‘रॉयल मेल शिप (आरएमएस) टायटॅनिक’ जहाजाला बुडून ११० वर्षे झाली आहेत. मात्र टायटॅनिक जहाज आणि या जहाजासोबत घडलेली दुर्घटना हा अनेकांसाठी आजही कुतूहलाचा विषय आहे. या दुर्घटनेबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. आपल्या पहिल्याच प्रवासात हे जहाज १४ एप्रिल १९१२ रोजी अटलांटिक समुद्रात बुडाले. या दुर्घटनेत हजारो प्रवाशांच्या मृत्यू झाला. विशेष म्हणजे या जहाजात जगभरात ओळख असलेल्या अनेक प्रसिद्ध व्यक्तीदेखील होत्या. दरम्यान, या जहाजाशी संबंधित अनेक वस्तूंचा लिलाव करण्यात आला आहे. सध्या अशाच एका लिलाव प्रक्रियेमुळे टायटॅनिक जहाज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण: तुकडेबंदीबाबत न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकारसमोर पेच काय?
जहाजाचा नकाशा लिलावात विकला जाणार!
टायटॅनिक जहाजासोबत घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी जहाजाचा एक नकाशा (प्लॅन) काढण्यात आला होता. या नकाशाच्या आधारे जहाज का बुडाले, त्याची कारणे काय? याची चौकशी करण्यात आली. हाच नकाशा आता २२ एप्रिल रोजी लिलावात विकण्यात येणार आहे. हा नकाशा २ लाख पौंड (साधारण दोन कोटी रुपये) पेक्षा जास्त किमतीला विकला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा नकाशा हाताने काढण्यात आलेला असून त्याचा लिलाव ‘हेन्री अल्डरीज् ॲण्ड सन्स लिमिटेड’ या कंपनीकडून केला जाणार आहे.
पत्र आणि पदकांचाही होणार लिलाव!
टायटॅनिक जहाज बुडताना जास्तीत जास्त प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वेळी वायरलेस ऑपरेटर हॅरॉल्ड कॉटाम यांनी मोलाची कामगिरी केली होती. प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत त्यांना अनेक पदकांनी सन्मानित करण्यात आले होते. ही पदकेदेखील लिलावासाठी ठेवण्यात येणार आहेत. लिलावात पदकांच्या विक्रीतून २० हजार (साधारण २० लाख रुपये) ते ३० (साधारण ३० लाख रुपये) हजार पौंड मिळण्याची शक्यता आहे. लंडनमधील ‘चार्ल्स मिलर लिमिटेड’ या मौल्यवान वस्तूंचा लिलाव करणाऱ्या संस्थेकडून २५ एप्रिल रोजी लिलावाचे आयोजन करण्यात येणार आहे. या लिलाव प्रक्रियेत टायटॅनिक जहाजाच्या दुर्घटनेचा उल्लेख असलेल्या सर्वांत पहिल्या (तसा दावा केला जातो) पोस्टकार्डचा लिलाव करण्यात येणार आहे. जहाज बुडाल्यानंतर ३६ तासांनंतर हे पोस्टकार्ड लिहिण्यात आले होते, असे म्हटले जाते. हे पोस्टकार्ड २ हजार ते ३ हजार पौंडला विकले जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण: समलिंगी विवाह कायद्याबाबत सरकार आणि संघटनांची भूमिका काय? असे विवाह किती देशांमध्ये वैध?
जहाजात प्रवास करीत होत्या अनेक दिग्गज व्यक्ती
टायटॅनिक जहाजामध्ये साधारण २ हजार प्रवासी होते. यामध्ये अनेक जगप्रसिद्ध व्यक्तींचा समावेश होता. लक्षाधीश जॉन जॅकोब अस्टोर, इतिहासकार आणि लेखक आर्चिबाल्ड ग्रॅसी IV, दानशूर व्यक्ती नोएल लेसली, तसेच टायटॅनिक जहाजाची रचना करणारे थॉमस ॲण्ड्र्यू अशा दिग्गज व्यक्ती या जहाजातून प्रवास करीत होत्या. मात्र एका मोठ्या हिमनगाशी टक्कर झाल्यामुळे या जहाजाला जलसमाधी मिळाली. १९१२ साली या जहाजाच्या बांधणीसाठी ७.५ दशलक्ष डॉलर्स एवढा खर्च आला होता. या जहाजासोबत घडलेल्या अपघातासंदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात. या दुर्घटनेवर अनेक चित्रपट निघाल्यामुळे हा विषय लोकांसाठी अधिकच कुतूहलाचा ठरत आला आहे.
जहाजात व्यायामशाळा, जलतरण तलाव अशी सोय!
‘कधीही न बुडणारे जहाज’ असे टायटॅनिकला म्हटले जायचे. हे जहाज ‘व्हाइट स्टार लाइन’ या ब्रिटिश शिपिंग कंपनीच्या मालकीचे होते. तर बेलफास्ट येथील हारलॅण्ड आणि वॉल्फ या कंपनीने या जहाजाची बांधणी केली होती. ‘टायटॅनिक’ हे त्या काळातील सर्वांत मोठे जहाज होते. हे जहाज तब्बल ८८२.७५ फूट लांब, ९२.५ फूट रुंद होते. तर या जहाजाची खोली ५९.६ फूट होती. या जहाजाला एकूण १० डेक होते. जहाजामधील प्रवेश दालनातील जिना हा लोखंडी होता. तसेच सूर्यप्रकाश यावा यासाठी या दालनाचे छत काचेचे होते. या जहाजात स्क्वॅश कोर्ट, टर्कीश बाथ, व्यायामशाळा, केशकर्तनालय, जलतरण तलाव अशा सुविधाही होत्या. या जहाजाची एवढी चर्चा होती की, या जहाजाचा पहिला प्रवास असतानाही लोकांनी प्रमाणापेक्षा जास्त बुकिंग केले होते. इंग्लंडमधील साऊथहॅम्पटन ते अमेरिकेतील न्यूयॉर्क असा, हे जहाज आपला पहिला प्रवास करणार होते.
हेही वाचा >>> विश्लेषण : ‘डब्बा ट्रेडिंग’ म्हणजे काय आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो?
लाइफबोट्स कमी असल्यामुळे १५०० पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू!
अमेरिकेच्या दिशेने जात असताना १४ एप्रिल रोजी हे जहाज समुद्रातील एका मोठ्या हिमनगावर आदळले होते. कॅनडाजवळच्या न्यूफाऊंडलॅण्डजवळ असताना हा अपघात घडला होता. हिमनगाला धडकल्यामुळे या जहाजात पाणी भरायला सुरुवात झाली होती. दुर्दैवाने या जहाजात लाइफबोट्स कमी होत्या. परिणामी या जहाजातील १५०० पेक्षा जास्त प्रवाशांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी १५ एप्रिल ‘टायटॅनिक स्मृती दिवस’ म्हणून पाळला जातो.
अवशेषांचा शोध घेण्यासाठी शोधमोहिमा राबवल्या!
टायटॅनिक जहाज आणि या जहाजाशी संबंधित वस्तू कायमच आकर्षणाचा विषय ठरलेल्या आहेत. याच कारणामुळे या वस्तू फारच मौल्यवान समजल्या जातात. टायटॅनिक दुर्घटनेच्या दोन वर्षांनंतर या जहाजाच्या अवशेषांचा शोध घेण्यात आला. त्यासाठी दुर्घटनास्थळाला अनेक वेळा भेट देण्यात आली. या शोधकार्यादरम्यान जहाजामधील अनेक गोष्टींचा शोध लागला. या सापडलेल्या वस्तूंना वस्तुसंग्रहालयात ठेवले जावे, अशी मागणी ब्रिटनमधील अनेक वस्तुसंग्रहालयांकडून केली जाते. मात्र यातील काही वस्तू लिलावात विकण्यात आलेल्या आहेत.
हेही वाचा >>> विश्लेषण: Same-sex relationship: समलिंगी संकल्पना भारतासाठी नवीन आहे का ?
अनेक मौल्यवान वस्तू लिलावात विकण्यात आल्या…
एकीकडे टायटॅनिक जहाज बुडत असताना दुसरीकडे काही लोक वाद्य वाजवत होते. यामध्ये वापरण्यात आलेले व्हायोलीन २०१३ साली लिलावात विकण्यात आले होते. हे व्हायोलीन तब्बल १.७ दशलक्ष डॉलर्सला विकले गेले. जहाज बुडण्याच्या काही तास अगोदर एक पत्र लिहिण्यात आले होते. हे पत्र २०१७ साली १ लाख ६६ हजार डॉलर्सना विकण्यात आले होते. जहाजातील कर्मचाऱ्याच्या खिशात एक घडी सापडली होती. ही घडी नोव्हेंबर २०२२ मध्ये लिलावात विकण्यात आली. ९८ हजार पौंडला ही घडी विकली गेली.
टायटॅनिक दुर्घटनेवर अनेक पुस्तके!
टायटॅनिकच्या दुर्घटनेचा संदर्भ घेऊन अनेक चित्रपट, पुस्तके, कविता यांची निर्मिती करण्यात आली. टायटॅनिक जहाज दुर्घटनेत डोरोथी गिब्सन बचावले होते. ते नंतर ‘सेव्ह्ड फ्रॉम द टायटॅनिक’ या चित्रपटात झळकले होते. तसेच या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांना श्रद्धांजली म्हणून अनेक गाणी रचण्यात आली. टायटॅनिक जहाजासोबत दुर्घटनेच्या रात्री नेमके काय घडले होते? याचे अनेक पुस्तकांच्या माध्यमातून दस्तावेजीकरण करण्यात आलेले आहे. यामध्ये वॉल्टर लॉर्ड लिखित ‘द कम्प्लिट टायटॅनिक क्रोनिकल: अ नाइट टू रिमेंबर’, ‘द नाइट लाइव्ह्ज ऑन’ (१९९०), चार्ल्स पेलेग्रिनो लिखित ‘फेअरवेल’, टायटॅनिक: हर फायनल लेगसी’ (२०१२), ॲलन वेले लिखित ‘द टायटॅनिक डॉक्युमेंट’ (२०२१), एरिक केंटली लिखित ‘स्टोरी ऑफ द टायटॅनिक’ (२०१२) अशा काही पुस्तकांचा यात समावेश आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण: अर्जुन तेंडुलकरने ‘आयपीएल’मध्ये सचिनसह रचला विक्रम! भारतीय क्रिकेटमध्ये यापूर्वी पिता-पुत्रांच्या कोणत्या जोड्या ठरल्या प्रभावी?
टायटॅनिक दुर्घटनेवर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती
टायटॅनिक दुर्घटनेला केंद्रस्थानी ठेवून आतापर्यंत अनेक चित्रपटांची निर्मिती झालेली आहे. यामध्ये बार्बरा स्टॅनविक आणि क्लिफ्टन वेब यांची मुख्य भूमिका असलेला ‘टायटॅनिक’ (१९५३), ‘अ नाइट टू रिमेंबर’ (१९५८), तसेच १९९७ साली प्रदर्शित झालेला ‘टायटॅनिक’ अशा चित्रपटांचा समावेश आहे. १९९७ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट जेम्स कॅमेरॉन यांनी दिग्दर्शित केला होता. आजतागायत हा चित्रपट तेवढ्याच उत्साहाने पाहिला जातो.