अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी ‘प्रेसिडेन्शियल डीबेट’ म्हणजेच अध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये वादविवाद चर्चा महत्त्वाची मानली जाते. सध्या डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यातील डीबेटची चर्चा होत आहे. ९० मिनिटे विविध मुद्द्यांवर ट्रम्प आणि हॅरिस यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू होते. त्यादरम्यान ट्रम्प यांनी निवडणुकीचा मुद्दा म्हणून पाळीव प्राण्यांचा मुद्दा उपस्थित केला. “बेकायदा स्थलांतरित स्प्रिंगफील्डमध्ये पाळीव श्वान आणि मांजरी खात आहेत. ते तिथे राहणाऱ्या लोकांचे पाळीव प्राणी खात आहेत,” असे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षीय चर्चेत सांगितले. परंतु, यात किती सत्य आहे? पाळीव प्राण्यांचा मुद्दा उपस्थित करण्याचे कारण काय? खरंच अमेरिकेतील स्थलांतरित पाळीव प्राणी खातात का? त्याविषयी जाणून घेऊ.

चर्चेच्या नियंत्रकांपैकी एक असणारे ‘एबीसी’चे डेव्हिड मुइर यांनी ट्रम्प यांनी पाळीव प्राण्यांविषयी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरून वस्तुस्थिती तपासली असता, ओहायोमधील स्प्रिंगफील्डच्या शहर व्यवस्थापकाने हे दावे नाकारले होते. “स्थलांतरित समुदायातील व्यक्तींकडून पाळीव प्राण्यांना इजा, मारहाण किंवा गैरवर्तन केल्याच्या दाव्यांचे कोणतेही विश्वसनीय पुरावे नाहीत”, असे त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष व डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस म्हणाल्या, “अमेरिकन जनतेला प्रभावित करणाऱ्या समस्यांकडे लक्ष दिले जात नाही. त्याउलट काहीही विधाने केली जात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोणाची निवड होणार हे स्पष्ट आहे.”

Strained US China Relations news in marathi
चीन अमेरिका संबंध आणखी बिघडणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
US China Relations , US China, Xi Jinping ,
चीनवर अमेरिकी निर्बंधांचा राजकीय परिणामही दिसेल…
donald trump s desire to acquire greenland
अन्वयार्थ : ट्रम्प यांचा ग्रीनलँडहट्ट
why donald trump want greenland who owns the island what is the role of the greenlanders
डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रीनलँड का हवे आहे? बेट कोणाच्या मालकीचे? ग्रीनलँडवासियांची भूमिका काय?
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
Donald Trump is advocating using economic pressure to annex Canada as part of the United States
Trump on Canada: अमेरिका कॅनडावर ताबा मिळवणार का?
Donald Trump
Donald Trump : ‘हश मनी’ प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा! सर्व आरोपातून झाली बिनशर्त सुटका
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी ‘प्रेसिडेन्शियल डीबेट’ म्हणजेच अध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये वादविवाद चर्चा महत्त्वाची मानली जाते. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : ९/११ च्या आत्मघातकी हल्ल्यानंतर काय बदललं? विमान वाहतुकीच्या सुरक्षा व्यवस्थेत काय बदल झाले?

स्प्रिंगफील्ड, ओहायोमध्ये नक्की काय घडले?

२७ ऑगस्टच्या स्प्रिंगफील्ड शहर कमिशनच्या बैठकीच्या एका व्हिडीओमध्ये स्थानिक रहिवासी स्थलांतरितांबद्दल बोलताना दिसले होते. “उद्यानातून बदके चोरी केली जात आहेत आणि त्यांना खाल्ले जात आहे,” असा दावा एका स्थानिकाने केला होता. स्प्रिंगफील्डमधील गुन्हेगारीवरील एका फेसबुक ग्रुपवर हैतीयन स्थलांतरित हे कृत्य करीत असल्याचे बीबीसीच्या तथ्य-तपासणी युनिटला आढळले. तसेच स्प्रिंगफील्डच्या ईशान्येस सुमारे १७५ मैल अंतरावर असणार्‍या ओहायोच्या कँटनमध्ये एका महिलेला मांजर मारून खाल्ल्याबद्दल अटक करण्यात आल्याचेही वृत्त आहे.

या घटना प्रचाराचा मुद्दा कशा ठरल्या?

स्प्रिंगफील्डमधील हैतीयन स्थलांतरितांची संख्या लक्षणीयरीत्या वाढताना दिसत आहे. अलीकडच्या वर्षांत स्थलांतरितांचा आकडा सुमारे २० हजारपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे. हे लोक अमेरिकेतील लोकांचे पाळीव प्राणी खात असल्याचे वेगवेगळे दावे रिपब्लिकन पक्षातील सदस्यांकडून वारंवार करण्यात येत आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या न्यायपालिकेवरील हाऊस कमिटी असलेल्या हाऊस ज्युडिशियरी GOP च्या अधिकृत ‘एक्स’ हॅण्डलवर ९ सप्टेंबरला मांजरीला मिठी मारत असलेल्या ट्रम्प यांचे एआय छायाचित्र पोस्ट करण्यात आले. “ओहायोमध्ये बदके आणि मांजरीचे पिल्लू संरक्षित करा!” असे त्या पोस्टमध्ये लिहिण्यात आले. ओहायोचे सिनेटर जे. डी. व्हॅन्स यांनी त्यांच्या ‘एक्स’वर स्प्रिंगफील्ड शहर आयोगाच्या बैठकीचा व्हिडीओ पोस्ट केला.

व्हॅन्स म्हणाले की, हा व्हिडीओ म्हणजे बेकायदा स्थलांतरितांचा अमेरिकन नागरिकांच्या जीवनावर कसा परिणाम होतो, याचे विलक्षण प्रमाण आहे. एका वेगळ्या ट्विटमध्ये त्यांनी दावा केला की, गेल्या काही आठवड्यांत त्यांच्या कार्यालयाकडे स्प्रिंगफील्डच्या रहिवाशांकडून अनेक तक्रारी आल्या आहेत. रहिवाशांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेजाऱ्यांचे पाळीव प्राणी किंवा स्थानिक वन्यप्राण्यांचे हैतीयन स्थलांतरितांनी अपहरण केले होते. “हे शक्य असू शकते की, या सर्व अफवा आहेत. परंतु, हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे की, बेकायदा हैतीयन स्थलांतरितांनी एका मुलाची हत्या केली होती. स्थलांतरितांच्या वाढत्या संख्येने स्थानिक आरोग्य सेवेवरदेखील ताण येत आहे. टीबी व एचआयव्हीसारखे संसर्गजन्य रोग वाढत आहेत आणि स्थानिक शाळांना इंग्रजी न जाणणाऱ्या नवोदितांशी संपर्क साधणेही अवघड होत आहे,” असे व्हॅन्स म्हणाले.

ट्रम्पसमर्थक आणि उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते या घटना आणखी वाढवून सांगत आहेत. तसेच या ‘कथांचा’ मौखिक प्रसारही होत आहे. ११ सप्टेंबर रोजी टर्निंग पॉईंट या पुराणमतवादी संस्थेचे संस्थापक कार्यकर्ते चार्ली कर्क यांनी स्प्रिंगफील्डमधील रहिवाशांचा या विषयावर बोलतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यावर त्यांनी लिहिले, “व्हिडीओतील प्रत्येकानं लोकांचे पाळीव प्राणी खाल्ल्याच्या कथा ऐकल्या आहेत.” १० सप्टेंबर रोजी ट्रम्प यांच्या मोठ्या मुलाने ट्रम्प यांचे एक छायाचित्र पोस्ट केले होते; ज्यात ते एक असॉल्ट रायफल घेऊन मोठ्या मांजरीवर बसले होते. हे छायाचित्र पोस्ट करून, त्यावर “आमच्या पाळीव प्राण्यांना वाचवा!,” असे लिहिण्यात आले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांची स्थलांतरितांबाबतची भूमिका काय आहे?

स्थलांतरितांबाबत ट्रम्प यांची भूमिका कायम नकारात्मक असल्याचे पाहायला मिळते. त्याची अनेक उदाहरणेही आहेत. २०१५ मध्ये ट्रम्प यांनी आपल्या प्रमुख निवडणूक वचनामध्ये मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधणार असल्याचे सांगितले होते. ते सध्याच्या मोहिमेदरम्यानही स्थलांतरितांमुळे देशात गुन्हेगारी आणि रोग येत असल्याचे सांगत स्थ्लांतरितांची एक नकारात्मक प्रतिमा तयार करीत आहेत. सप्टेंबर २०२३ मध्ये ट्रम्प यांनी, रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये पुन्हा निवडून आल्यास, स्थलांतरितांवर देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठी हद्दपार कारवाई करण्याचे वचन दिले होते.

रिपब्लिकन पक्षाने असे म्हटले होते की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सुरू केलेली सीमा भिंत (यूएस-मेक्सिको) पूर्ण करून, आपण आपली दक्षिण सीमा सुरक्षित केली पाहिजे. ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांचा संबंध बेकायदा स्थलांतरितांशी जोडण्याचा प्रयत्न वारंवार केला आहे. ट्रम्प आणि व्हॅन्स दोघांनीही हॅरिस यांच्यावर टीका केली आहे. ट्रम्प यांच्या प्रचारमोहिमेच्या जाहिरातीत दावा करण्यात आला आहे की, १० दशलक्ष नागरिकांनी बेकायदा सीमा ओलांडण्याबाबत आणि फेंटॅनाइलसंबंधित ओव्हरडोसमुळे झालेल्या २,५०,००० मृत्यूसाठी कमला हॅरिस जबाबदार आहेत.

हेही वाचा : इराणने रशियाला दिले महाविध्वंसक क्षेपणास्त्र, अमेरिका-युक्रेनच्या चिंतेत वाढ; ‘Fath-360’ क्षेपणास्त्र किती घातक?

या मुद्द्यावर हॅरिस यांचे म्हणणे काय?

अमेरिकेच्या दक्षिणेकडील सीमेवर वाढत्या संकटाचा सामना करताना अध्यक्षीय कार्यकाळाच्या सुरुवातीस राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हॅरिस यांची एल साल्वाडोर, ग्वाटेमाला व होंडुरासच्या सरकारांबरोबर काम करण्यासाठी नियुक्ती केली. या ठिकाणांहून मोठ्या संख्येने स्थलांतरित अमेरिकेमध्ये येतात. हॅरिस यांनी स्थलांतरितांच्या समस्यांवर जवळून काम केले आहे. त्यामुळेच ट्रम्प व व्हॅन्स हॅरिस यांना लक्ष्य करीत आहेत आणि त्या या मुद्द्याला निवडणुकीच्या मुद्द्यांचे स्वरूप दिले आहे. हॅरिस यांनी द्विपक्षीय सीमा सुरक्षा विधेयकाला पाठिंबा देण्याविषयी सांगितले आहे. या विधेयकात स्थलांतरितांच्या विशिष्ट गटाला अमेरिकेत स्थान देण्याची, त्यानंतर सीमा बंद करण्याची व आश्रयविषयक अटी कडक करून सीमा सुरक्षा मजबूत करण्याची तरतूद आहे. मात्र, ट्रम्प या विधेयकाच्या विरोधात आहेत. कमला यांनी बुधवारच्या चर्चेत ते मंजूर करण्यात अडथळा आणल्याचा ट्रम्प यांच्यावर आरोप केला.

Story img Loader