काही जगावेगळं घडलं की त्याची बातमी वाऱ्यासारखी पसरते. गेल्या आठवड्यात अशीच एक बातमी जगभर पसरली. एका चोरीची. बरं चोरी तरी कशाची? मौल्यवान रत्ने, जडजवाहिर, महागड्या गाड्या… नव्हे…. चोरांनी चक्क चीजवर डल्ला मारला होता. अर्थात हे चीज असे-तसे नाही. ते होते विशेष चेडर चीज.

चीज दरोडा कुठे?

लंडनमधील चीज स्पेशालिस्ट अशी ख्याती असलेल्या निल्स यार्ड डेरीतून थोडेथोडके नव्हे तर तब्बल २२ टनांहून अधिक चेडर चीज चोरीला गेले. चीजच्या चोरीला गेलेल्या ९५० चकत्यांची किंमत तब्बल तीन लाख डॉलर्स आहे. विशेष म्हणजे ही चोरीही अगदी सिनेमॅटिक पद्धतीने झाली. एका बड्या फ्रेंच किरकोळ विक्रेत्यासाठी घाऊक वितरक म्हणून काम करत असल्याचा दावा करत या चोरांनी हे चीज पळवले. हे टनांनी चीज रशिया किंवा मध्य आशियात नेल्याचा संशय व्यक्त होत आहे. २१ ऑक्टोबरला ही चोरीची घटना घडली. 

Tunic Worn by Alexander the Great
Alexander the great’s purple tunic: ३००० वर्षे प्राचीन ‘अलेक्झांडर द ग्रेट’चा जांभळा अंगरखा अखेर सापडला; त्याचा भारताशी काय संबंध?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Seaweed imports What is the use of the element What is the benefit of this decision of the central government
चक्क समुद्र शैवालाची आयात? या घटकाचा उपयोग काय? केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किती फायदा?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
close race between Kamala Harris and Donald Trump in US election 2024
अमेरिकेत अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात अभूतपूर्व चुरस! अधिक मते मिळूनही होऊ शकतो पराभव?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा >>>Alexander the great’s purple tunic: ३००० वर्षे प्राचीन ‘अलेक्झांडर द ग्रेट’चा जांभळा अंगरखा अखेर सापडला; नवीन संशोधन काय सांगते?

ब्रिटन पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. पोलीस चीजशी संबंध येऊ शकत असलेल्या संभाव्य लोकांपर्यंत पोहोचून तपास करत आहेत. सेलिब्रिटी, मोठमोठे शेफ, आंतरराष्ट्रीय अधिकाऱ्यांसोबत ही तपास मोहीम सुरू आहे. सेलिब्रिटी शेफ जेमी ऑलिव्हर यांनी समाज माध्यमांवर या चोरीविषयी लिहिताना टिप्पणी केली आहे की जगातलं सर्वोत्तमांपैकी असलेले चेडर चीज चोरी झाले आहे. हे महागडं चीज स्वस्तात विकले जात असताना कोणी पाहिले तर नक्की नजर तिरकी करा असे आवाहनही जेमी यांनी केले आहे. या डेरीच्या मालक सारा स्टुअर्ट यांना या चोरीनंतर लोक सांत्वनपर संदेश पाठवत आहेत. मदत देऊ करत आहेत. चीजचे पुरवठादार मदतीसाठी पुढे आले आहेत.  

चेडर चीज म्हणजे काय?

पिझ्झा, सँडविच, बर्गर, मॅकरोनीप्रेमींना चेडर चीजची महती वेगळी सांगायला नको. पिझ्झावर विरघळून पसरून राहिलेले आणि पिझ्झा, सँडविचचा तुकडा उचलल्यावर ज्या चीजची नाजूक, लांब तारा बनतात ते चेडर चीज. किसलेले चेडर चीज जलद आणि सहज वितळते. यात प्रथिने, व्हिटॅमिन के २, ओमेगा 3 फॅटी ऍसिड भरपूर असते. तसेच हे चीज साठवण्यासाठी जास्त खर्च येतो, त्यामुळे हे महाग असते. 

हेही वाचा >>>Donald Trump on Diwali: अमेरिकेतील हिंदूंनी भोगलेला धर्मद्वेषाचा इतिहास काय सांगतो?

चीजचं युरोपातील महत्त्व…

चेडर चीज हे जगातल्या चीजच्या प्रकारातील सर्वात पसंतीचे चीज आहे. चेडरला ८०० वर्षांची परंपरा आहे. ते अनेकविध प्रकार आणि चवींमध्ये येते.

१२ व्या शतकात चेडर नावाच्या गावात या चीजचा शोध लागला. यामागे एक आख्यायिकाही सांगितली जाते. एका गवळी महिलेने एकदा एका मोठ्या भांड्यातून दूध आणून एका गुहेत थंड करण्यासाठी ठेवले, पण नंतर ती ते तिथेच विसरून गेली. काही दिवसांनी ती पुन्हा गुहेकडे परतली तेव्हा ते दूध घट्ट झाले होते. तिने ते खाल्ले. बस… त्याच क्षणी चेडर चीजचा शोध लागला.

चेडर चीजच्या जन्मभूमीती महती

इंग्लंडमधील सॉमरसेटमधील चेडर हे दऱ्या आणि गुहा असलेले एक छोटे शहर आहे. या गुहांमधील विशिष्ट तापमान चेडर चीज तयार होण्यास पोषक असते. मूळतः स्थानिक शेतकऱ्यांनी बनवलेले, चेडर चीज त्याच्या दीर्घकाळ टिकण्याच्या गुणामुळे लोकप्रिय झाले, ज्यामुळे ते पुढे प्रवासी आणि सैनिकांसाठी एक आदर्श अन्न बनले.