आरबीआयने २००० च्या नोटा बाजारातून मागे घेऊन या नोटा सदोष असल्याचेच एक प्रकारे दाखवून दिले आहे. तसेच बाजारात या नोटांचे अस्तित्व शून्य होते, हेदेखील सिद्ध झाले आहे. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा २००० च्या नोटेबद्दलचा निर्णय संभ्रमात टाकणारा आहे. एका बाजूला ते म्हणतात, २००० ची नोट यापुढेही लीगल टेंडर असेल आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी नोटेची वैधता कोणत्या तारखेपर्यंत असेल? हे जाहीर केलेले नाही. मात्र, २००० च्या नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबरची अंतिम मुदत दिली आहे.

१ ऑक्टोबरनंतर नोटांचे काय होणार?

जर आरबीआय ३० सप्टेंबरनंतर स्वतःच २००० च्या नोटा बदलून देणार नसेल. तर मग १ ऑक्टोबरपासून या नोटा लीगल टेंडर राहणार आहेत का? त्यानंतर या नोटा वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी वापरल्या जाणार का? लोक या नोटा स्वीकारतील का? जर यापैकी काही होणार नसेल तर मग नोटा बदलून देण्यासाठीची ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत कशासाठी दिली?

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana
Aditi Tatkare : लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेल्या महिलांना पैसे कधी मिळणार? आदिती तटकरे म्हणाल्या…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
mahada house prices increased instead of decreasing
म्हाडा घरांच्या किमतीत वाढ, अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ऐनवेळी किंमतीत बदल करण्याची वेळ
share trading app investment fraud
पिंपरी: शेअर ट्रेडिंग अ‍ॅपमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा घालणारी टोळी अटकेत; चार कोटींचे व्यवहार
mhada redevelopment project house cheaper
म्हाडाची घरे आता स्वस्त; वरळी, ताडदेवमधील घरांच्या किमतीत कपात
Badlapur school, child abuse case, badlapur child abuse case, badlapur school reopening, pre primary section, student safety,
बदलापूर : ‘ती’ शाळा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न; पालकांशी संवाद सुरू, प्रशासकांच्या हालचाली
ministers given permission till august 30 for transfers within department ahead of poll
सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी मंत्र्यांना ‘मोकळे रान’; बदल्यांसाठी ३० ऑगस्टपर्यंत मुभा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
icra predict growth rate to slow to 6 percent in the first quarter in
पहिल्या तिमाहीत विकास दराच्या ६ टक्क्यांच्या नीचांकांचा ‘इक्रा’चा अंदाज

२००० च्या नोटेबद्दलचा सावळागोंधळ आजचा नाही. जेव्हा ही नोट बाजारात आणली तेव्हापासून याबद्दल काही ना काही वाद झालेले आहेत. २०१६ पासून काय काय घडले? याचा घेतलेला हा आढावा.

हे वाचा >> विश्लेषण : दोन हजाराची नोट चलनातून बाद; आता पुढे काय?

१) २०१६ साली जेव्हा २००० ची नोट बाजारात आणली तेव्हाच याबद्दलची विसंगती समोर आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री टीव्हीवरून भाषण करीत अचानक ५०० आणि १००० च्या नोटा रात्री १२ नंतर चलनातून बाद होणार असल्याचे सांगितले. ५०० आणि १००० च्या मोठ्या नोटांची साठवणूक होत आहे. तसेच या नोटा दहशतवादी कारवाईसाठी वापरल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. जर मोठ्या नोटांमुळे काळा पैसा जमा करणे सोपे होते, तर मग २००० ची नोट आणून काय साध्य झाले होते, असा प्रश्न आपसूकच विचारला जाऊ लागला. तसेच काळ्या पैशांबाबत बोलायचे झाल्यास, आरबीआयने स्वतः मान्य केले की, काळा पैसा असलाच तर तो सोने, प्रॉपर्टीच्या स्वरूपात आहे, नोटांच्या स्वरूपात नाही.

२) २००० ची नोट आणल्यानंतरही गोंधळ थांबला नव्हता. या नोटेला प्रथम आरबीआय कायद्याच्या कलम २४ (२) मध्ये अंतर्भूत करण्यात आले होते. त्यानंतर आरबीआयला कळले की, हे कलम या नोटेसाठी चुकीचे आहे. त्यानंतर पुन्हा सुधारित आदेश काढून आरबीआयने कलम २४ (१) मध्ये २००० च्या नोटेचा समावेश केला. हे कलम केंद्र सरकारला बँकनोट जारी करण्याची परवानगी देते.

नोट बाजारात आणल्यानंतर कळले की, विद्यमान एटीएम मशीनमध्ये या नोटा बसत नाहीत. कारण एटीएम मशीनची रचना या जुन्या ५०० आणि १००० च्या नोटेसाठी होती. मग २००० च्या नोटेसाठी एटीएम मशीन अनुकूल करण्यात आल्या. देशभरातील एटीएम मशीन नव्या नोटेच्या आकाराला सामावून घेण्यासाठी दुरुस्त करण्यात आल्या. यामध्ये खूप वेळ गेला. त्यामुळे लोकांना नव्या नोटा मिळवण्यासाठी बँकेवर अवलंबून राहावे लागले. नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१६ या काळात बँकांच्या बाहेर मोठ्याच मोठ्या रांगा दिसल्या.

हे ही वाचा >> “एम फॉर मॅडनेस…”, दोन हजारांची नोट बाद केल्यानंतर विरोधकांची टीका; केजरीवाल म्हणाले, “अडाणी पंतप्रधान…”

३) २००० च्या नोटांमध्ये अपेक्षित सुरक्षा सुधारणा केलेल्या नव्हत्या. त्यामुळे या नोटांची नक्कल करणे अतिशय सोपे होते. २६ नोव्हेंबर २०१६ रोजी मोठ्या प्रमाणात २००० च्या बनावट नोटा आढळून आल्या होत्या. जुन्या ५०० आणि १००० च्या नोटांची नक्कल होऊन बनावट नोटांचे प्रमाण वाढले असल्याचे सांगून ८ नोव्हेंबर रोजी त्या नोटांचे निश्चलनीकरण करण्यात आले होते, हे विशेष.

४) सरतेशेवटी, २००० च्या नोटा या पैशाचा जो मूलभूत उद्देश आहे, त्यापासूनच वंचित राहिल्या. पैशाची तीन मूलभूत तत्त्वे आहेत. एक म्हणजे पैसे साठवून ठेवला तरी त्याची किंमत कमी होता कामा नये. म्हणजे शंभर रुपयांचे मूल्य हे कधीही शंभर रुपयेच राहते. तुम्ही शंभर रुपयांची भाजी घेतली तर ती दुसऱ्या दिवशी शंभर रुपयांची राहत नाही. शंभर रुपयांची दुसरी कोणतीही वस्तू असेल तर त्याची किंमत हळूहळू कमी होत जाते. मात्र पैशाची किंमत तेवढीच राहते. दुसरे म्हणजे युनिट ऑफ अकाऊंट. जर तुम्हाला लॅपटॉप विकत घ्यायचा असेल तर २००० च्या नोटांच्या स्वरूपात तुम्ही
लॅपटॉपचे पैसे देऊ शकता. पण तुम्ही २००० ची नोट वापरून भाजी घेऊ शकत नाही.

तिसरे म्हणजे, नोटा या वस्तूंच्या देवाणघेवाणीचे माध्यम आहेत. शंभर रुपयांची नोट देऊन आपण तेवढ्या किमतीचे पेन विकत घेऊ शकतो. मात्र २००० च्या नोटेबाबत हे तिसरे तत्त्व लागू होत नव्हते. जेव्हा नोट बाजारात आणली गेली तेव्हा, सुट्टे पैसे होण्याकरिता लोकांना बरीच मेहनत घ्यावी लागली. छोट्या खरेदीसाठी एवढी मोठी नोट कुणीही स्वीकारत नव्हते. तसेच २००० रुपयांच्या मूल्याचे पेन विकत घेणे, कुणाला शक्य नाही. त्यामुळे बाजारात २००० च्या नोटा होत्या, मात्र त्या कुणीही वापरत नव्हते किंवा त्याची देवाणघेवाण करीत नव्हते. छोट्या व्यवहारांसाठी २००० ची नोट वापरणे कठीण झाले होते.

आणखी वाचा >> VIDEO: २ हजार रुपयांची नोट वितरणातून काढल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मी…”

तसेच आरबीआयने सांगितले आहे की, २००० च्या नोटा बदलून घेण्यासाठी वीस हजार रुपयांची मर्यादा आखण्यात आली आहे. याचा अर्थ एखाद्या कुटुंबाने लग्नकार्य किंवा इतर कारणासाठी दोन लाख रुपये २००० च्या स्वरूपात जमवले असतील तर त्यांना बँकेच्या दहा वेळा चकरा माराव्या लागणार आहेत. कारण बँक एका वेळेस फक्त २० हजार रुपयेच बदलून देणार आहे.

नोटबंदीचा निर्णय हा मास्टरस्ट्रोक असल्याचे भारतीय जनतेच्या मनावर बिंबवले आहे, त्यामुळे आता सरकार पुन्हा एकदा भारतीयांनी रांगेत उभे राहावे अशी अपेक्षा करीत आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.