जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश जपान सध्या घटत्या लोकसंख्येचा सामना करीत आहे. घटत्या लोकसंख्येवर उपाय म्हणून जपाकडून अनेक धोरणे राबवली जात आहेत. जपानमध्ये तरुणांची संख्या कमी झाली असून, वृद्ध नागरिकांची संख्या वाढली आहे. जन्मदर वाढवून भविष्यात देशातील तरुणांची संख्या वाढवणे हे जपानचे उद्दिष्ट आहे. त्याचाच एक भाग म्हणून जपानमध्ये महिलांना वेदनारहित प्रसूतीसाठी पैसे दिले जाणार आहेत.

जगातील सर्वांत उदार बालसंगोपन रजा धोरणे असलेल्या जपानने बालसंगोपनासाठी देण्यात येणारा खर्चाचा निधीही वाढविला आहे आणि उत्पन्न मर्यादा वाढवण्यासारखे प्रोत्साहनही देऊ केले आहे. आता जपानची राजधानी बाळाच्या जन्मादरम्यान महिलांसाठी एपिड्युरल अनुदान देऊन आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. याबाबत महिलांसाठी राबविण्यात येणारे धोरण काय आहे? एपिड्युरल म्हणजे काय? ते कसे कार्य करते? त्याविषयी जाणून घेऊ.

Prataprao Jadhav
बुलढाण्यातील ‘केस गळती’ची मोदी सरकारकडून दखल; दिल्ली, चेन्नईतील डॉक्टरांची पथकं येणार, ICMR कडून संशोधन सुरू, केंद्रीय मंत्र्याची माहिती
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Massive fire breaks out in Kurla news in marathi
कुर्ल्यातील उपाहारगृहात भीषण आग
कॉफी प्यायल्याने मृत्यूचा धोका कमी होतो? अभ्यासातून नेमकं काय समोर आलं? (फोटो सौजन्य @freepik)
Coffee Benefits : कॉफी प्यायल्याने मृत्यूचा धोका कमी होतो? अभ्यासातून नेमकं काय समोर आलं?
Maha Kumbhmela 2025
Maha Kumbh Mela 2025: १४४ वर्षांनंतर येणारा महाकुंभमेळा का महत्त्वाचा? कारण काय?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी

एपिड्युरल म्हणजे काय?

अमेरिकन प्रेग्नन्सी असोसिएशनच्या मते, एपिड्युरल एनेस्थेशिया हा एक प्रकारचा प्रादेशिक एनेस्थेशिया आहे. एपिड्युरल एनेस्थेशिया पाठीच्या खालच्या भागातून म्हणजेच कॅन्युला रीडच्या हाडात मज्जातंतूंच्या आवेगांना अवरोधित करतो; ज्यामुळे शरीराच्या खालच्या अर्ध्या भागातील संवेदना कमी होतात. एपिड्युरल हे एनेस्थेशिया आणि काही औषधांचे संयोजन आहे. जपान टाइम्सनुसार, टोकियोने सांगितले आहे की, ते जानेवारी २०२५ च्या आर्थिक वर्षात अनुदान देण्याचा विचार करत आहे. महिलांना हा पर्याय देणारे हे जपानमधील पहिले शहर ठरेल. टोकियोचे अधिकारी म्हणतात की, त्यांना अनुदानाचा प्रस्ताव शक्य तितक्या लवकर आणायचा आहे. पुढील महिन्यात मेट्रोपॉलिटन सरकारच्या विधानसभेत अर्थसंकल्पीय प्रस्ताव सादर केला जाईल, असे ते म्हणाले. टोकियोचे गव्हर्नर युरिको कोइके यांनी गेल्या वर्षी हे अनुदान देणार असल्याचे वचन दिले होते.

अमेरिकन प्रेग्नन्सी असोसिएशनच्या मते, एपिड्युरल अॅनेस्थेशिया हा एक प्रकारचा प्रादेशिक अॅनेस्थेसिया आहे.(छायाचित्र-इंडियन एक्स प्रेस)

हेही वाचा : भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा, काय होऊ शकतात याचे परिणाम? 

जपानच्या या निर्णयामागील कारण काय?

दक्षिण कोरिया आणि चीनप्रमाणे जपानही आपल्या नागरिकांना मुले जन्माला घालण्यासाठी धोरणे राबवीत आहेत. ‘द इंडिपेंडंट’च्या मते, २०२३ मध्ये जपानचा जन्मदर १.२० च्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला. टोकियोमध्ये जन्मदर एकपेक्षा कमी झाला. टोकियोला याचा सर्वांत जास्त फटका बसला. देशाची लोकसंख्या राखण्यासाठी जन्मदर २.१ असणे आवश्यक आहे. विकसित राष्ट्रांपैकी जपानमध्ये एपिड्युरल वापरण्यात येते. तरीही इथे सर्वांत कमी जन्मदर आहे. टोकियो वीकेंडरनुसार, २०२२ मध्ये जपानमध्ये जन्म देणाऱ्या ११.६ टक्के महिलांनी एपिड्युरल वापरले. २०१७ मध्ये ही संख्या ५.२ टक्के होती. २०२० च्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, केवळ ८.६ टक्के महिलांनी एपिड्युरलचा वापर करून मुलांना जन्म दिला, असे वृत्त ‘द इंडिपेंडंट’ने दिले आहे.

टोकियो वीकेंडरनुसार, बऱ्याच महिला एपिड्युरल खरेदी करू शकत नाहीत. एपिड्युरलची किंमत ६३५ डॉलर्स (५४,००० रुपये) ते १२७० डॉलर्स (१,०८,००० रुपये)दरम्यान आहे. जपान सरकार ३,१५९ (रु. २.७१ लाख) प्रसूती भत्ता देते. कोईकेने ६ जानेवारी रोजी ‘असाही शिंबून’ला सांगितले, “जगभरातील परिस्थिती पाहता, वेदनारहित प्रसूती सामान्य आहेत.” टोकियो महानगर सरकारमधील एका महिला अधिकाऱ्याशी बोलल्यानंतर त्यांना ही कल्पना सुचल्याचे त्यांनी सांगितले. ‘जपान टाइम्स’च्या वृत्तानुसार जूनमध्ये कोईके म्हणाले, “मी अनेकांना असे म्हणताना ऐकले आहे की, त्यांना त्यांचे पहिले मूल झाले आहे आणि आता त्यांना पुन्हा तोच त्रास अनुभवायचा नाही. “आपण मातेच्या शरीराचे रक्षण केले पाहिजे आणि त्याचसाठी एक अर्थव्यवस्था आणि समर्थन प्रणाली तयार केली पाहिजे, जिथे महिलांना दुसरे व तिसरे मूल हवे असेल.”

कोईके यांचे धोरण महिलांच्या पुनरुत्पादक अधिकारांच्या दुर्लक्षित मुद्द्यावर प्रकाश टाकते. “कनानागा प्रीफेक्चरमधील एबिना शहर विधानसभा सदस्य कोहसुके नागाई यांनी ‘जपान टाइम्स’ला सांगितले की, अशा कार्यक्रमामुळे देशभरातील लोक टोकियोला स्थलांतरित होऊ शकतात. त्यामुळे शहरावरील दबाव वाढतो. स्त्रीरोगतज्ञ-प्रसूतितज्ज्ञ सॉन्ग मिह्योन यांनी कियोच्या मोठ्या रुग्णालयांद्वारे अॅनेस्थेशिया तज्ज्ञांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे देशभरातील इतर भागांत कमतरता निर्माण झाली. जपानने २०२३ मध्ये नोंदवले होते की, देशाला अॅनेस्थेशिया तज्ज्ञांच्या कमतरतेचा सामना करावा लागला होता; ज्यामुळे बाळांच्या जन्मादरम्यान एपिड्युरलचा कमी वापर झाला.

जन्मदर वाढवण्यासाठी कोणत्या धोरणांचा वापर?

जपानची लोकसंख्या वाढावी यासाठी या देशात विविध धोरणे राबवली जात आहेत. जन्मदर वाढवून, भविष्यात तरुणांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न जपानकडून केला जात आहे. त्यासाठी आता विवाहाकरिता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)चा वापर करून, जोडीदाराचा शोध घेतला जाणार आहे. अनेक युरोपीय देशांप्रमाणे जपाननेदेखील कार्यालयीन कामकाजाचे दिवस कमी करण्याचे ठरवले आहे.

हेही वाचा : डासांच्या निर्मूलनासाठी विषारी वीर्याचा वापर; त्यामुळे जीवघेण्या आजारांचा प्रसार कमी कसा होणार?

त्याप्रमाणे इतर अनेक धोरणे जपान राबवत आहे. त्यापैकीच एक आहे एपिड्युरल अनुदान. एपिड्युरल देणे स्त्रीच्या गर्भाशयाच्या मुखाच्या उघडण्यावर अवलंबून असते. प्रसूतीदरम्यान गर्भाशय चार ते पाच सेंटिमीटरपर्यंत पसरल्यानंतर एपिड्युरल दिले जाते. त्यामुळे वेदनारहित प्रसूती होत असली तरी ते सर्वांना परवडणारे नाही आणि अद्याप सर्व देशांत ते उपलब्धही नाही.

Story img Loader