राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर २०२४ या वर्षात राज्यात २२ वाघांच्या मृत्यूची नोंद आहे. मात्र, गेल्या काही वर्षात नैसर्गिक कारणाशिवाय इतर कारणांमुळे होणारे मृत्यूही अधिक आहेत. त्यामुळे ही बाब नक्कीच गंभीर आहे.

भंडाऱ्यातील वाघाच्या मृत्युची घटना काय?

भंडारा वनविभागाअंतर्गत येणाऱ्या लेंडेझरी वनक्षेत्रात सोमवारी वाघ मृतावस्थेत आढळला. १४ ते १६ महिने वय असलेल्या वाघाच्या मागच्या पायाला मार लागलेला होता. आतडे तुटलेले होते आणि मानेला प्रचंड मार लागला होता. त्यामुळे हलक्या वाहनाने वाघाला रस्त्यावर धडक दिल्याची दाट शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली. प्रत्यक्षदर्शी आणि वन्यजीव अभ्यासकांना जवळच्या रस्त्यावर वाघाच्या पाऊलखुणा आढळल्या. शवविच्छेदनानंतर वाघाचा मृत्यू रस्ते अपघातात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.

Koregaon Bhima Shaurya Din
Koregaon Bhima Shaurya Din: महार रेजिमेंट आणि कोरेगाव विजय स्तंभ नेमके नाते काय? महार रेजिमेंटची स्थापना कशी झाली?
beed crimes walmik karad latest marathi news
बाहुबलीचे बीड : बीडच्या दहशतीला पवनऊर्जेचे वारे!
four online scams
डिजिटल अटक ते रोमान्स स्कॅम : ऑनलाइन घोटाळ्यांना लोक कसे बळी पडत आहेत? काय आहेत फसवणुकीचे नवीन प्रकार?
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
History of ikat
History of Ikat: इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये भारतीय कापड; काय सांगते इकतची प्राचीन परंपरा?
culture loksatta article
लोक-लौकिक : लोचा आहे का मेंदूत?
AI pioneer Geoffrey Hinton
येत्या ३० वर्षांत ‘एआय’मुळे मानवी उपयोगिताच नष्ट? कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रणेते हिंटन यांचा इशारा काय सांगतो? नियमनाची गरज का?
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक मालकाने सांगितली नेमकी परिस्थिती

महाराष्ट्रात किती वाघ मृत्युमुखी?

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, देशभरात १२४ तर महाराष्ट्रात २२ वाघ मृत्युमुखी पडले. प्रत्यक्षात ही आकडेवारी जास्त असल्याचा अंदाज वन्यजीवप्रेमींचा आहे. मध्य प्रदेशात तब्बल ४६ वाघ मृत्युमुखी पडले. या वर्षात वाघांचे नैसर्गिक मृत्यू कमी आणि रस्ते अपघात व इतर वर्षांतील वाघांचे मृत्यू हे वन्यजीवांच्या झुंजीत, अपघातात, शिकार वा नैसर्गिकरित्या अशा विविध कारणांनी झाले आहेत. यावर्षीदेखील शिकारीच्या घटना समोर आल्या आहेत. काही प्रकरणातील चौकशी सुरू आहे. वाघांचे अपघाती मृत्यू आणि संशयास्पद मृत्यूचे प्रमाण देखील जास्त आहे.

हेही वाचा : येत्या ३० वर्षांत ‘एआय’मुळे मानवी उपयोगिताच नष्ट? कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रणेते हिंटन यांचा इशारा काय सांगतो? नियमनाची गरज का?

संशयास्पद घटना कोणत्या?

मेळघाट प्रादेशिक चिचपल्ली वनविभागाच्या परतवाडा अंतर्गत येणाऱ्या चिखलदरा तालुक्यातील अंजनगाव सुर्जी वनपरिक्षेत्रात वाघ मृत अवस्थेत आढळून आला. यात वाघाचे तीन पंजे गायब होते व एक पंजाला नख नव्हते. चंद्रपूर जिल्ह्यातदेखील वनपरिक्षेत्राच्या मूल उपक्षेत्रातील चिरोली नियतक्षेत्रांतर्गत नलेश्वर येथे वाघाच्या शिकारीचे एक प्रकरण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उघडकीस आले होते. जिवंत विद्युत प्रवाहाचा धक्का लागून पाच महिन्यांपूर्वी या वाघाचा मृत्यू झाला होता. तीन दिवस कुऱ्हाडीच्या सहाय्याने तुकडे करून या वाघाचे अवयव जाळण्यात आले. पेंच व्याघ्रप्रकल्पात पाच दिवसात तीन वाघ मृत्युमुखी पडले.

अनैसर्गिक मृत्यू वाढण्यामागील कारण काय?

जंगलाला लागून असणारे रेषीय प्रकल्प तसेच प्रकल्पांसाठी होणारी वृक्षतोड, संरक्षित जंगलाला लागून असणारे प्रकल्प यामुळे प्राण्यांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप वाढला आहे. जंगल सोडून वाघ बाहेर येण्यामागील आणि विशेषकरुन मानवी वस्त्यांकडे येण्याचे हेदेखील एक कारण मानले जाते. स्वसंरक्षणासाठी आणि पिकांचे नुकसान टाळण्यासाठी केलेल्या उपायांनी जंगलाच्या राजाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. हिवाळा ते उन्हाळा या कालावधीत पाणी आणि शिकारीच्या शोधार्थ वाघ स्थलांतर करत आहेत. तृणभक्षी प्राण्यांच्या शोधात शेतात येणाऱ्या वाघांसाठी वीजप्रवाह, विषप्रयोग याचा वापर गावकरी करत आहेत. नुकताच वयात आलेला आणि आईपासून वेगळा झालेला वाघ बरेचदा नव्या अधिवासाच्या शोधात बाहेर पडताना रस्ते अपघातात मृत्यू होत आहेत.

हेही वाचा : विश्लेषण : भारतीय लष्करातील प्राणी-विभागावर ‘कॅग’चे कोणते ठपके?

वाघांचे असे मृत्यू चिंताजनक का?

जानेवारी २०२४ ते मे २०२४ पर्यंत १६ वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती विधिमंडळात सरकारने दिली. तर राज्याचा विचार करता २०१८ ते मे २०२४ या कालावधीत विद्युत प्रवाहामुळे २२ वाघांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे समोर येत असतानाच राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने २०२४ या वर्षांतील वाघांचे मृत्यू हे वन्यजीवांच्या झुंजीत, अपघातात, शिकार वा नैसर्गिकरित्या अशा विविध कारणांनी झाल्याचे सांगितले आहे. या वर्षीदेखील शिकारीच्या घटना समोर आल्या आहेत. काही प्रकरणातील चौकशी सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची नखे आणि आरोपींना अटक करण्यात आली. २०१८ मध्ये चार वाघांची शिकार, तीन वाघांचा अपघाती मृत्यू, २०१९ मध्ये पाच वाघांची शिकार, तीन वाघांचा अपघाती मृत्यू, २०२० मध्ये पाच वाघांची विद्युत प्रवाहाने शिकार, एका वाघाचा अपघाती मृत्यू, २०२१ मध्ये सात वाघांची शिकार, एका वाघाचा अपघाती मृत्यू तर तीन वाघांचा विद्युत प्रवाहाने मृत्यू, २०२२ मध्ये तीन वाघांची शिकार, चार वाघांचा विद्युत प्रवाहामुळे मृत्यू तर तीन वाघांचा अपघाती मृत्यू झाला. राज्यातील वाघांच्या मृत्युपेक्षाही मृत्युमागील कारणे चिंता वाढवणारे आहेत.

हेही वाचा : महाराष्ट्रातील शासकीय बंगल्यांना नावे देण्याची परंपरा नेमकी काय आहे?

तपास आवश्यक का?

वाघांचा नैसर्गिक मृत्यू हा परिसंस्थेचा एक अपरिहार्य भाग आहे. यात कधी अधिवासाची लढाई, तर कधी वृद्धत्वामुळे होणाऱ्या मृत्यूचा समावेश आहे. तरीही या नैसर्गिक मृत्यूमागील परिस्थितीचा शोध घेणे हे वनखात्यासमोरचे आव्हान आहे. वाघाचा मृतदेह शोधणे, त्याचे दस्तऐवजीकरण करणे, विशेषत: दुर्गम भागात आणि पावसाळ्यात वनखात्यासमोरची आव्हाने या समस्येत आणखी भर घालतात. त्यामुळे बरेचदा मृत्यू नैसर्गिक दिसत असला तरीही त्यामागील कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर अधिकांश मृत्यू हे नैसर्गिक असल्याची नोंद केली जाते. प्रत्यक्षात वाघांचे मृत्यू होतात, तेव्हा त्यामागे इतरही अनैसर्गिक कारणे असतात, हे अलीकडच्या काही वर्षातील स्थितीवरून दिसते. त्यामुळे मृत्यू नैसर्गिक असला तरी त्याचा बारकाईने तपास आवश्यक आहे.

rakhi.chavhan@expressindia.com

Story img Loader