Tungabhadra Dam कर्नाटकात सध्या पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. कर्नाटकातील तुंगभद्रा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. याच सततच्या मुसळधार पावसामुळे शनिवारी रात्री उशिरा या धरणाच्या एका दरवाजाची साखळी तुटली आणि तुंगभद्रा नदीवरील दगडी बांधाच्या या धरणातील ३३ पैकी एक दरवाजा वाहून गेला. त्यामुळे धरणातून वाहणार्या पाण्याचा वेग वाढणार असल्याचे सांगण्यात आले. दरवाजा वाहून गेल्यानंतर कोप्पल जिल्ह्याला पुराचा इशारा देण्यात आला आहे. धरणाचा दोन-तृतीयांश भाग रिकामा झाल्यानंतरच दुरुस्तीचे काम केले जाऊ शकते, असे प्रकल्पाचे व्यवस्थापन करणाऱ्या तुंगभद्रा बोर्डाने सांगितले आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांनी रविवारी धरणाला भेट दिली. नेमके काय घडले? दरवाजा वाहून गेल्याने पूर परिस्थिती निर्माण होणार का? शेतकरी का घाबरले आहेत? याबाबत जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा