तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांना २०२२ चा प्रतिष्ठित ‘गांधी मंडेला’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या हस्ते धर्मशाळामधील मैक्लॉडगंजच्या ‘थेकचेन चोएलिंग’ या बौद्ध संस्थेत आयोजित कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला. नवी दिल्लीस्थित ‘गांधी मंडेला’ फाउंडेशनकडून त्यांना शांततेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्लेषण: दोषी ठरूनही राजीव गांधींचे मारेकरी सुटले कसे? सुप्रीम कोर्टाचा विशेषाधिकार नेमका आहे तरी काय?

अहिंसा आणि करुणेचे गुण हजारो वर्षांपासून भारतीय संस्कृतीत रुजलेले आहेत, असे मनोगत दलाई लामा यांनी यावेळी व्यक्त केले. ‘ब्रम्हांडातील शांततेचे राजदूत’ म्हणत दलाई लामा या पुरस्कारासाठी जगातील सर्वात योग्य व्यक्ती असल्याचे आर्लेकर यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला भारताचे माजी सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ज्ञान सुधा मिश्रा उपस्थित होते.

गांधी मंडेला’ पुरस्काराचा हेतू

भारत सरकार नोंदणीकृत ‘गांधी मंडेला फाऊंडेशन’कडून हा पुरस्कार दिला जातो. ही एक सेवाभावी संस्था आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांच्या अहिंसेच्या मूल्यांना प्रोत्साहन देण्याचा या संस्थेचा हेतू आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त या संस्थेनं हा पुरस्कार सुरू केला आहे.

विश्लेषण: निवडणुकीनंतर नेपाळमधील राजकीय अस्थिरता संपणार? देऊबा विरुद्ध ओली लढतीत कुणाची बाजी?

पुरस्कारासाठी निवड कशी केली जाते?

गांधी आणि मंडेला यांचा वारसा पुढे नेणाऱ्या आणि शांतता, समाजकल्याण, संस्कृती, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य सेवा, क्रीडा आणि नवनिर्मिती या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. भारताचे माजी सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन, न्यायमूर्ती दीपक मिश्रा, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ज्ञान सुधा मिश्रा, नेपाळचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती केदारनाथ उपाध्याय आणि बांगलादेशचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती एमडी तफज्जुल इस्लाम यांच्यासह ज्युरींनी यंदा पुरस्कारासाठी दलाई लामा यांची निवड केली आहे.

गांधी मंडेला पुरस्कारासाठी दिग्गज नामांकित

या पुरस्कारासाठी २०१९ मध्ये नेपाळचे पंतप्रधान खड्ग प्रसाद शर्मा ओली यांना नामांकित करण्यात आले होते. नामांकनाच्या यादीत बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती दिवंगत शेख मुजीबूर रहमान, श्रीलंकेचे पहिले राष्ट्रपती दिवंगत डॉन स्टीफन सेनानायके, भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचा समावेश होता.

विश्लेषण: ठाण्यातील राजकीय समन्वयाचे पर्व इतिहासजमा झालंय? वारंवार संघर्ष का निर्माण होतोय?

१९८९ साली दलाई लामा ‘नोबल’ पुरस्काराने सन्मानित

आध्यात्मिक नेते दलाई लामा यांचा १९८९ मध्ये ‘नोबल’ शांतता पुरस्काराने गौरव करण्यात आला. दलाई लामा यांनी सजिवांच्या आस्थेतून सर्व मानवजातीला आणि निसर्गाला सामावून घेणारे शांततेचे तत्वज्ञान विकसित केले आहे, असे ‘नोबल’ पुरस्काराच्या संकतेस्थळावर नमुद आहे. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी दलाई लामांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.