Apple Tax vs Twitter: टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्सच्या करारासह ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठे बदल घडवून आणले. हजारो कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यापासून ते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर वापसीपर्यंत अनेक निर्णय हे वादग्रस्त ठरले, मात्र सर्वाधिक चर्चेत आलेला विषय म्हणजे व्हेरीफाईड अकाउंटसाठी आकारण्यात येणारे शुल्क. सर्व स्तरातून विरोध होऊनही मस्क यांनी ब्ल्यू टीकसाठी लागणारे शुल्क मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र यात अडथळा ठरला तो म्हणजे अॅपल टॅक्स. खरंतर याला केवळ अॅपल टॅक्स म्हणणे योग्य ठरणार नाही कारण यामध्ये तितकाच वाटा हा गूगलचा आहे पण यात अॅपल कंपनीच आघाडीवर असल्याने मस्क यांनी आता अॅपलच्या विरुद्ध ऑनलाईन युद्ध पुकारले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अॅपल टॅक्स म्हणजे काय?

अॅपमध्ये खरेदी आणि नूतनीकरणासाठी अॅपलचे बिझनेस मॉडेल आहे. अॅपल डेव्हलपर वेबसाइटनुसार, ग्राहकाच्या सेवेच्या पहिल्या वर्षात, विकासकांना प्रत्येक सबस्क्रिप्शनच्या किंमतीच्या ७० %, कर लागू होतात. सदस्याने एक वर्ष सशुल्क सेवा जमा केल्यानंतर, सबस्क्रिप्शन किमतीच्या ८५% कर लागू होतो. सऱ्या शब्दांत सांगायचे तर, विकसकांनी कमावलेल्या रक्कमेपैकी ३०% रक्कम अॅपलकडे जमा होते.

अॅपल टॅक्स सर्व अॅप्सना लागू आहे का?

अॅपलकडे लहान व्यवसायांसाठी विशेष मॉडेल आहे. परंतु ट्विटर ब्लू टिक, हे जर का आयफोन अॅप वापरून खरेदी केलेले असेल तर अॅपल थेट वापरकर्त्याला बिल देते. एकदा बिलिंग पूर्ण झाल्यावर अॅपल एकूण रक्कमेवर ३० % कर घेते, जे एका वर्षानंतर १५ % पर्यंत कमी होते.

अॅपल टॅक्स मस्कच्या ट्विटरसाठी का ठरतोय डोकेदुखी?

ट्विटर विकत घेताच मस्क यांनी व्यक्त केलेली इच्छा म्हणजे त्यांना ट्विटरला असे अॅप बनवायचे आहे जिथे प्रत्येक गोष्टीसाठी पैसे द्यावे लागतील. खरं सांगायचं तर, मस्क यांच्यासाठी ट्विटरच्या अॅप-मधील खरेदीतून मिळणारी कमाई नाकारल्यास फार नुकसान होणार नाही पण अॅपल आणि गूगलला द्यायची रक्कम मस्क यांना अधिक खर्चिक पडू शकते. यामुळेच ट्विटर विरुद्ध अॅपल असा वाद होऊ शकतो.

मस्क अॅपल टॅक्स चुकवू शकतात का?

अॅपल टॅक्स न भरण्याचे मार्ग शोधत असल्याची उच्च-प्रोफाइल उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ, नेटफ्लिक्स, आयफोन वापरकर्त्यांना नेटफ्लिक्स अॅपवरून साइन अप करण्याची परवानगी देत ​​नाही. अन्य सुरु असणाऱ्या अकाउंटवर वापरकर्ता आयडीसह अॅप वापरू शकतो, परंतु तुम्ही नवीन वापरकर्ता म्हणून साइन अप करू शकत नाही. मस्क आणि ट्विटर या मार्गाने सर्व सदस्यता केवळ डेस्कटॉपपुरते मर्यादित ठेवून खर्च टाळू शकतात.

अॅपल व गूगल अॅप स्टोअरमधून ट्विटर काढून टाकणार का?

फोर्टनाइट या गेम्स डेव्हलपरने अॅपलला पैसे देण्यास नकार दिल्याने यापूर्वी अॅप स्टोअरमधून हे ऍप्लिकेशन काढून टाकण्यात आले होते. गुगलनेही हाच मार्ग अवलंबला होता. त्यामुळे ट्विटर सह वाढ चिघळल्यास अॅपल व गूगल अॅप स्टोअरमधून ट्विटर काढूनही टाकू शकेल.

हे ही वाचा<< विश्लेषण: एलॉन मस्कच्या ट्विटरला नाकारत ब्राझीलच्या नागरिकांचं भारतीय Koo App ला प्राधान्य; दोघांमध्ये नेमका फरक काय?

एलॉन मस्क ‘पर्यायी’ फोन बनवणार का?

एलॉन मस्क यांची ताकद व संपत्ती पाहता नवीन फोन बनवणे काही कठीण होणार नाही पण हा फोन मार्केटमध्ये स्वीकारला जाईल का आहे अप्रश्न आहे. समजा जर मस्क यांनी फोन बनवलाच तरी Android आणि iOS च्या जगात त्याचा कितपत वापर होईल आणि केवळ ट्विटर चालवण्यासाठी फोन निर्मितीत उतरणे हे मस्क यांना तरी परवडणारे ठरेल का? हे प्रश्न विचारात घेता मस्क येत्या काळात फोनचा पर्याय आणण्याची शक्यता कमी आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter to be removed from apple and google play store elon musk fight against apple tax explained svs