व्हाईट हाऊस ही जगातील सर्वात प्रसिद्ध इमारतींपैकी एक आहे. जगात जवळपास प्रत्येक देशात राष्ट्राध्यक्षांना राहण्यासाठी सरकारी सदनिका असते. भारतात राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला राष्ट्रपती भवन म्हणतात, तर अमेरिकेत याला व्हाईट हाऊस म्हणतात. आतापर्यंत जॉर्ज वॉशिंग्टन वगळता प्रत्येक अमेरिकन राष्ट्राध्यक्ष व्हाईट हाऊसमध्येच राहिले आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले आहेत. त्यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. पुढील चार वर्षे हेच त्यांचे कार्यालय आणि घर असणार आहे. परंतु, व्हाईट हाऊस आतापर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या इमारतींपैकी एक कसे ठरले? या वास्तुचा इतिहास काय? त्याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वॉशिंग्टन अमेरिकेची राजधानी कशी झाली

जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यामुळेच वॉशिंग्टन डीसी हे आजचे पॉवरहाऊस आहे. १७८० च्या दशकाच्या उत्तरार्धात दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील प्रतिनिधींमध्ये राजधानी हा बराच वादाचा विषय होता. फिलाडेल्फिया ते न्यूयॉर्कपर्यंत अनेक पर्याय होते. परंतु, तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा असा विश्वास होता की, सध्या व्हर्जिनिया आणि मेरीलँडदरम्यान असलेली जागा राजधानीसाठी त्यांच्या कल्पनेत होती. १९७० च्या निवासी कायद्या अंतर्गत यूएस काँग्रेसने (अमेरिकेतील संसद) राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांना नवीन राजधानीचे अचूक स्थान निवडण्याचा अधिकार दिला. त्यांनी वॉशिंग्टन यांच्या नावावर असलेल्या शहराची निवड केली. १८८० पर्यंत फिलाडेल्फियामधील काँग्रेस आणि सर्वोच्च न्यायालयालादेखील याठिकाणी स्थलांतरित करावे लागले.

व्हाईट हाऊस ही जगातील सर्वात प्रसिद्ध इमारतींपैकी एक आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : इस्रायल-हमास युद्धविराम करार काय आहे? सुटका करण्यात येणारे ३३ ओलीस कोण आहेत? याचा अर्थ युद्ध आता संपेल का?

व्हाईट हाऊसची जागा कशी निवडली गेली?

राजधानी, काँग्रेस आणि अध्यक्षांच्या घराची रचना करण्यासाठी फ्रेंच वंशाचे वास्तुविशारद आणि अभियंता पियरे चार्ल्स एल’एनफंट यांची निवड करण्यात आली. राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानासाठी त्यांची एक भव्य योजना होती, ती म्हणजे व्हाईट हाऊसच्या चारपट आकाराची इमारत. नॅशनल जिओग्राफिकमधील एका अहवालानुसार, या इमारतीचा समोरील भाग माउंट व्हर्ननच्या दिशेने पोटोमॅक नदीकडे असेल, अशी संकल्पना त्यांची होती. परंत, राष्ट्राध्यक्षांच्या मध्यस्थ आयुक्तांशी झालेल्या वादानंतर एल’एनफंट यांना बरखास्त करण्यात आले. त्यानंतर हे काम जेम्स होबान यांच्याकडे सोपवण्यात आले. त्यांची शिफारस वॉशिंग्टनच्या चार्ल्सटनमधील मित्रांनी केली होती. आयर्लंडमध्ये जन्मलेले जेम्स होबान एक सुतार होते. त्यांनी चाकांची दुरुस्ती केली होती आणि नंतर ते जगातील सर्वात प्रसिद्ध इमारतीचे आर्किटेक्ट झाले.

एल’एनफंट यांच्या डिझाइनवर आधारित राष्ट्राध्यक्षांच्या घराच्या पायाभरणीचे काम सुरू झाले होते. मात्र, आयुक्तांना चिंता होती. आयुक्त डॉ. डेव्हिड स्टुअर्ट यांना असे वाटले की, राष्ट्राध्यक्षांच्या निवास्थानाला लागणारा खर्च अधिक आहे, असे ‘द प्रेसिडेंट्स’ या दोन खंडांच्या पुस्तकाचे लेखक आणि इतिहासकार विल्यम सील यांनी लिहिले. ही इमारत कॅपिटलला जोडणाऱ्या ग्रेट ॲव्हेन्यू (आता पेनसिल्व्हेनिया अव्हेन्यू म्हणून प्रसिद्ध) वरून दिसावी अशी आयुक्तांची इच्छा होती. राष्ट्राध्यक्षांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. जेम्स होबान यांनी नव्याने या इमारतीचे काम सुरू केले, त्यामुळे इमारतीचे बांधकाम अधिकृतपणे १३ ऑक्टोबर १७९२ रोजी सुरू झाले.

आतापर्यंत जॉर्ज वॉशिंग्टन वगळता प्रत्येक अमेरिकन राष्ट्राध्यक्ष व्हाईट हाऊसमध्येच राहिले आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

व्हाईट हाऊस कसे बांधले गेले?

जॉर्ज वॉशिंग्टन यांनी त्यांच्या दोन कार्यकाळात या इमारतीच्या बांधकामाकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित केले. त्यांना ही इमारत दगडाने बांधायची होती. एल’एनफंट बरखास्त होण्यापूर्वी, त्यांनी व्हर्जिनियामधील सरकारी बेट विकत घेतले आणि नंतर पोटोमॅक नदीच्या खाली सुमारे ६४ किलोमीटर अंतरावर एक्विया क्रीकवर एक छोटी खदान खरेदी केली. एक्विया सँडस्टोनच्या उत्पादनासाठी १०० पेक्षा जास्त पुरुषांना काम देण्यात आले होते, जे नंतर बार्ज आणि बोटी वापरून वॉशिंग्टनला नेण्यात आले. “वॉशिंग्टनने एका महान जागतिक महासत्तेची कल्पना केली होती आणि ती जागतिक महासत्तेसारखी दिसावी अशी त्यांची इच्छा होती आणि हे (दगड) निवडणे त्यांच्याच प्रयत्नाचा एक भाग होते,” असे ‘सीएनएन’च्या वृत्तात म्हटले आहे.

दगडाच्या बाहेरील भागाला ओलावा आणि तडे जाण्यापासून वाचवण्यासाठी, १७९८ मध्ये स्कॉटिश स्टोनमॅसन्सने इमारतीला पांढरा रंग दिला. अशाप्रकारे या इमारतीला ‘व्हाइट हाऊस’ असे नाव मिळाले. हे नाव वृत्तपत्रांमध्ये पोहोचले, पण पत्रकार आणि अमेरिकन लोक याला ‘प्रेसिडेंट हाऊस’ किंवा ‘एक्झिक्युटिव्ह मॅन्शन’ असेही म्हणतात. एल’एनफंटच्या मूळ रचनेवर आधारित काम सुरू झाल्यामुळे, होबान यांनी वॉशिंग्टनशी सल्लामसलत केली. याच्या अंतिम परिणामात आयरिश जॉर्जियन-शैलीच्या वाड्यापासून म्हणजेच डब्लिनमधील लेन्स्टर हाऊस (आताचे आयर्लंड येथील संसद) प्रेरित इमारत तयार करण्याचा निर्णय झाला. नॅशनल जिओग्राफिकच्या अहवालानुसार, उंच तळघर काढून टाकत त्यांनी इमारतीचा आकार दोन मजल्यापर्यंत कमी केला. त्याच्या सल्लागारांना वाटले की, भविष्यात इमारतीचे विस्तारीकरण किंवा बदलदेखील होऊ शकतात.

जॉर्ज वॉशिंग्टन यांनी त्यांच्या दोन कार्यकाळात या इमारतीच्या बांधकामाकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित केले. (छायाचित्र-रॉयटर्स)

२०० वर्षांत व्हाईट हाऊस कसे बदलले?

जॉर्ज वॉशिंग्टन या संरचनेच्या उभारणीत खोलवर गुंतले होते, मात्र बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. व्हाईट हाऊसच्या बांधकामाला तब्बल आठ वर्षे लागली. १ नोव्हेंबर १८०० रोजी या इमारतीत स्थलांतर करणारे पहिले अध्यक्ष जॉन ॲडम्स होते. तेव्हा तेथे सहा राहण्यायोग्य खोल्या होत्या. पहिल्या मजल्यावरील किंवा राज्य मजल्यावरील सर्वात मोठी खोली ही पूर्व खोली होती, जी इमारतीच्या पूर्वेला होती. त्यानंतर एक अंडाकृती आकाराची खोली (आता ब्लू रूम) होती, जेथे सार्वजनिक स्वागत केले जात असे.

ॲडम्स कुटुंब तेथे चार महिने राहिले. १८०० च्या अध्यक्षीय निवडणुकीत ॲडम्स यांचा थॉमस जेफरसनकडून पराभव झाला. जेव्हा नवीन राष्ट्राध्यक्ष व्हाईट हाऊसमध्ये आले, तेव्हा त्यांनी त्यांच्या आवडीनुसार या इमारतीत बदल केले. त्यांनी दोन गाड्या विकल्या, स्टेट डायनिंगचे त्यांच्या कार्यालयात रूपांतर केले आणि अध्यक्षीय मैदानात काही बदल केले. जेफरसनने हे घर सार्वजनिक भेटीसाठीदेखील उघडले आणि तेव्हापासून युद्धाचा काळ वगळता या इमारतीत अभ्यागतांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी अधिकृतपणे इमारतीला ‘व्हाईट हाऊस’ हे नाव दिले. त्याच्या २२५ वर्षांच्या इतिहासात, व्हाईट हाऊस बदलत गेले आणि विकसित होत गेले.

यात चार मोठे नूतनीकरण झाले आहे १८१४ मध्ये ब्रिटिशांच्या हातून लागलेल्या आगीतून व्हाईट हाऊस वाचले आणि १८१७ मध्ये पुन्हा बांधले गेले. व्हाईट हाऊस हिस्टोरिकल असोसिएशनच्या मते, १९०२ मध्ये थिओडोर रुझवेल्ट यांनी व्हाईट हाऊसचे आधुनिकीकरण केले आणि राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन कार्यकारी कार्यालयाची जागा म्हणून वेस्ट विंगची स्थापना केली. त्यांचे उत्तराधिकारी विल्यम हाफ्ट यांनी ओव्हल कार्यालय बांधले होते. काही दशकांनंतर यात मोठे बदल झाले. १९२९ मध्ये हर्बर्ट हूवर राष्ट्राध्यक्ष असताना वेस्ट विंगमध्ये लागलेल्या आगीत आतील भाग जळून खाक झाला. ब्लेअर हाऊसमध्ये आपला बराचसा वेळ घालवणाऱ्या हॅरी एस ट्रुमनच्या अध्यक्षपदाच्या संपूर्ण काळात त्याचे नूतनीकरण करण्यात आले. आज आपल्याला दिसणारी इमारत मुख्यत्वे १९४८ आणि १९५२ दरम्यान झालेल्या बदलांमुळे आहे.

व्हाईट हाऊस किती मोठे आहे?

अधिकृत व्हाईट हाऊस वेबपेजनुसार या इमारतीत २८ फायरप्लेस, आठ जिने, तीन लिफ्ट, ४१२ दरवाजे व १४७ खिडक्या आहेत. तसेच १४० पाहुण्यांसाठी जेवण तयार करण्याकरिता मोठे स्वयंपाकघर आहे. ही इमारत आणि त्यासभोवतालची जागा १८ एकर परिसरात व्यापली आहे. तंत्रज्ञानामुळे हीटिंग, प्लंबिंग, प्रकाश आणि सुरक्षा सर्व गोष्टी बदलल्या आहेत. या इमारतीत अनेक बदल करण्यात आले. ब्लू रूमचे नूतनीकरण जॅकलिन केनेडी, थेल्मा पॅट निक्सन आणि हिलरी क्लिंटन यांनी केले होते. काहींनी या इमारतीत कलाकृती आणि फर्निचर जोडले. अलीकडच्या वर्षांत, मिशेल ओबामा यांनी अल्मा थॉमसचे पेंटिंग आणले, हा व्हाईट हाऊसच्या इतिहासातील पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन महिलेने केलेला बदल आहे आणि मेलानिया ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस रोझ गार्डनसाठी इसामू नोगुचीच्या शिल्पाची फ्लोर फ्रेम विकत घेतली.

व्हाईट हाऊसच्या इमारतीत अनेक बदल करण्यात आले. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : RG Kar Rape-Murder Case : संजय रॉयला फाशीऐवजी जन्मठेप का झाली?

जेव्हा बायडेन यांनी ट्रम्प यांच्याकडून पदभार स्वीकारला, तेव्हा ओव्हल ऑफिसमध्ये काही बदल करण्यात आले. त्यांनी अँड्र्यू जॅक्सनच्या पोर्ट्रेटऐवजी बेंजामिन फ्रँकलिनचे पोर्ट्रेट ओव्हल ऑफिसमध्ये लावले. बिल क्लिंटन यांनी शेवटचा वापरलेला अध्यक्षीय शिक्का त्यांनी बदलला. आता ट्रम्प परत आले आहेत, त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात ओव्हल ऑफिसच्या भिंतींना कोणते पोर्ट्रेट लागेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.