साधारण १९९५ नंतर जन्मलेल्या पिढीला ‘जनरेशन झेड’ किंवा ‘जेन-झी’ असे संबोधतात. तंत्रज्ञानस्नेही असलेल्या या पिढीतील अनेक जण व्यावसायिकदृष्ट्या बंधनमुक्ततेला प्राधान्य देतात. आता या पिढीतील अनेकांनी ‘करिअर कॅटफिशिंग’ हा नवा ट्रेंड सुरू केला आहे. नव्या नोकरीचे प्रस्तावपत्र स्वीकारतात, मात्र आपल्या नियोक्त्याला न कळवता कामाच्या पहिल्याच दिवशी दांडी मारतात. कंपन्यांच्या भरती धोरणांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी कार्यसंस्कृतीला प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी ते ‘करिअर कॅटफिशिंग’द्वारे निषेध करत आहेत… करिअर कॅटफिशिंग म्हणजे नेमके काय, नवी पिढी त्याचा अवलंब का करत आहेत, याविषयी…

‘जनरल झेड’ म्हणजे काय? 

सर्वसाधारणमध्ये १९६० ते १९८० मध्ये जन्मलेल्या पिढीला ‘जनरेशन एक्स’, १९८० ते १९९५ या कालखंडात जन्मलेल्या पिढीला ‘जनरेशन वाय’ आणि १९९५ ते २०१० या कालखंडात जन्मलेल्या पिढीला ‘जनरेशन झेड’ असे संबोधले जाते. प्रत्येक पिढीमध्ये व्यावसायिक, तांत्रिक, सांस्कृतिक, आर्थिक सामाजिक बदल होत गेले, त्यामुळे या पिढ्यांना अशा प्रकारे नावे देण्यात आली. जनरेशन झेड ही पिढी तंत्रज्ञानाच्या बाबतीत अधिक सजग आहे. १९९० च्या दशकात झालेल्या वेब क्रांतीमुळे ही पिढी अधिक तंत्रस्नेही झाली. त्यामुळे समाजमाध्यमे, इंटरनेट आणि स्मार्टफोन त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले. नवे तंत्रज्ञान सहज आत्मसात करण्याची कला या पिढीमध्ये आहे. सर्वसाधारणपणे व्यवसाय निवडताना पगारापेक्षा इतर गोष्टींना अधिक प्राधान्य ही पिढी देते. म्हणजे त्यांच्या आवडी-निवडी जपण्याचे स्वातंत्र्य, कंपनी संस्कृती, काम करण्याची विविधता, काम करण्याची साधने, लवचीकता यांबाबत सजग असलेली ही पिढी आहे. अधिक मोकळ्या मनाची असलेली ही पिढी त्यांच्या वरिष्ठांकडे नाही तर त्यांच्या व्यवस्थापनाकडे एक व्यक्ती म्हणून पाहते. पूर्वीच्या पिढ्यांसाठी फक्त संगीत, चित्रपट किंवा खाद्यपदार्थ यांच्यापुरतेच जागतिक ट्रेंड फॉलो केले जायचे. जनरेशन झेड मात्र सामाजिक जाणिवा, भाषा, फॅशन या बाबतीतदेखील जागतिक आहे. करिअरच्या बाबतीत ही मंडळी रुळलेल्या पर्यायांपेक्षा वेगळी वाट चोखाळताना दिसतात. 

Chandrapur District Bank recruitment case interviews due to fear of administrator appointment
प्रशासक नियुक्तीच्या भीतीपोटी युद्धपातळीवर मुलाखती, चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरती प्रकरण
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Article about obcs dominate government job recruitment
लोकजागर : ओबीसींची ‘सर्वोच्च’ अडवणूक!
Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
shantanu deshpande bharat shaving company
“…तर ९९ टक्के भारतीय कामावर येणारच नाहीत”, नामांकित कंपनीच्या CEO चं विधान चर्चेत, नेटिझन्समध्ये संमिश्र प्रतिक्रिया!
advertisement boards indicators Dombivli railway station local train passengers
डोंबिवली रेल्वे स्थानकात जाहिरात फलकांमुळे इंडिकेटर दिसत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी
infosys salary
नारायण मूर्ती यांच्या ‘Infosys’ने पुढे ढकलला पगारवाढीचा निर्णय; कारण काय? आयटी कंपन्यांची स्थिती काय?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?

हेही वाचा – चंद्राचा समावेश धोक्यातल्या वारसास्थळांच्या यादीत? काय झालंय नेमकं?

‘करिअर कॅटफिशिंग’ म्हणजे काय? 

जनरेशन झेडने आता कामाच्या ठिकाणी नवीन ट्रेंड सुरू केला आहे… करिअर कॅटफिशिंग. म्हणजे या पिढीतील बहुतेक जण कंपन्यांचे नोकरीचे प्रस्ताव स्वीकारतात. मात्र त्यांच्या नियोक्त्यांना सूचित केल्याशिवाय पहिल्याच दिवशी ते कामावर रुजू होत नाही. ही घटना कामाच्या ठिकाणच्या ‘पॉवर डायनॅमिक्स’मध्ये बदल अधोरेखित करते. जनरल झेड वागणुकीस मुभा मान्य करत असल्याने ‘करिअर कॅटफिशिंग’कडे त्यांचा कल अधिक दिसून येत आहे. कामाच्या ठिकाणी असमाधानकारक वातावरण, खराब नोकरीचे वर्णन किंवा पारदर्शक नसलेल्या नियुक्ती पद्धतींविरोधात मूक निषेध म्हणून ‘करिअर कॅटफिशिंग’चा वापर केला जात आहे. पारंपरिक अपेक्षा नाकारून, जनरेशन झेड कंपन्यांना भरती धोरणांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी संस्कृतीला प्राधान्य देण्यास प्रवृत्त करत आहे. करिअर कॅटफिशिंगमुळे कॉर्पोरेट संस्कृती आणि कामाच्या ठिकाणी नैतिकता यावर वादविवाद सुरू झाले आहेत.

‘सीव्ही जिनियस’चा अहवाल काय सांगतो?

‘सीव्ही जिनियस’ या ऑनलाइन रेझ्युमे प्लॅटफॉर्मच्या अहवालानुसार, २७ वर्षांखालील अनेक तरुण कर्मचारी करिअर कॅटफिशिंगचा अवलंब करत आहेत. त्यांच्या अवहेलनाची वाढती कृती या अहवालात अधोरेखित करण्यात आली आहे. ३४ टक्के जनरेशन झेड कर्मचाऱ्यांनी करिअर कॅटफिशिंगचा अवलंब केल्याचे मान्य केले आहे. स्वातंत्र्याचे प्रतिपादन म्हणून ही कृती केल्याचे ते सांगतात. लांबलचक अर्ज, एकाधिक मुलाखती, नियुक्त व्यवस्थापकांकडून विलंबित प्रतिसाद तसेच संपूर्ण नियुक्ती प्रक्रियेमुळे उद्भवलेल्या निराशेला प्रतिसाद म्हणून करिअर कॅटफिशिंगचा अवलंब केल्याचे ते सांगतात. ब्रिटनमधील या संस्थेने विविध वयोगटांतील १००० तरुणांचे सर्वेक्षण केले. त्यापैकी बहुतेक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नियोक्त्यांना सूचित न करता पहिल्याच दिवशी कामावर जाणे टाळले. हे वर्तन नोकरीच्या शोधाच्या निराशेला प्रतिसाद म्हणून केल्याचे हे तरुण सांगतात. करिअर कॅटफिशिंगद्वारे कंपनी व्यवस्थापकांची डायनॅमिक शक्ती बदलण्याचे ध्येय असल्याचे जनरेशन झेड कर्मचारी सांगतात. 

कॅटफिशिंगला इतर वयोगटांचाही प्रतिसाद?

मोकळीक, स्वतंत्रता, वागणुकीस मुभा, बंधनमुक्तता, कोणाचा वरचष्मा-दबाव नाही, काय वाटेल ते करायला मुखत्यार अशा प्रकारचे गुण असलेले जनरेशन झेड कर्मचारीच नव्हे तर इतर वयोगटांतील अनेक कर्मचारीही काही प्रमाणात करिअर कॅटफिशिंगचा अवलंब करत आहेत. ‘सीव्ही जिनियस’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार ३४ टक्के जनरेशन झेड कर्मचारी करिअर कॅटफिशिंगचा वापर करत आहेत. त्यांच्यासाठी हा मार्ग नवीन नाही. पण २८ ते ४३ वयोगटातील मिलेनियल्सही त्यात सहभागी होत आहेत. या वयोगटातील २४ टक्के कर्मचाऱ्यांनी या मार्गाचा अवलंब केला. ११ टक्के जनरेशन एक्स कर्मचारी (४४ ते ५९ वर्षे वयोगट) आणि सात टक्के बेबी बूमर (६० आणि त्याहून अधिक वयाचे) यांनी ही युक्ती स्वीकारली आहे.

हेही वाचा – गोव्याकडे पर्यटकांची पाठ? गोवा सरकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्समधील वादाचे कारण काय?

‘जनरेशन झेड’ची मानसिकता काय दर्शविते?

जनरेशन झेड कर्मचाऱ्यांचे वर्तन हे एका व्यापक पिढीची मानसिकता दर्शविते, जी पारंपरिक कॉर्पोरेट अपेक्षांपेक्षा वैयक्तिक उद्दिष्टे आणि कल्याण यांना प्राधान्य देते. कॉर्पोरेट जीवनातील पारंपरिक मागण्यांपेक्षा स्वत:च्या उद्दिष्टांना प्राधान्य देण्याची त्यांची मानसिकता असते. करिअर कॅटफिशिंगसह शांतपणे नोकरी सोडणे, वारंवार रजा घेणे, कामाच्या ठिकाणी किमान आवश्यक काम करणे आणि कॉफी बॅजिंग या नव्या प्रकारांचाही वापर कर्मचारी करतात. कॉफी बॅजिंग या प्रकारात केवळ काही तासांसाठी कर्मचारी कामावर येतात. कॉपी पिण्याचा बहाणा करून कार्यालयात काही वेळ घालवतात आणि मग निघून जातात. 

परिणाम काय होऊ शकतात?

सरतेशेवटी, करिअर कॅटफिशिंगचा उदय हा नियुक्तीच्या पद्धतींमधील पद्धतशीर समस्यांवर प्रकाश टाकतो. नियोक्ता आणि उमेदवार यांच्यातील स्पष्ट संवाद, वेळेवर अभिप्राय आणि परस्परआदर हे मतभेद दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. दोन्ही बाजूंनी अधिक पारदर्शक आणि व्यावसायिक परस्परसंवादासाठी काम करणे आवश्यक आहे, जेणेकरून निरोगी कार्यस्थळाची संस्कृती वाढेल. करिअर कॅटफिशिंगमुळे कार्यालयीन कामे, कार्यसंस्कृती यांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. कामावर ठेवणारे व्यवस्थापक बऱ्याचदा जनरेशन झेडबरोबर काम करणे आव्हानात्मक म्हणून पाहतात. जनरेशन झेडला कामाबाबत प्रेम, हक्कांची जाणीव आणि प्रेरणा नसणे आदी तक्रारी कामावर ठेवणारे व्यवस्थापक बऱ्याचदा करतात. या नकारात्मक धारणांमुळे तरुण कर्मचाऱ्यांना भविष्यातील नियोक्त्यांबरोबर विश्वास प्रस्थापित करणे कठीण होऊ शकते. करिअर कॅटफिशिंग कामगार प्राधान्ये आणि नियोक्ता धोरणे यांच्यातील विसंगती दर्शविते आणि कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. याचे निराकरण करण्यासाठी नियोक्त्यांनी लवचीकता स्वीकारली पाहिजे, संवादाला प्राधान्य द्यावे आणि उपस्थितीपेक्षा परिणामांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. 

sandeep.nalawade@expressindia.com

Story img Loader