टपरवेअर कंपनीचा एकतरी डब्बा (कंटेनर) प्रत्येकाच्या घरी असतोच असतो. हे नाव आपल्या अगदी परिचयाचे आहे. अन्नासाठी सगळ्यात सुरक्षित प्लास्टिक म्हटलं तर टपरवेअरचे नावच आधी यायचे. घटती विक्री आणि वाढती स्पर्धा यामुळे ‘टपरवेअर ब्रॅंड कॉर्प’ने दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला आहे. फूड स्टोरेज कंटेनर फर्मने यापूर्वीही दिवाळखोरीचा इशारा दिला होता. मात्र, कंपनीवर ही वेळ का आली? कंपनीचे नक्की काय चुकले? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

टपरवेअरची स्थापना

टपरवेअरची स्थापना १९४६ मध्ये केमिस्ट अर्ल टपर यांनी केली होती. कंपनीच्या वेबसाइटनुसार, कंपनीच्या संस्थापकाला महामंदीनंतर लगेचच एका प्लास्टिक कारखान्यात मोल्ड तयार करताना कंपनीची स्थापना करण्याची प्रेरणा मिळाली. अन्न अधिक काळ ताजे ठेवण्यासाठी टपरवेअरमध्ये नवीन प्लास्टिक वापरण्यात आले. जेव्हा अनेक कुटुंबांसाठी फ्रीज खूप महाग होते, त्या लोकांनी टपरवेअरच्या डब्यांचा वापर केला. परंतु, अगदी सुरुवातीला कंपनी इतकी लोकप्रिय नव्हती.

government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
Pune and Pimpri Chinchwad may raise PMPML ticket prices due to rising operational deficit
पीएमपी तिकीट दरवाढीचे भवितव्य, ‘दादांच्या ‘ हाती, काय निर्णय घेणार ?
mishtann food limited
मिष्टान्न! (पूर्वार्ध)

हेही वाचा : लेबनॉनमधील पेजर स्फोटांमुळे इस्रायल आणि हिजबूल यांच्यातील संघर्ष पेटणार का?

अमेरिकेच्या सेल्सपर्सन ब्राउनी वाईज यांनी टपरवेअरला घराघरात पोहोचवले. त्यांनी त्यासाठी ‘टपरवेअर पार्टीज’ आयोजित करण्यास सुरुवात केली; ज्यामध्ये घरोघरी जाऊन स्त्रियांना टपरवेअर विकायच्या. हा ब्रँड १९५० आणि १९६० च्या दशकात लोकप्रिय झाला आणि मोठ्या प्रमाणात लोक याचा वापर करू लागले. टपरवेअरच्या लवचिक हवाबंद सील डब्यांमुळे इतरांच्या तुलनेत त्याला वेगळेपण आले आणि त्याची मागणी वाढू लागली. कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांची उत्पादने जगभरातील सुमारे १०० देशांमध्ये विकली जात होती.

टपरवेअरची स्थापना १९४६ मध्ये केमिस्ट अर्ल टपर यांनी केली होती. (छायाचित्र-फायनान्शियल एक्सप्रेस)

कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली कशी?

आता ग्राहक पर्यावरणपूरक डब्यांचा वापर करू लागले आहे. टपरवेअरची प्लास्टिक उत्पादने आजच्या पर्यावरणाबाबत जागरूक ग्राहकांशी जुळवून घेऊ शकली नाहीत. “टपरवेअरचा काळ आता संपला आहे,” असे हरग्रीव्स लॅन्सडाऊन येथील मनी अँड मार्केट्सच्या प्रमुख सुसाना स्ट्रीटर यांनी बीबीसीला सांगितले. “खरेदीदारांच्या वर्तनातील बदलांमुळे टपरवेअर या ट्रेंडच्या बाहेर ढकलले गेले आहे. ग्राहकांनी प्लास्टिक सोडण्यास सुरुवात केली आहे आणि अन्न साठवण्यासाठी पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक जागरूक मार्ग शोधले आहेत.”

गेल्या वर्षी टपरवेअर कंपनीने ही कंपनी बंद होऊ शकते, असे जाहीर केले होते. करोना काळात टपरवेअर मागणीत थोड्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, करोनानंतर टपरवेअरच्या मागणीत घट झाली. ‘द टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार, प्लास्टिक आणि शिपिंगच्या किमती अलीकडच्या वर्षांत झपाट्याने वाढल्याने, कंपनीला वाढत्या खर्चामुळेदेखील धक्का बसला आहे. स्वस्त, नॉन-ब्रँडेड प्लास्टिक खाद्यपदार्थांच्या कंटेनरशी स्पर्धा करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या कंपनीला उच्च वेतन आणि वाहतूक खर्चाचाही फटका बसला.

टपरवेअरने अलीकडेच अ‍ॅमेझॉन आणि टार्गेद्वारे उत्पादने विकून तरुण प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. जूनमध्ये ऑर्लँडो येथील फर्मने २०२४ च्या सुरुवातीस आपला एकमेव अमेरिकेतील कारखाना बंद केला आणि उत्पादनाचे कामकाज मेक्सिकोमध्ये हलवले. तसेच १४८ कामगारांना कामावरून काढून टाकले असल्याचेदेखील सांगितले.

दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल

टपरवेअरने दिवाळखोरी संरक्षणासाठी अर्ज दाखल केला. “गेल्या अनेक वर्षांपासून, मॅक्रो इकॉनॉमिक वातावरणामुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे,” असे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लॉरी ॲन गोल्डमन यांनी एका निवेदनात म्हटले आहे. कंपनीने आपल्या ब्रँडचे संरक्षण करण्यासाठी आणि कंपनीमध्ये आणखी रूपांतर करण्यासाठी व्यवसायासाठी विक्री प्रक्रिया सुरू करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेतली असल्याचे सांगितले जात आहे. न्यूयॉर्क येथील फर्मने दिवाळखोरी प्रक्रियेदरम्यान कार्यरत राहण्यास स्वारस्य व्यक्त केले आहे. ‘एएफपी’नुसार गोल्डमन म्हणाले, “आम्ही या प्रक्रियेदरम्यान आमच्या ग्राहकांना आवडत असलेल्या आणि विश्वास ठेवत असलेल्या उच्च-गुणवत्तेच्या उत्पादनांसह सेवा देत राहण्याची योजना आखत आहोत.” बीबीसीने वृत्त दिले की, कंपनी दिवाळखोरी जाहीर करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर या आठवड्यात त्यांचे शेअर्स ५० टक्क्यांहून अधिक घसरले.

हेही वाचा : Indus Water Treaty: भारताने सिंधू जलवाटप कराराबाबत पाकिस्तानला बजावली नोटीस ; नेमकं प्रकरण काय?

टपरवेअरची सूचीबद्ध मालमत्ता ५०० दशलक्ष ते एक अब्ज इतकी आहे, तर कंपनीची देणी एक अब्ज ते १० अब्जापर्यंत वाढली आहे. कर्जदारांनी कर्जाची भरपाई सुरू ठेवल्यानंतरही व्यवसायात घसरण सुरूच होती. टपरवेअरने सांगितले की, गेल्या वर्षी नवीन व्यवस्थापन संघाच्या नियुक्तीनंतर त्यांच्या योजना आणि कार्यक्षमता सुधारण्यात प्रगती झाली आहे. परंतु, खरंच कंपनी पुन्हा उभी राहू शकेल का, की निधीअभावी कंपनी पूर्णपणे बंद पडेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader