Mucinex method: स्वतःच्या रक्तामांसाच्या मुलांना जन्म देण्याची इच्छा आपल्यापैकी अनेकांमध्ये नैसर्गिकरित्या असते. विशेषतः जी जोडपी वंध्यत्वाशी झुंजत असतात त्यांच्यामध्ये ही इच्छा अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे सोप्या उपायाचा अवलंब करून मिळणाऱ्या आश्वासनाकडे दुर्लक्ष करणे अनेकांसाठी कठीण ठरते. कदाचित म्हणूनच “म्युसिनेक्स पद्धत” सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे. टिकटॉकवर अनेक महिला म्युसिनेक्स किंवा त्याच्यासारख्या गुआयफेनेसिन असलेल्या ओव्हर-द-काउंटर मिळणाऱ्या औषधांच्या वापरामुळे यशस्वी गर्भधारणा झाल्याचे सांगत आहेत, हे औषध सामान्यतः खोकला आणि सर्दीसाठी वापरले जाते.

अधिक वाचा: Mumbai’s first encounter: मुंबईतील पहिलं एन्काऊंटर मन्या सुर्वे, नेमकं काय घडलं होतं? 

country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
ngapur Egg prices risen early this year due to increased production costs
थंडी वाढताच अंड्याच्या दरात मोठी वाढ, थंडी आणि दरवाढीचा संबंध काय?
four days week in japan
विश्लेषण : जन्मदर वाढविण्यासाठी जपानमध्ये चार दिवसांचा आठवडा..! काय आहेत कारणे? योजना कशी राबवणार?
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
mercury in nashik drops 9 4 degrees celsius
नाशिकमध्ये थंडीचे पुनरागमन; पारा ९.४ अंशावर

सर्दी-खोकल्याची औषध महिलांना गर्भधारणेसाठी फायदेशीर ठरतात?

असुरक्षित लैंगिक संभोगा दरम्यान शुक्राणू योनीच्या वरच्या बाजूस जमा होतात. गर्भधारणेसाठी हे शुक्राणू अंड्यापर्यंत पोहोचणे आणि फलित होणे आवश्यक असते. त्यासाठी शुक्राणूंनी प्रथम सर्विक्स (गर्भाशय ग्रीवा), योनी आणि गर्भाशयाला जोडणारी एक छोटा नलिका पार करणं गरजेचं असतं. सरवाइकल म्यूकसच्या निर्मितीद्वारे शुक्राणूंच्या मार्गाचे नियमन करण्यात सर्विक्स (गर्भाशय ग्रीवा) महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. स्त्रीच्या मासिक पाळीदरम्यान मासिक स्रावाचे प्रमाण कमी- अधिक दाट होत असते. हे प्रमाण एरवीही दाट किंवा ते खूप जाड असेल तर ते शुक्राणूंना अंड्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखते. याउलट सर्दी-खोकल्याच्या औषध घेण्याच्या मागे अशी संकल्पना आहे की, Mucinex घेतल्याने स्त्री तिच्या गर्भाशयाच्या मुखाचा स्राव (श्लेष्मा) पातळ करू शकते आणि त्यामुळे शुक्राणूंना अंड्यापर्यंत पोहोचण्यास मदत होते.

फर्टिलिटी ट्रॅकिंग ॲप्सचा वापर

फर्टिलिटी ट्रॅकिंग ॲप्सच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे वापरकर्त्यांमध्ये प्रजननक्षम कालखंडाच्या लक्षणांबद्दल जागरुकता वाढली आहे. यात गर्भाशय मुखस्रावाचे (म्युकस) प्रमाण आणि फलन क्षमतेच्या सुयोग्य स्थितीचे निरीक्षण समाविष्ट आहे. एकदा त्यांच्या वैयक्तिक लक्षणांशी परिचित झाल्यानंतर, असे दिसून येते की ज्या स्त्रिया गर्भधारणेसाठी प्रयत्न करत आहेत किंवा खरंच, गर्भधारणेसाठी संघर्ष करत आहेत त्या कोणत्याही चक्रात गर्भधारणेची शक्यता कशी अनुकूल करायची याचा विचार करू शकतात. त्यामुळेच त्यांना Mucinex सारखे साधे ओव्हर-द-काउंटर औषध डाएटिंग किंवा जीवनशैलीतील इतर घटकांमध्ये बदल करण्यापेक्षा अधिक जलद परिणामांसह साधे उपाय वाटू लागतात. म्हणूनच प्रजनन सहाय्यक म्हणून Mucinex, किंवा इतर guaifenesin-युक्त औषधे घेण्याच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे .

पुराव्यांचा अभाव

वस्तुस्थिती अशी आहे की, म्युसिनेक्स प्रजननक्षमतेत मदत करू शकते हे सिद्ध करणारे फार कमी वैज्ञानिक पुरावे उपलब्ध आहेत. १९८२ साली यावर सविस्तर संशोधन करण्यात आले होते. या संशोधनातून निघालेला निष्कर्ष जर्नल फर्टिलिटी आणि स्टेरिलिटीमध्ये प्रकाशित झाला आहे. या संशोधनात शास्त्रज्ञांनी ४० जोडप्यांचा अभ्यास केला होता. ज्यांना वंध्यत्वाची समस्या होती.

अधिक वाचा: Tumbbad Sardar Purandare Wada: तुंबाड चित्रपटातील ‘तो’ चित्तथरारक वाडा नेमका आहे कुठे? त्याचे ऐतिहासिक महत्त्व काय?

या संशोधनात सहभागी महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या पाचव्या दिवसापासून दिवसातून तीन वेळा २०० mg guaifenesin देण्यात आले. संशोधनाच्या शेवटी ४० पैकी १५ जोडप्यांना गर्भधारणा झाली आणि त्याचमुळे अनेकांनी ग्वायफेनेसिनच्या वापराचे समर्थन केले होते.
परंतु, ग्वायफेनेसिन न घेणारा गट यात सहभागी नसल्यामुळे या गर्भधारणेचे श्रेय केवळ गुआयफेनेसिनला देणे शक्य नाही.

एका वेगळ्या केस स्टडीमध्ये, एका माणसाने दिवसातून दोनदा दोन महिने ६०० mg guaifenesin घेतले. या अभ्यासात शुक्राणूंचे अधिक प्रमाण आणि सक्रियता नोंदवली गेली. परंतु, हा प्रयोग एका ३२ वर्षाच्या पुरुषावर केला गेल्याने, संशोधकांना शुक्राणूंचे वाढलेले प्रमाण नक्की ग्वायफेनेसिन मुळे झाले हे निश्चित सांगता आले नाही . रेकिट हे म्युसिनेक्सचे निर्माते आहेत. त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, म्युसिनेक्सचा वापर केवळ लेबलवर जो हेतू दिला आहे त्या साठीच करावा. वंध्यत्वासाठी Mucinex घेतल्याने ऑफ-लेबल वापर होतो.

गर्भधारणेसाठी गुआयफेनेसिनचा वापर केल्याने दुष्परिणाम काय असू शकतात?

गुआयफेनेसिन आणि जन्मदोषांमध्ये कोणतेही संबंध आढळलेले नसले तरी गुआयफेनेसिन गर्भधारणेला मदत करू शकते का याबाबत ठोस माहिती नाही. पालक होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी कदाचित हे आकर्षण असेल. परंतु, प्रजननक्षमता सुधारण्यासाठी गुआयफेनेसिन घेण्याचे समर्थन करणारा पुरेसा पुरावा उपलब्ध नाही. गर्भधारणेच्या शक्यता वाढवण्यासाठी इतर काही साध्या जीवनशैलीतील बदल अधिक फायदेशीर ठरले आहेत. यामध्ये योग्य वजन आणि आहार, मद्यसेवन कमी करणे, धूम्रपान सोडणे आणि तणाव कमी करणे यांचा समावेश आहे. जे लोक गर्भधारणेची अडचण अनुभवत आहेत, त्यांच्यासाठी सर्वात चांगला आणि कदाचित सर्वात सोपा सल्ला म्हणजे आपल्या डॉक्टरांशी बोलणे हाच आहे.

Story img Loader