारे किस्वाह हे गेल्या वर्षी काबावर सजवलेले होते. “किस्वाहचे प्रदर्शन सौदी अरेबियातील पवित्र काबाच्या किस्वाह फॅक्टरीच्या (किंग अब्दुलअझीझ कॉम्प्लेक्स) स्थापनेच्या पहिल्या हिजरी शताब्दीबरोबरच करण्यात येत आहे. ही फॅक्टरी ए.एच. १३४६ (१९२७) पासून किस्वाह निर्मिती करत आहे,” असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. मे महिन्यात बिएनालेचा समारोप झाल्यानंतर किस्वाह पुन्हा पवित्र काबाच्या किस्वाह फॅक्टरीकडे (किंग अब्दुलअझीझ कॉम्प्लेक्स) देखभालीसाठी दिले जाईल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

किस्वाहचा इतिहास

काबाला किस्वाहने झाकण्याची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. या परंपरेच्या उगमाविषयी वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. प्रचलित मतानुसार संपूर्णपणे काबाला झाकणारी पहिली व्यक्ती प्राचीन इस्लामपूर्व काळातील येमेनचा हमय्यूरचा राजा ताबू करब अस्वद होता. इस्लामच्या ८ व्या हिजरी वर्षात (६२९-६३० ईसवी) मक्का जिंकल्यानंतर पैगंबरांनी काबाला येमेनच्या कापडाने झाकले. २०२० साली सौदीच्या अरब न्यूज या दैनिकात प्रकाशित झालेल्या वृत्तांकनात (‘द किस्वा: द स्टोरी बिहाइंड द कव्हरिंग ऑफ द होली काबा’) म्हटले आहे की, मक्केच्या विजयात पैगंबरांनी अनेकेश्वरवादी काळातील जुना किस्वाह काबावर ठेवला होता, तो बदलला नाही. कालांतराने धूप देत असताना एका महिलेकडून तो किस्वाह जळाला. त्यामुळे तो बदलण्यात आला. त्यानंतर मुस्लिम राजे आणि सुलतानांनी काबाला झाकण्याची आणि त्याची देखभाल करण्याची परंपरा सुरू ठेवली.

किस्वाहचे रंग शतकानुशतके बदलले आहेत.

अरब न्यूजच्या वृत्तानुसार, “पैगंबर मोहम्मद यांनी काबाला पांढऱ्या आणि लाल पट्ट्यांच्या येमेनच्या कापडाने झाकले होते, तर अबू बक्र अल-सिद्दीक, उमर इब्न अल-खत्ताब आणि उथमान इब्न अफ्फान यांनी पांढऱ्या रंगाने झाकले. इब्न अल-जुबैर यांनी लाल रेशमी कापडाने झाकले.” अबू बक्र (६३२-३४ ईसवी), उमर (६३४-४४ ईसवी) आणि उथमान (६४४-५६ ईसवी) हे पहिले तीन राशिदून खलीफा होते. इब्न अल-जुबैर हे ७ व्या शतकाच्या उत्तरार्धात मक्केमधील मुस्लिमांचे नेते होते. अब्बासी काळात काबाला एकदा पांढऱ्या आणि एकदा लाल कापडाने झाकले गेले, तर सेल्जूक सुलतानाने ते पिवळ्या रेशमी कापडाने झाकले. अब्बासी खलिफा अल-नासिर यांनी किस्वाहच्या रंगात बदल करून तो हिरवा केला आणि नंतर काळ्या रेशमी कापडाने झाकले आणि हा रंग आजपर्यंत कायम आहे,” असे अरब न्यूजच्या लेखात नमूद केले आहे. अब्बासी खलिफताचा कारभार इराकमधील कूफा, बगदाद आणि समर्रा येथून इ.स. ७५० ते १२५८ पर्यंत चालला.

तुर्को-पर्शियन सेल्जूक साम्राज्याचे शासन इ.स. १०३७ ते ११९४ पर्यंत होते.

कैरोस्थित इजिप्त टुडेने २०१७ साली प्रकाशित केलेल्या अहवालानुसार १४ व्या शतकाच्या सुरुवातीला इजिप्त किस्वाहचे अधिकृत उत्पादक झाले. “किस्वाह एका मोठ्या मिरवणुकीतून पाठवले जात असे. ते एका प्रचंड उंटावर वाहून नेले जाई आणि त्याच्या मागे इतर उंट असत ज्यावर यात्रेकरूंसाठी पाणी आणि सामान वाहून नेले जात असे. त्यांच्याबरोबर सैनिकही असत, ते प्रवासादरम्यान ताफ्याच्या संरक्षणाचे काम करत. किस्वाह वाहून नेणाऱ्या उंटाला ‘नबील’ म्हणत, अरबी भाषेत याचा अर्थ ‘सन्माननीय’ असा आहे आणि त्यानंतरच्या उंटाला ‘मबरूक’ म्हणत, ज्याचा अर्थ अरबी भाषेत ‘आशीर्वाद मिळालेला’ असा आहे,” असे ‘द इजिप्शियन लिगसी ऑफ प्रोड्युसिंग द किस्वाह’ या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

किस्वाहची निर्मिती

आजच्या किस्वाहचे वजन १,००० किलोग्रॅमपेक्षा जास्त आहे. ते रेशीम कापडापासून तयार केलेले असते. त्यावर सोने व चांदीच्या धाग्यांनी भरतकाम केलेले असते. यात चार बाजू आणि एका दरवाजाच्या पडद्याचा समावेश असतो आणि ते तयार करण्यास जवळपास एक वर्ष लागते. यासाठी १०० हून अधिक कामगार फक्त भरतकामावर लक्ष केंद्रित करतात. २०१८ साली ऑगस्ट महिन्यात अल अरबियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये काबाच्या किंग अब्दुल अझीझ कॉम्प्लेक्सचे महासंचालक अहमद बिन मोहम्मद अल-मन्सूरी यांनी म्हटले आहे की, किस्वाह “सुमारे ६७० किलोग्रॅम कच्च्या रेशमापासून तयार केले जाते. त्याला काळ्या रंगात रंगवले जाते. त्यासाठी १२० किलोग्रॅम सोने आणि १०० किलोग्रॅम चांदीच्या धाग्यांचा वापर केला जातो. तसेच त्याला कापसाचे अस्तर असते. कुराणाच्या आयतीचे विणकाम सोने व चांदीच्या धाग्यांनी केले जाते.”

२०२४ साली जुलै महिन्यात सौदी प्रेस एजन्सीने किस्वाह निर्मितीच्या १० टप्प्यांच्या प्रक्रियेचे वर्णन केले होते;

“निर्मिती प्रक्रिया… ‘पाणी गोड करण्यापासून सुरू होते. यात रेशीम धुणे आणि रंगवण्यासाठी विशिष्ट निकषांनुसार पाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर ‘रंगविण्याचा’ टप्पा येतो. या प्रक्रियेत संरक्षक मेणाचा थर काढून टाकला जातो आणि बाह्य आच्छादनासाठी रेशीम काळ्या रंगात आणि अंतर्गत आच्छादन व पैगंबरांच्या कक्षासाठी हिरव्या रंगात रंगवले जाते. नंतर रेशीम विशेष ड्रायरमध्ये वाळवले जाते.”

याशिवाय रेशीम आणि चांदीच्या धाग्यांच्या तसेच सोन्याच्या थराने झाकलेल्या चांदीच्या धाग्यांच्या नमुन्यांवर रंगवण्यापूर्वी आणि नंतरही चाचणी केली जाते. स्वयंचलित विणकामाद्वारे रेशीम धाग्यांना हँकपासून स्पूलमध्ये रूपांतरित केले जाते. जॅक्वार्ड रेशीम विणकाम मशीन बाह्य आच्छादन तयार करते. तर साध्या रेशमी कापडावर कुराणातील आयातींचे प्रिंट आणि भरतकाम तयार केले जाते. त्यानंतर साध्या रेशमी कापडाचे तुकडे विणलेल्या कापडाला जोडले जातात. यानंतर अनेक अन्य टप्पे पार पाडले जातात. शेवटी किस्वाहच्या वेगवेगळ्या भागांना एकत्र करून त्यात पडदा आणि सजावट असलेल्या विभागांचा समावेश केला जातो.

किस्वाहची बदलप्रक्रिया

“… जुना किस्वाह दरवर्षी इस्लामी महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे मुहर्रमच्या पहिल्या दिवशी बदलण्यात येतो. या प्रक्रियेमध्ये पवित्र काबाच्या प्रत्येक भिंतीवरून जुना किस्वाह वेगवेगळ्या प्रकारे काढला जातो. चार तुकड्यांना कोपऱ्यांवर आणि काबाच्या तळाशी एकत्रित करून बांधले जाते आणि त्यानंतर काबाच्या दरवाजाचा पडदा लावला जातो,” असे सौदी प्रेस एजन्सीच्या वृत्तात नमूद केले आहे. जुना किस्वाह काढल्यानंतर तो सरकारच्या गोडावूनमध्ये ठेवला जातो. तिथे त्याचे योग्य तांत्रिक पद्धतीने संरक्षण केले जाते. त्यामुळे रासायनिक प्रक्रिया किंवा जीवाणूंमुळे कापडाचे नुकसान होत नाही,” त्यानंतर, उच्च अधिकाऱ्यांकडून विनंती केली गेली तर तो किस्वाह तुकड्यांमध्ये संग्रहालयांसाठी किंवा भेटवस्तू म्हणून दिला जातो,” असे वृत्तात म्हटले आहे. उदाहरणार्थ, १९८३ साली सौदी अरेबियाच्या संयुक्त राष्ट्रांतील राजदूत शेख फैसल अल-हुजयलान यांनी किस्वाहचा एक भाग संयुक्त राष्ट्रांना भेट म्हणून दिला होता.

Story img Loader