Time Moves Faster on the Moon: अलीकडील एका अभ्यासातून अतिशय रोचक आणि आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे! चंद्रावर वेळ पृथ्वीपेक्षा जलद पुढे जातो. अल्बर्ट आइन्स्टाईनच्या सामान्य सापेक्षतावादाच्या (General Relativity) सिद्धांतावर आधारित या शोधामुळे भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी, विशेषतः नासाच्या आर्टेमिस कार्यक्रमांतर्गत चंद्रावर अंतराळवीरांना पुन्हा पाठवण्याच्या तयारीवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो, त्याविषयी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चंद्रावर वेळ वेगाने का धावतो? Why Time Moves Faster on the Moon

नव्या अभ्यासानुसार चंद्रावर वेळ जलद चालण्याचे मुख्य कारण म्हणजे चंद्रावरील गुरुत्वाकर्षण. पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणापेक्षा चंद्रावरील गुरुत्वाकर्षण कमी आहे. आइन्स्टाईनच्या सिद्धांतानुसार मजबूत गुरुत्वीय क्षेत्रांमध्ये वेळ हळूहळू पुढे सरकते. तर कमकुवत गुरुत्वीय क्षेत्रांमध्ये वेळ जलद पुढे सरकते. चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या केवळ एक षष्ठमांश आहे, त्यामुळे चंद्रावर वेळ किंचित जलद पुढे सरकते. हा फरक खूपच लहान आहे. दररोज फक्त सुमारे ५६ मायक्रोसेकंद किंवा ०.००००५६ सेकंद इतके त्याचे प्रमाण आहे. परंतु भविष्यातील अंतराळ मोहिमांची योजना करताना शास्त्रज्ञांना याचा विचार निश्चितच करावा लागेल.

अधिक वाचा: NASA killed Life on Mars?: नासाने मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीचा नाश केला का? नवीन संशोधन काय सुचवते?

शास्त्रज्ञांनी हे कसे शोधले?

हे संशोधन ‘Astronomical Journal’ मध्ये प्रकाशित झाले असून या संशोधनाचे श्रेय ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी (NIST)’ चे बिजुनाथ पाटला आणि नील अॅश्बी यांच्याकडे जाते. विविध ऑनलाइन माध्यमांद्वारे सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार त्यांनी आइन्स्टाईनच्या सामान्य सापेक्षतावादाच्या सिद्धांताचा उपयोग करून गुरुत्वाकर्षण वेळेवर कसा परिणाम करते हे मोजले. त्यांनी पृथ्वी आणि चंद्र अंतराळातून कसे फिरतात, त्यांचा एकमेकांच्या गुरुत्वाकर्षणावर कसा परिणाम होतो, यांसारख्या महत्त्वाच्या घटकांचा विचार के ला. या सर्व बाबींचा विचार करून ते निष्कर्षापर्यंत पोहोचले की, चंद्रावरचे घड्याळ पृथ्वीवरील घड्याळाच्या तुलनेत पृथ्वीच्या एका दिवसानंतर ५६ मायक्रोसेकंद पुढे सरकते.

भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी हे महत्त्वाचे का आहे?

५६ मायक्रोसेकंद हा खूपच लहान फरक वाटतो, पण भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी तो खूप महत्त्वाचा ठरू शकतो. नासाच्या ‘आर्टेमिस’ कार्यक्रमात मानवाला पुन्हा चंद्रावर पाठवण्याची योजना आहे. ज्यासाठी संवाद आणि नेव्हिगेशन प्रणाली अचूकपणे काम करणे गरजेचे आहे, असे वेगवेगळ्या अहवालांमध्ये सांगितले आहे. अंतराळात अशा छोट्या वेळेतील फरकांचा कालांतराने मोठा परिणाम होऊ शकतो. जसे की, अंतराळयानाच्या नेव्हिगेशन प्रणालीवर आणि पृथ्वी-चंद्रादरम्यान डेटा जुळवण्यात फरक होऊ शकतो. त्यामुळे पृथ्वी आणि चंद्रादरम्यान सर्व काही योग्य संतुलनात ठेवण्यासाठी चंद्रावर वेळ जलद जात असल्याचा विचार वैज्ञानिकांना करावा लागणार आहे.

पृथ्वी आणि चंद्र – समन्वय वेळ

या वेळेतील फरक लक्षात घेऊन संशोधनाच्या लेखकांनी ‘समन्वित चांद्र वेळ’ (Coordinated Lunar Time – LTC) प्रणाली तयार करण्याची शिफारस केली आहे. ही प्रणाली चंद्रासाठी एक मानक वेळ प्रणाली असेल, जी पृथ्वीवरील ‘समन्वित सार्वत्रिक वेळे’ प्रमाणे (Coordinated Universal Time – UTC) काम करेल. चंद्रावरील वेळ पृथ्वीवरील घड्याळांशी जुळवणे वैज्ञानिकांना संवाद सुरळीत ठेवणे, सुरक्षित प्रवास करणे, आणि विश्वासार्ह तंत्रज्ञान विकसित करणे यासाठी उपयुक्त ठरेल. नासा आणि इतर सरकारी संस्था २०२६ पर्यंत चंद्रावरील वेळ पृथ्वीच्या वेळेशी जुळवण्याच्या योजनेवर काम करत आहेत.

अधिक वाचा: Why Earth Looks Flat:पृथ्वी गोल असूनही ती सपाट कशामुळे दिसते?

चंद्रावर भविष्य घडवण्याची तयारी!

अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्याबरोबरच, ‘आर्टेमिस’ मोहिमेचा उद्देश चंद्रावर कायमस्वरूपी मानवी वस्ती निर्माण करण्याचा आहे. यासाठी चंद्रावर वेगवेगळे तळ उभारले जातील, जिथे लोक राहतील आणि कामही करू शकतील, तसेच मानवी आणि मालवाहू वाहतुकीसाठी चंद्राच्या पृष्ठभागावर वाहतूक व्यवस्था तयार केली जाईल. नियोजनानुसार, या दीर्घकालीन योजना यशस्वी होण्यासाठी चंद्रावरील प्रत्येक गोष्ट अचूक समन्वयाने चालणे आवश्यक आहे. या यंत्रणांचे संचालन सुरळीत होण्यासाठी वेळेचे अचूक व्यवस्थापन खूप महत्त्वाचे ठरेल. अलीकडील संशोधनात वेळेच्या लवचीकतेविषयी समोर आलेल्या माहितीने हे सिद्ध केले आहे की, चंद्रावरील जीवनाच्या नियोजनासाठी गुरुत्वाकर्षण आणि वेळ यांचा परस्पर संबंध समजून घेणे अत्यावश्यक आहे.