२०२५ मध्ये ब्रिटन आणि युरोपियन युनियन देशांमधील प्रवासाचे नियम बदलणार आहेत. ब्रिटन आणि युरोपियन युनियन राष्ट्रांमध्ये शिक्षणासह नोकरी आणि पर्यटनासाठी मोठ्या संख्येने लोक जातात. परंतु, आता येणाऱ्या वर्षात परदेशी नागरिकांना काही आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. कारण प्रवासाच्या नियमांत मोठे बदल होणार आहेत. तर काही नियम असेही आहेत; ज्यामुळे प्रवाशांना शिथिलता मिळणार आहे. या सर्वांचा परिणाम भारतीय नागरिकांवरदेखील होणार आहे. नेमके प्रवास नियमांत काय बदल होणार आहेत? त्याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ब्रिटनमधील बदलणारे नियम

‘TheTravel.com’च्या मते, ८ जानेवारीपासून ब्रिटनमध्ये प्रवेश करण्यासाठी बिगर-युरोपियन प्रवाशांना इलेक्ट्रॉनिक प्रवास अधिकृतता (ईटीए)साठी अर्ज करावा लागेल. त्यामध्ये अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांचा समावेश आहे. ईटीए योजना पूर्वी फक्त सात पश्चिम आशियाई देशांतील नागरिकांना लागू होती. हे सर्व राष्ट्रीयत्व व्यक्तींना लागू आहे, ज्यांना लहान मुक्कामासाठी व्हिसा आवश्यक नाही. प्रवाशांना ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल आणि १२.७५ डॉलर्स (१०८१ रुपये) भरावे लागतील. वेबसाइटनुसार ईटीए काही तासांत मंजूर केला जाईल. परंतु, काही घटनांमध्ये यास तीन दिवसही लागू शकतात. सहा महिन्यांपर्यंतच्या भेटींसाठीदेखील ईटीए लागू असेल. ईटीए व्यक्तीचा पासपोर्ट कालबाह्य होईपर्यंत वैध असेल. एप्रिलपासून युरोपियन यूनियन राष्ट्रांतील नागरिकांनादेखील ब्रिटनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांचा ईटीए मंजूर करणे आवश्यक आहे. ‘बीबीसी’ने गृह कार्यालयाची माहिती देताना म्हटले की, लोक त्यांचे मूळ राष्ट्र सोडण्यापूर्वी ब्रिटनमध्ये येण्यास पात्र आहेत की नाही हे तपासणे आणि अशा प्रकारे एक अधिक कार्यक्षम प्रणाली तयार करणे हे यामागील उद्दिष्ट आहे.

हेही वाचा : एलियन की शत्रू राष्ट्रांचा धोका? रहस्यमयी ड्रोन्समुळे अमेरिकेत खळबळ; नेमकं प्रकरण काय?

तुमच्या पासपोर्टच्या डिजिटल लिंकद्वारे तुम्ही विमानातून यूकेला जाण्यापूर्वी तुमची ईटीए स्थिती पाहिली जाईल. त्यामुळे देशात प्रवेश करण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल. प्रवाशांची माहिती गोळा केली गेल्याने सुरक्षा अधिक कडक होण्यास मदत होईल, असेही गृह कार्यालयाचे म्हणणे आहे. “ईटीएचा हा विस्तार डिजिटल युगासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे,” असे ब्रिटनचे स्थलांतर आणि नागरिकत्व मंत्री सीमा मल्होत्रा यांनी ‘आउटलेट’ला सांगितले.

८ जानेवारीपासून ब्रिटनमध्ये प्रवेश करण्यासाठी बिगर-युरोपियन प्रवाशांना इलेक्ट्रॉनिक प्रवास अधिकृतता (ईटीए)साठी अर्ज करावा लागेल. (छायाचित्र-रॉयटर्स)

युरोपियन युनियनमधील बदलणारे नियम

परदेशींना देशात प्रवेशासंबंधित नियम बदलणारे ब्रिटन हे एकमेव राष्ट्र नाही. २ एप्रिलपासून युरोपियन युनियनदेखील असाच एक कार्यक्रम आणणार आहे. हा कार्यक्रम ब्रिटन, अमेरिका, कॅनडा व ऑस्ट्रेलियासह ६० देशांतील व्हिसामुक्त प्रवाशांसाठी लागू केला जाईल आणि युरोपियन युनियनच्या ३० सदस्य राष्ट्रांना तो लागू होईल. युरोपियन ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन अॅण्ड ऑथोरायझेशन सिस्टीम (ईटीआयएएस) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रणालीसाठी प्रवाशांना ऑनलाइन अर्जही करावा लागणार आहे. त्यासाठी प्रवाशांना ७.४० डॉलर्स (६२७ रुपये) खर्च येईल. अर्ज मंजूर होण्यासाठी चार दिवस लागतील. मँचेस्टर न्यूजनुसार, युरोपियन युनियनमध्ये २०२५ मध्ये एक वेगळी एंट्री/एक्झिट स्कीम (ईईएस)देखील आणली जाईल. ही स्वयंचलित आयटी प्रणाली बिगर-युरोपियन नागरिकांसाठी असेल. ही प्रणाली ईईएस प्रवाशांकडून त्यांचे वैयक्तिक तपशील, त्यांनी युरोपियन युनियनमध्ये कुठे आणि केव्हा प्रवेश केला आणि ते बाहेर पडले, तसेच चेहऱ्याचे छायाचित्र आणि बोटांच्या ठशांसह बायोमेट्रिक डेटादेखील संकलित करील.

युरोपियन युनियनने हा कार्यक्रम लाँच करण्याची तारीख दिलेली नाही; परंतु असे म्हटले आहे की ईईएस प्रणाली टप्प्याटप्प्याने आणले जाईल. ट्रॅव्हल वीकलीनुसार, “सहा महिन्यांच्या कालावधीत ईईएसच्या कामकाजाची प्रगतिशील सुरुवात,” असा अंदाज ‘ईसी’ने डिसेंबरमध्ये व्यक्त केला. “सीमा अधिकारी सीमा ओलांडणाऱ्या तृतीय-देशाच्या नागरिकांचा डेटा सिस्टीममध्ये नोंदणी करतील,” असेही ते म्हणाले. “या कालावधीत, प्रवाशांचा डेटा केवळ ईईएस कार्यरत असलेल्या सीमांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रेकॉर्ड केला जाईल. समांतर, सर्व सीमांवर पासपोर्टवर शिक्का मारला जाईल. परंतु, प्रत्येक जण या बदलांवर समाधानी नाही,” असेही ते म्हणाले. “मला प्रवासाच्या बदलाबद्दल दु:ख आणि चिंताही आहे,” असे एक प्रवासी किटा जीन यांनी ‘बीबीसी’ला सांगितले.

२ एप्रिलपासून युरोपियन युनियनदेखील असाच एक कार्यक्रम आणणार आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

शेंजेन झोनमध्येही बदल

१ जानेवारी २०२५ पासून शेंजेन झोनमध्येही बदल होणार आहेत. शेंगेन झोन हे सीमा नसलेले क्षेत्र आहे. त्यामध्ये २९ शेंजेन देशांचा समावेश आहे. या क्षेत्रामध्ये सर्व युरोपियन युनियनमधील नागरिक आणि युरोपियन युनियनबाहेरील अनेक व्हिसामुक्त नागरिक सीमा नियंत्रणाशिवाय मुक्तपणे प्रवास करू शकतात. १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बल्गेरिया आणि रोमानिया शेंजेन झोनचे पूर्ण सदस्य होणार आहेत. बऱ्याच वर्षांच्या वाटाघाटीनंतर मार्चमध्ये बल्गेरिया आणि रोमानिया शेंजेन क्षेत्रात सामील झाले. दोन्ही देशांमध्ये हवाई किंवा समुद्राने येणाऱ्या प्रवाशांना विनामूल्य प्रवेश प्रदान करण्यात आला.

हेही वाचा : गहू आणि खाद्यतेलाचे दर आणखी वाढणार? कारण काय? सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

आता युरोपियन युनियनने पुढील वर्षापासून दोन्ही देशांवरील जमिनीवरील सीमा नियंत्रण हटवले आहे. १९८५ मध्ये तयार करण्यात आलेल्या शेंजेन झोनमध्ये २९ सदस्य आहेत. अंतर्गत सीमा नियंत्रणाशिवाय हे जगातील सर्वांत मोठे क्षेत्र आहे, जेथे ४०० दशलक्षांहून अधिक लोक झोनमध्ये मुक्तपणे प्रवास करू शकतात. २००७ पासून युरोपियन युनियनचे हे दोन्ही सदस्य देश मार्चमध्ये समाकलित केले गेले. त्या देशांतील नागरिकांनी या क्षेत्रात सीमा तपासणीशिवाय हवाई आणि समुद्रमार्गे प्रवास सुरू केला. मात्र, जमीन मार्गावरील नियंत्रणे अजूनही लागू आहेत. व्हिएन्नाने सोमवारी जाहीर केले की, ते युरोपियन युनियन मंत्र्यांच्या गुरुवारच्या बैठकीत आपला व्हेटो वापरणार नाहीत; ज्यामुळे १ जानेवारी २०२५ पासून दोघांना पूर्ण सदस्य होण्याचा मार्ग मोकळा झाला.