-अमोल परांजपे

आपल्या मनमानी राजकारणासाठी प्रसिद्ध असलेले अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. स्वत: ट्रम्प यांनी वेळोवेळी तसे संकेत दिल्यामुळे या चर्चांना बळकटी मिळते आहे. मात्र यामुळे त्यांच्या स्वपक्षीय, रिपब्लिकन पक्षातील विरोधकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे, तर सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्ष याचे भांडवल करण्याच्या प्रयत्नात आहे. 

अरविंद केजरीवाल आणि 'आप'ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं? (फोटो सौजन्य पीटीआय)
अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
india exports contract 1 percent in december 2024
डिसेंबरमध्ये देशाच्या निर्यातीत घसरण; नेमके कारण काय?
US China Relations , US China, Xi Jinping ,
चीनवर अमेरिकी निर्बंधांचा राजकीय परिणामही दिसेल…
donald trump s desire to acquire greenland
अन्वयार्थ : ट्रम्प यांचा ग्रीनलँडहट्ट
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
Donald Trump
Donald Trump : ‘हश मनी’ प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा! सर्व आरोपातून झाली बिनशर्त सुटका

निवडणूक लढण्याबाबत काय म्हणाले ट्रम्प?

अलिकडेच एका भारतीय वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी २०२४ची अध्यक्षीय निवडणूक लढण्याचे पुन्हा संकेत दिले. “मी निवडणूक लढावी, असे अनेकांना वाटते आहे. याबाबत माझा निर्णय झाला आहे. योग्य वेळी मी त्याबाबत घोषणा करेन” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. यापूर्वीही टेनेसीमधील एका सभेत “मी अध्यक्षीय निवडणूक लढलो तर किती जणांना आवडेल?” असा सवाल केला होता. तर सप्टेंबरच्या सुरुवातीला ‘२०२४मध्ये आपलेे सुंदर व्हाईट हाऊस परत घेण्याची’ शपथ त्यांनी घेतली होती. असे वारंवार संकेत द्यायचे, मात्र अधिकृत घोषणा करायची नाही, यामागे ट्रम्प यांची कोणती चाल आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.

अधिकृत घोषणा न करण्याचे कारण काय?

२०२४च्या अध्यक्षीय निवडणुकीबाबत सातत्याने विधाने करतानाच ट्रम्प यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करण्याचे मात्र टाळले आहे. सतत चर्चेत राहण्यासाठी ट्रम्प यांची ही खेळी असल्याचे त्यांचे विरोधक सांगत आहेत. ट्रम्प हे प्रसिद्धीचे गुलाम आहेत, असा आरोप केला जातोय. हे काही अंशी खरे असले तरी केवळ चर्चेत राहण्यासाठी ट्रम्प निवडणूक लढण्याची अफवा पेरत असतील, असे मानण्याचे कारण नाही. 

महत्त्वाकांक्षी ट्रम्प असे स्वस्थ बसतील?

२०१६च्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने भलेबुरे मार्ग वापरून डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला, ते बघता ते व्हाईट हाऊसमध्ये पुन्हा जाण्याची संधी मिळाली, तर सोडणार नाहीत. २०२०च्या निवडणुकीत जो बायडन यांनी धूळ चारल्यानंतर ते पराभव मान्य करायला अद्याप तयार नाहीत. यावरून ट्रम्प यांची महत्त्वाकांक्षा दिसते. मात्र त्यांच्या या आक्रमक भूमिकांमुळे त्यांचे काही स्वपक्षीयच अधिक चिंतेत आहेत.

मध्यावधी निवडणुकीत फटका बसण्याचा धोका?

नोव्हेंबर २०२२मध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणुका होणार आहेत. त्याआधी ट्रम्प यांनी आपली उमेदवारी जाहीर केली, तर त्याचा फटकाच अधिक बसेल अशी भीती रिपब्लिकन सदस्यांना वाटते आहे. ट्रम्प यांच्या संभाव्य उमेदवारीचा मध्यावधीमध्ये फायदा करून घेण्याची रणनीती डेमोक्रॅटिक पक्षाने आखली आहे. “ट्रम्प आणि त्यांचे रिपब्लिकन पाठिराखे लोकशाहीला धोका आहेत” असा आरोप राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांनी केला आहे. त्यामुळेच ट्रम्प अधिकृत घोषणा न करतील तर बरे, असेच पक्षाला वाटते आहे. 

खर्चावर मर्यादा येऊ नये, यासाठी घोषणा लांबणीवर?

अर्थात, स्वपक्षियांना फटका बसेल इतका दूरदर्शी विचार करून ट्रम्प घोषणा लांबवतील, अशी शक्यता कमीच आहे. सभा, बैठका, मेजवान्या, प्रवास याच्या खर्चावर मर्यादा येऊ नये, हे एक कारण असू शकते. एकदा उमेदवारी जाहीर झाली, प्रचारासाठी केलेला सर्व खर्च मर्यादेच्या चौकटीत येतो. अमेरिकेतील प्रारंभिक पक्षांतर्गत निवडणुकांसाठी (प्रायमरीज्) सर्वच उमेदवार ही क्लृप्ती वापरतात. त्यातच गर्भश्रीमंत (तरी कर्जबाजारी) असलेल्या ट्रम्प यांना देणग्यांची पर्वा नसल्यामुळे उमेदवारीची घोषणा जितकी लांबेल, तितका त्यांचा फायदाच आहे.

एफबीआयपासून बचावासाठी उमेदवारीची खेळी?

फ्लोरिडामधील ट्रम्प यांच्या मालमत्तेवर केंद्रीय तपास यंत्रणेने (एफबीआय) ऑगस्ट महिन्यात छापा टाकला होता. त्यामध्ये काही महत्त्वाची गोपनीय कागदपत्रे आढळली असून ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडताना ही कागदपत्रे सोबत नेल्याचा दावा एफबीआयने केला आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवारी त्यांना चौकशीपासून वाचवू शकत नाही, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे. 

रिपब्लिकन पक्षाला ट्रम्प मान्य होतील?

ट्रम्प यांचे आतापर्यंतचे राजकारण बघता ते केवळ दिशाभूल करत असल्याचे मानण्याचे कारण नाही. त्यांनी कदाचित पक्षांतर्गत निवडणुकीत उतरण्याची तयारी केलेली असू शकेल. तसे झाले तर २०२४ची निवडणूक (किमान रिपब्लिकन पक्षातील) चुरशीची होईल, यात शंका नाही. ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या मनमानी कारभाराचा अनुभव असलेल्या रिपब्लिकन पक्षाला ते मान्य होतात का, हादेखील प्रश्न आहेच.

Story img Loader