इस्रायलवर शनिवारी हमासने अतिशय मोठा आणि घातक असा हल्ला केला, ज्यामुळे जगभरातील देशांचे नेते हादरून गेले आहेत. सुमारे एक दशकापूर्वी इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये उसळलेल्या युद्धानंतर हा हल्ला झाला आहे. अनेक दशके दोन्ही देशात चाललेल्या युद्धात आजवर हजारो नागरिक मारले गेले आहेत. कित्येकजण तेव्हापासून युद्धाच्या सावटाखाली जगत आहेत. रॉकेट किंवा बॉम्ब आपल्यावर कधीही आदळू शकतो, अशी भीती येथील नागरिकांना सतत सतावत असते. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये आतापर्यंत कितीवेळा संघर्ष पेटला? दोन शतकांमध्ये विखुरलेल्या काही मुख्य घटनांची केलेली ही उजळणी …
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हे वाचा >> “ती स्वर्गात गेली”, हमास दहशतवाद्यांनी कुटुंबासमोर इस्रायली तरूणीला दिली फाशी…
- यावर्षी अनेकवेळा पॅलेस्टाईनचे शहर जेनिन येथे शेकडो इस्रायली सैनिकांनी लष्करी हल्ले केले. जानेवारी महिन्यात, जेरूसलेम येथील एका सिनेगॉगमध्ये एक पॅलेस्टिनी नागरिकाने सात ज्यू लोकांची हत्या केली.
- २०२२ साली इस्रायलच्या शहरांमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाल्यानंतर संतापलेल्या इस्रायलच्या सुरक्षा दलाने इस्रायलव्याप्त ‘पश्चिम किनारा’ या पॅलेस्टाईनच्या भूभागावर जबर हल्ला केला. ज्यामध्ये १६६ लोकांचे प्राण गेले.
‘हमास’च्या इस्रायलवरील हल्ल्यामागचे कारण काय? आखातात मोठ्या युद्धाचा भडका उडणार? - मे २०२१ मध्ये, इस्रायलच्या पोलिसांनी इस्लाम धर्मीयांचे तिसऱ्या क्रमाकांचे पवित्र स्थळ असलेल्या जेरुसलेममधील अल-अक्सा मशीदीवर धाड टाकली. यामुळे इस्रायल आणि हमास यांच्यात ११ दिवसांचे तुंबळ युद्ध झाले. ज्यामुळे २०० पॅलेस्टाईन आणि १० इस्रायलचे नागरिक मारले गेले.
- २०१८ मध्ये, गाझापट्टी आणि इस्रायलला वेगळे करणाऱ्या कुंपनामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पॅलेस्टाईन नागरिकांवर हल्ला केल्यामुळे १७० लोक मारले गेले होते.
- २०१४ साली, हमासने तीन इस्रायली मुलांचे अपहरण करून त्यांना ठार केले. गाझा येथून रॉकेट हल्ला करून इस्रायलला प्रतिहल्ला करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. यावेळी झालेल्या छोट्याश्या लढाईत १,८८१ हून अधिक पॅलेस्टाईन नागरिक मारले गेले, तर इस्रायलच्या ६० नागरिकांचा मृत्यू झाला.
- नोव्हेंबर २०१२ मध्ये, इस्रायलने हमासचे लष्कर प्रमुख अहमद अल-जाबरी यांची हत्या केली. या घटनेनंतर एक आठवड्याहून अधिक काळ दोन्ही देशांमध्ये गोळीबार सुरू होता, ज्यात १५० हून अधिक पॅलेस्टाईन नागरिक आणि सहा इस्रायलच्या लोकांचा मृत्यू झाला.
- जानेवारी २००९ साली, इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांनी एकतर्फी युद्धविरामाची घोषणा केली. त्यानंतर इस्रायलने गाझामधून माघार घेतली.
- गाझामधून इस्रायलवर रॉकेट सोडल्यामुळे इस्रायलने डिसेंबर २००८ साली हमासला लक्ष्य करण्यासाठी प्रतिहल्ला केला, ज्यामध्ये २०० पॅलेस्टाईन नागरिकांचा बळी गेला. त्यानंतर लगेचच हमासविरोधात युद्धाची घोषणा करण्यात आली. या युद्धात पॅलेस्टाईनच्या १,२०० आणि इस्रायलच्या १३ नागरिकांचा मृत्यू झाला.
- जानेवारी २००६ मध्ये पॅलेस्टाईनचे नेते आणि फताह या निमलष्करी संस्थेचे सहसंस्थापक यासर अराफत यांच्या मृत्यूनंतर एका वर्षाने हमासने पॅलेस्टाईनच्या संसदीय निवडणुकीत विजय मिळविला. एक वर्षानंतर, फताह सैनिकांना हुसकावून लावत गाझावर ताबा मिळविला.
- सप्टेंबर २००५ साली, इस्रायलने गाझातून माघार घेतली. तरीही गाझापट्टीतून पॅलेस्टाईन नगरिकांना बाहेर येण्यास आणि बाहेरून कुणाला आत येण्यास मज्जाव केला, त्यामुळे इस्रायलवर बरीच टीका झाली.
- सप्टेंबर २००० साली, कॅम्प डेव्हिड येथे इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील वाटाघाटी निष्फळ ठरल्यानंतर पॅलेस्टाईनमधील तरुणांनी इस्रायल पोलिसांवर दगडफेक सुरू करून दुसऱ्या इंतिफादा (Intifada) ची सुरुवात केली. (इंतिफादा हा अरेबिक शब्द असून त्याचा अर्थ होतो प्रतिकार करणे. पहिला इंतिफादा १९८७ ते १९९३ या काळात चालला होता) इस्रायलशी लढण्याची तयारी दर्शविल्यामुळे पॅलस्टाईनमध्ये हमासचा पाठिंबा वाढत गेला.
इस्रायलचे रॉकेट हल्ल्यापासून संरक्षण करणारी आयर्न डोम यंत्रणा काय आहे? - १९९७ मध्ये दोन आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात २७ लोक मारले गेले. त्यानंतर इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान शिमॉन पेरेस यांनी घोषणा केली की, हमासच्या विरोधात अखंड युद्ध पुकरले जाईल.
- १९९३ साली, अराफत यांनी इस्रायलशी ओस्लो करार केला आणि दोन्ही राष्ट्रांनी परस्पर संमतीने संघर्ष संपविण्याचे वचन दिले. हमासने मात्र या कराराचा विरोध केला आणि इस्रायलमध्ये आत्मघाती बॉम्बहल्ल्याची मालिका सुरू केली.
- डिसेंबर १९८७ रोजी, पश्चिम किनारा आणि गाझा येथे राहणाऱ्या पॅलेस्टाईनच्या नागरिकांनी पहिल्या इंतिफादाची सुरुवात केली. मुस्लीम ब्रदरहूडच्या सदस्यांनी हमासची स्थापना केली.
- २६ मार्च १९७९ साली, इजिप्त आणि इस्रायल या देशांनी अमेरिकेच्या व्हाईस हाऊस येथे एका करारावर स्वाक्षरी केली. या कराराद्वारे इस्रायलने सिनाई द्वीपकल्पातून पूर्णतः माघार घेण्याचे वचन दिले. दोन्ही देशांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशातील पॅलेस्टाईनच्या नागरिकांना स्वराज्य देण्याच्या करारावर सहमती दर्शविली. तीन वर्षांनंतर अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी जॉर्डनच्या देखरेखीखाली पॅलेस्टाईनला पूर्ण स्वायतत्ता देण्यासाठी आपला पाठिंबा व्यक्त केला. पण इस्रायलने ही योजना नाकारली.
- ६ ऑक्टोबर १९७३ साली इजिप्त आणि सीरियाने योम किप्पूर या ज्यू सणाच्या दिवशी अचानकपणे इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामुळे चौथ्या अरब-ज्यू युद्धाची ठिणगी पडली होती. १९ दिवस चाललेल्या या युद्धात जवळपास २,७०० इस्रायली सैनिक मारले गेले आणि हजारो सैनिक जखमी झाले. त्यावेळी इस्रायलची लोकसंख्या केवळ ३० लाख एवढी होती.
- जून १९६७ मध्ये झालेल्या सहा दिवसांच्या युद्धादरम्यान इस्रायलने गाझापट्टी आणि सिनाई द्वीपकल्पावर ताबा मिळवला होता.
- जानेवारी १९५७ मध्ये, गाझा पट्टी आणि अकाबाचा आखाती भाग वगळता इजिप्तच्या भूमीतून इस्रायलने माघार घेतली. तसेच गाझा पट्टी ही कधीही इजिप्तची नव्हती, असाही युक्तीवाद इस्रायलने केला.
- ऑक्टोबर १९५६ मध्ये, इजिप्तच्या राष्ट्रपतींनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केल्यानंतरच्या काही महिन्यातच इस्रायलची जहाज वाहतूक बंद केली. त्यानंतर इस्रायलने गाझा आणि सिनाई द्वीपकल्पावर हल्ला चढवला. त्याचवर्षी नोव्हेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्रांने ब्रिटन, फ्रान्स आणि इस्रायलला इजिप्तधून आपले सैन्य मागे घेण्याचे आवाहन केले.
- १९४९ साली, नव्याने स्थापना झालेल्या इस्रायल देशाने शेजारी असलेल्या अरब देशांशी युद्धाची घोषणा केली. त्यावेळी १९४९ च्या करारानुसार गाझा पट्टी इजिप्तच्या ताब्यात होती.