Tirupati Balaji Prasad Ladoo : तिरुपती बालाजीचा प्रसाद म्हणून मिळणारे लाडू (Tirupati Balaji Prasad Ladoo) सध्या चर्चेत आहेत. याचं कारण आहे चंद्राबाबू नायडूंनी वाय एस आर जगन रेड्डींवर केलेला आरोप. माजी मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्या कार्यकाळात या लाडूंमध्ये जनावरांची चरबी वापरली गेली आणि लाडूंचं पावित्र्य भंग करण्यात आलं असा आरोप चंद्राबाबू नायडूंनी केला आहे. तिरुपती मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये ( Tirupati Balaji Prasad Ladoo ) प्राण्यांची चरबी आणि फिश ऑईलचे अंश आढळून आल्याचे सिद्ध झाले असल्याची माहिती लॅबच्या तपासणी रिपोर्टमधून समोर आली आहे. मात्र हे लाडू तयार कसे केले जातात हे तुम्हाला माहीत आहे का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३०० वर्षांपासूनची परंपरा काय आहे?

तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून तयार केल्या जाणाऱ्या लाडूची ( Tirupati Balaji Prasad Ladoo ) परंपरा ३०० वर्षांपासून आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार १७१५ या वर्षापासून तिरुपती मंदिरात लाडूचा प्रसाद तयार करण्यात येतो. या लाडूची खासियत आहे की हे लाडू बरेच दिवस खराब होत नाहीत. तसंच या लाडवांची किंमत १० रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत अशी मर्यादित ठेवण्यात आली आहे. त्यामुळे तिरुपती बालाजीच्या दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक लाडूचा प्रसाद घेऊन जातोच जातो.

लाडू जिथे तयार होतात त्या स्वयंपाक घराला म्हटलं जातं ‘पोटू’

सध्याच्या घडीला तिरुपती बालाजी देवस्थानतर्फे दररोज सहा लाख लाडू ( Tirupati Balaji Prasad Ladoo ) तयार केले जातात. हे लाडू मशीनद्वारे तयार केले जातात आणि हे लाडू तयार करणारे स्वयंपाकीही वेगळे आहेत. हे लाडू जिथे तयार केले जातात त्या स्वयंपाक घराला पोटू असं म्हणतात. मंदिराचे पूजारी आणि काही खास लोकांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जातो. लाडू मशीनमध्ये वळले जातात. तर स्वच्छता राखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते. तसंच या ठिकाणी जे स्वयंपाकी काम करतात त्यांच्या स्वच्छतेचीही विशेष खबरदारी घेतली जाते. लाडू तयार करणाऱ्या स्वयंपाकींनी टक्कल करणं सक्तीचं आहे. तसंच स्वयंपाक घरात वावरताना त्यांनी एकच स्वच्छ वस्त्र वापरणं अपेक्षित आहे.

प्रसादाच्या लाडूमध्ये काय घटक पदार्थ वापरले जातात?

लाडू तयार करण्यासाठी बेसन, तूप, काजू आणि वेलची हे घटक पदार्थ वापरले जातात. काजू, वेलची, बेदाणी आणि खडी साखर मिसळलेलं लाडूचं मिश्रण मुरवलं जातं आणि त्यानंतर लाडू वळले जातात. तसंच लाडूसाठी जे तूप वापरण्यात येतं त्यात कुठल्याही प्रकारची तडजोड केली जात नाही.

लाडू तयार करण्यासाठी २०० वर्षांहून अधिक काळ चुलीचा वापर

लाडूचं मिश्रण तयार करण्यासाठी २०० वर्षांहून अधिक काळ चुलीचा वापर करण्यात आला. मात्र मागच्या काही दशकांपासून एलपीजी गॅस वापरण्यात येतो आहे. सध्याच्या घडीला या ठिकाणी असलेलं ‘पोटू’ हे वैविध्यपूर्ण सोयींनी सुसज्ज आहे. प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. लाडू तयार झाला की प्रत्येक बॅचचा पहिला लाडू तिरुपती बालाजीला नैवैद्य म्हणून दाखवला जातो. या लाडूला ‘तिरुपती लड्डू’ असं विशेष नावही देण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tirupati balaji prasad ladoo how are tirupati balaji prasad laddoos prepared what exactly is potu maindc scj
Show comments