अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. सोमवारी (७ नोव्हेंबर) त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचार व्यवस्थापक सूसी विल्स यांना व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्त केले. एका निवेदनात ट्रम्प म्हणाले की, विल्स यांनी मला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठा राजकीय विजय मिळवण्यात मदत केली. त्या अतिशय हुशार आहेत. त्यांचा आपल्या देशाला अभिमान वाटेल यात शंका नाही. कोण आहेत सूसी विल्स? ‘चीफ ऑफ स्टाफ’ पदावरील व्यक्तीला कोणते अधिकार मिळतात? या पदाचे महत्त्व काय? त्याविषयी जाणून घेऊ.

‘चीफ ऑफ स्टाफ’ पद कधी आणि का निर्माण करण्यात आले?

१९४० च्या मध्यापर्यंत यूएस फेडरल सरकारकडे व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ हे पद नव्हते. कार्यकारी शाखेच्या भूमिकेचा विस्तार झाल्यानंतर या पदाची गरज भासू लागली. फ्रँकलिन डी रुझवेल्ट प्रशासनाच्या अंतर्गत महामंदी (१९२९-१९३९) आणि दुसरे महायुद्ध (१९३९-१९४५) ची परिस्थिती हाताळण्यासाठी कार्यकारी शाखेची पुनर्रचना करण्यात आली. या दोन घटनांदरम्यानच हे पद तयार करण्यात आले. राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनी १९३९ मध्ये प्रेसिडेन्सीचे कार्यकारी कार्यालय (ईओपी) तयार केले; ज्यामुळे त्यांना वाढलेला कार्यभार आणि धोरणनिर्मितीची प्रक्रिया व्यवस्थापित करण्यात मदत झाली. मात्र, तेव्हा त्यांनी कामकाज चालवण्यासाठी मुख्य अधिकारी नेमला नाही. त्याऐवजी ते त्यांचे वेळापत्रक व्यवस्थापित करण्यासाठी त्यांनी नियुक्त केलेल्या सचिव एडविन पा वॉटसन यांच्यावर अवलंबून होते.

women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Donald Trumps legal cases
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गुन्हेगारी खटल्यांचे काय होणार? त्यांची निर्दोष मुक्तता होणार?
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
donald trump latest marathi news
विश्लेषण: अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची अनपेक्षित मुसंडी कशी?
चीफ ऑफ स्टाफ हे पद अमेरिकन सरकारमधील सर्वांत शक्तिशाली पदांपैकी एक आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : साडी नेसणार्‍या महिलांना ‘पेटिकोट कॅन्सर’चा धोका? हा प्रकार काय आहे? अभ्यास काय सांगतो?

राष्ट्राध्यक्ष रुझवेल्टचे उत्तराधिकारी हॅरी ट्रुमन यांनी व्हाईट हाऊसच्या ‘चीफ ऑफ स्टाफ’चे पद तयार केले. त्यावेळी ते राष्ट्राध्यक्षांचे सहायक म्हणून ओळखले जात होते. १९४६ मध्ये ते ईओपीचे प्रमुख म्हणून ओळखले जाऊ लागले. अध्यक्ष ट्रुमन यांनी अनुभव असलेले, कामगार समस्यांसाठी ओळखले जाणारे माजी प्राध्यापक जॉन स्टीलमन यांची ईओपीच्या प्रमुख पदावर नियुक्ती केली. मात्र, ‘चीफ ऑफ स्टाफ’ म्हणून पहिला मान न्यू हॅम्पशायरचे माजी गव्हर्नर शर्मन ॲडम्स यांना मिळाला. त्यांची निवड अध्यक्ष ड्वाइट डी आयझेनहॉवर यांनी १९५३ साली केली होती. १९४६ पासून व्हाईट हाऊसमध्ये आतापर्यंत ३१ जणांना चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. परंतु, आजवर या पदावर केवळ पुरुषांना नियुक्त करण्यात आले होते. मात्र, पहिल्यांदाच ३२ व्या चीफ ऑफ स्टाफ या पदावर महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘चीफ ऑफ स्टाफ’ची भूमिका काय?

चीफ ऑफ स्टाफ हे पद अमेरिकन सरकारमधील सर्वांत शक्तिशाली पदांपैकी एक आहे. प्रत्येक प्रशासनात त्यांची कर्तव्ये मोठ्या प्रमाणात बदलत असतात. मात्र, ‘चीफ ऑफ स्टाफ’च्या पाच महत्त्वाच्या कार्यांमध्ये समाविष्ट असलेल्या बाबी खालीलप्रमाणे :

व्हाईट हाऊस स्टाफचे व्यवस्थापन करणे : चीफ ऑफ स्टाफ ‘ईओपी’चे प्रमुख असतात. ‘ईओपी’मध्ये निवासी कर्मचारी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आदींचा समावेश असतो. चीफ ऑफ स्टाफदेखील अध्यक्षांच्या सल्लागारांचा प्रभारी असतो; जसे की संप्रेषण संचालक, राजकीय संचालक आणि इतर वरिष्ठ सल्लागार.

राष्ट्राध्यक्षांचे धोरण परिभाषित करणे : ‘चीफ ऑफ स्टाफ’च्या कार्यांत प्रत्येक गोष्टीबाबत व्हाईट हाऊसची रणनीती निश्चित करणेदेखील समाविष्ट असते. कायदेमंडळाच्या धोरणांपासून ते प्रशासनाच्या परराष्ट्र धोरणापर्यंतच्या बाबी हाताळण्याची जबाबदारी या पदावर कार्यरत व्यक्तिकडे असते.

राष्ट्रपतींचे व्हिजन अमलात आणणे : एकदा अध्यक्षांनी त्यांच्या कृतीचा निर्णय घेतला की, व्हाईट हाऊसचे कर्मचारी, मंत्रिमंडळ (१५ कार्यकारी विभागांच्या प्रमुखांचा समावेश) आणि अनेक स्वतंत्र यंत्रणा अध्यक्षांच्या सूचनांचे पालन करीत आहे की नाही, याचा पाठपुरावा ‘चीफ ऑफ स्टाफ’ला करावा लागतो.

सूसी विल्स या एनएफएल खेळाडू आणि स्पोर्ट्स कास्टर पॅट समरॉल यांच्या कन्या आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

अध्यक्षांच्या भेटीगाठी ठरवणे : अध्यक्षांपर्यंत कोण पोहोचू शकते, यावर ‘चीफ ऑफ स्टाफ’ नियंत्रण ठेवतात. याचा अर्थ असा नाही की, अध्यक्षांना कोणाला भेटायचे यावर त्यांचे नियंत्रण असते. अध्यक्षांनी वैयक्तिकरीत्या कोणते निर्णय घेणे आवश्यक आहे, कोणते निर्णय अधीनस्थांकडे सोपवले जाऊ शकतात, अध्यक्षांना प्रमुख प्राधान्यांवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करणे, ही कामेदेखील चीफ ऑफ स्टाफकडून केली जातात.

अध्यक्षांना सल्ला देणे : प्रमुख कर्मचारी अध्यक्षांना राजकारण, धोरण आणि आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत संकटांसह सर्व मुद्द्यांवर सल्ला देतात.

कोण आहेत सूसी विल्स?

सूसी विल्स या एनएफएल खेळाडू आणि स्पोर्ट्स कास्टर पॅट समरॉल यांच्या कन्या आहेत. त्यांनी १९७०च्या दशकात न्यूयॉर्कचे प्रतिनिधी जॅक केम्पच्या वॉशिंग्टन कार्यालयात काम केले. तसेच त्यांनी रोनाल्ड रेगनच्या मोहिमेसह व्हाईट हाऊसमध्ये शेड्युलर म्हणूनही काम केले. त्या मूळ फ्लोरिडा येथील रहिवासी आहेत. २०१० मध्ये राज्याच्या गव्हर्नर पदावर कमी राजकीय अनुभव असलेल्या व्यापारी रिक स्कॉट यांना मदत करण्याचे श्रेय विल्स यांना दिले जाते. २०१५ साली ट्रम्प आणि त्यांची भेट झाली. ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील मोहिमेची सह-अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ट्रम्प २०१६ मध्ये हिलरी क्लिंटन यांचा पराभव करीत विजयी झाले. दोन वर्षांनंतर २०१८ मध्ये रॉन डीसँटिस यांची फ्लोरिडाच्या गव्हर्नरपदी निवड करण्यात वाइल्स यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

हेही वाचा : ‘PM Internship Scheme’ काय आहे? योजनेसाठी पात्रता काय? बेरोजगार तरुणांना या योजनेचा कसा मिळणार लाभ?

परंतु, २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान जेव्हा विल्स पुन्हा ट्रम्पच्या फ्लोरिडा मोहिमेचे व्यवस्थापन करीत होत्या, तेव्हा दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. अखेरीस डीसँटीसने त्यांना काढून टाकले. विल्स यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी ट्रम्प यांच्या प्राथमिक मोहिमेचे नेतृत्व केले. ट्रम्पसाठी काम करीत असलेल्या संपूर्ण मोहिमेमध्ये टिकून राहणार्‍या विल्स या एकमेव प्रचार व्यवस्थापक आहेत. त्यांनी अध्यक्ष-निर्वाचित वकिलांशी त्यांच्या विविध फौजदारी आणि दिवाणी खटल्यांमध्ये मदत केली आहे. त्या किती काळ ट्रम्प यांच्या चीफ ऑफ स्टाफ राहतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चार व चीफ ऑफ स्टाफची बदली केली होती.

Story img Loader