ट्विटरवरील ब्लू टिकचा घोळ अजूनही सुरूच आहे. मागच्या आठवड्यात पैसे न भरलेल्या सर्व अकाऊंट्सचे ब्लू टिक ट्विटरकडून हटविण्यात आले होते. सरकारशी संबंधित विभाग, महत्त्वाच्या व्यक्ती, राजकारणी, कलाकार, खेळाडू या सर्वांचे ब्लू टिक अचानक काढून टाकण्यात आले. एलॉन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यापासून महसूल वाढविण्यासाठी ब्लू टिक विकत देण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला. त्यामुळे सेलेब्रिटी असो किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सर्वांनाच ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागणार, असे संकेत देण्यात आले. मात्र रविवारी अचानक अनेक सेलेब्रिटींची ब्लू टिक पुन्हा प्रदान करण्यात आली. या सेलेब्रिटींनी महिन्याला आठ डॉलर न भरताही त्यांना व्हेरिफिकेशन बॅच परत देण्यात आले. ट्विटरने केलेल्या घुमजावमुळे अनेकांना आश्चर्य वाटले. ट्विटरने ज्या लोकांना ब्लू टिक परत दिली, त्यामध्ये काही वर्षांपूर्वी मृत पावलेल्या सेलेब्रिटींचाही समावेश आहे.

ब्लू टिकचा फज्जा

मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर एलॉन मस्कने सर्वात पहिल्यांदा ‘ट्विटर ब्लू’ ही सशुल्क सेवा सुरू केली. मागच्या आठवड्यात गुरुवारी ट्विटरने अचानक प्रसिद्ध व्यक्तींचे व्हेरिफाइड स्टेट असलेले ब्लू टिक काढून टाकले. बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान, अमिताभ बच्चन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच क्रीडा क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व सचिन तेंडुलकर आणि रोनाल्डो तसेच संगीतकार पॉल मॅककार्टनी (Paul McCartney) आणि बियॉन्से (Beyoncé) यांचेही ट्विटर व्हेरिफिकेशन हटविण्यात आले.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sunil Tatkare
Sunil Tatkare : “आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून…”; अमित शाह-शरद पवार भेटीनंतर सुनील तटकरेंची महत्त्वाची प्रतिक्रिया
Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
US man reads with giant anaconda Snake shocking video Viral
बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा

काही मूठभर लोक जसे की, स्टिफन किंग (Stephen King), अभिनेते विल्यम शॅटनर (William Shatner) आणि बास्केटबॉल खेळाडू लेब्रॉन जेम्स (LeBron James) यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांनी ट्विटरची सशुल्क सेवा घेतली नाही. पण एलॉन मस्क यांनी त्यांचे शुल्क अदा करून ब्लू टिक कायम ठेवले.

ब्लू टिक पुन्हा का देण्यात आली?

रविवारी पुन्हा एकदा काही लोकांना ब्लू व्हेरिफिकेशन बॅज पुन्हा मिळाल्यामुळे या लोकांचे पैसे कुणी भरले, असा प्रश्न निर्माण झाला. या वेळीदेखील एलॉन मस्कने या लोकांचे पैसे भरले का? अशीही विचारणा करण्यात आली. ज्या लोकांना पैसे न भरताही ब्लू टिक मिळाली, त्यामध्ये एएफपी वृत्तसंस्था, अमेरिकन रॅपर लिल नास एक्स (Lil Nas X), काही राजकारणी आणि लोकप्रिय व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे.

हे वाचा >> बिल गेट्स, शाहरुख खान ते विराट कोहली, सर्वांच्या ट्विटर खात्यावरील ‘ब्लू टिक’ गायब; जाणून घ्या ग्रे, गोल्डन टिक म्हणजे नेमकं काय?

ब्लू टिक पुन्हा मिळाल्यानंतर अमेरिकन रॅपर लिल नास एक्स यांनी ट्वीट करीत म्हटले की, “मी खरे सांगतो, मी ट्विटर ब्लूसाठी पैसे दिलेले नाहीत. टेस्लाच्या माणसाने माझा राग ओळखला असावा.” काल्पनिक कथा लिहिणारे लेखक निल जैमन (Neil Gaiman) यांनीदेखील ट्वीट करीत सांगितले की, मी ट्विटर ब्लू सबस्क्राइब केलेले नाही. मी माझा मोबाइल नंबर दिलेला नाही. (ट्विटर सशुल्क सेवेसाठी मोबाइल नंबर आवश्यक आहे.) ब्रिटिश अभिनेते इयान मॅककेलेन (Ian McKellen) यांनी सांगितले की, मी त्या ‘प्रतिष्ठे’साठी पैसे दिलेले नाहीत. प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांसोबतच ऑस्चविट्झ-ब्रिकेनाउ राज्य संग्रहालयाचेही (Auschwitz-Birkenau State Museum) ब्लू व्हेरिफिकेशन पुन्हा प्रदान करण्यात आले. या संग्रहालयानेही सशुल्क सेवा घेतली नव्हती.

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची ब्लू टिक पुन्हा मिळाल्यानंतर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. एक उपरोधिक ट्वीट करीत त्यांनी म्हटले की, “मी ट्विटर ब्लू सेवा विकत घेतलेली नाही किंवा माझा मोबाइल नंबर दिलेला नाही. मस्क तुम्ही माझेही पैसे भरत आहात का,” असा सवाल ओमर अब्दुल्ला यांनी विचारला.

माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार ज्या लोकांचे एक दशलक्षाहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत, त्यांना ट्विटरने पुन्हा एकदा ब्लू टिक प्रदान केली आहे. पण रायन रेनॉल्ड यांना ट्विटरवर २१.३ दशलक्ष सबस्क्राइबर्स असूनदेखील त्यांचे ट्विटर हॅण्डल व्हेरिफाइड करण्यात आलेले नाही. अभिनेते अमिताभ बच्चन यांनीदेखील ट्विटरच्या या गोंधळावर आश्चर्य व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्विटर ब्लूसाठी पैसे भरले होते. त्यानंतर त्यांना कळले की, एक दशलक्षहून अधिक फॉलोअर्स असलेल्या युजर्सना ब्लू टिक पुन्हा मोफत दिली गेली आहे.

काल अमिताभ बच्चन यांनी अवधी बोलीभाषेत एक खुमासदार ट्वीट करीत एलॉन मस्क यांना डिवचले. त्यांनी लिहिले की, “अरे मारे गये गुलफाम, बिरज में मारे गये गुलफाम, ए! Twitter मौसी, चाची, बहनी, ताई, बुआ… झौआ भर के त नाम हैं तुम्हार! पैसे भरवा लियो हमार, नील कमल ख़ातिर
अब कहत हो जेकर 1 m follower उनकर नील कमल free म हमार तो 48.4 m हैं, अब?? खेल खतम, पैसा हजम?”

मृत व्यक्तींनाही ब्लू टिक कसे काय?

ब्लू टिक पुन्हा देत असताना ट्विटरने आणखी एक मोठा गोंधळ घालून ठेवला आहे. निधन पावलेल्या सेलेब्रिटींच्या ट्विटर खात्याला पुन्हा एकदा ब्लू टिक देण्यात आली आहे. त्यामुळे या अकाऊंटसाठी कोण पैसे भरणार, असा एक संभ्रम निर्माण झाला आहे. सेलेब्रिटी शेफ अन्थॉनी बॉर्डेन (Anthony Bourdain) यांचे २०१८ साली निधन झाले आहे, तसेच बास्केटबॉलपटू कोब ब्रायंट यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत २०२० साली निधन झाले. त्यांच्याही ट्विटर खात्याला ब्लू टिक प्रदान करण्यात आली. याचप्रमाणे पॉप स्टार मायकल जॅक्सन, ज्येष्ठ फुटबॉल खेळाडू पेले, क्रिकेटपटू शेन वॉर्न आणि अभिनेते चॅडविक बोसमन यांनाही ब्लू टिक पुन्हा मिळाली आहे.

एवढेच नाही तर पत्रकार जमाल खाशोग्गी (Jamal Khashoggi) आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांची नुकतीच हत्या करण्यात आली. त्यांचेही ट्विटर अकाऊंट व्हेरिफाइड करण्यात आले आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार यांच्यापैकी एकही ट्विटर अकाऊंट सक्रिय नाही. भारतातही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत, ऋषी कपूर आणि इरफान खान, गायिका लता मंगेशकर यांचे ट्विटर खाते व्हेरिफाइड करण्यात आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, निधन पावलेल्या लोकांचे व्हेरिफाइड बॅज परत देत असताना तिथे एक संदेशही दाखवला जात आहे. “संबंधित खात्याने ट्विटर ब्लू सबस्क्राइब केल्यामुळे आणि त्यांचा फोन नंबर व्हेरिफाइड केल्यानंतर सदर खाते व्हेरिफाइड करण्यात आले आहे.” जर त्या व्यक्तीचे निधन झाले आहे, तर ट्विटर ब्लू कसे काय सबस्क्राइब करणार याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळाली.

ब्लू टिकवर बहिष्कार!

ट्विटरने ब्लू टिकबाबत धरसोड धोरण स्वीकारल्यामुळे अनेक सेलेब्रिटींनी संताप व्यक्त केला आहे. अमेरिकन मॉडेल क्रिसी टायगेन यांनी ट्विटर ब्लू टिकला “बॅज ऑफ शेम” म्हटले. काही जणांनी ट्विटरवर ‘ब्लॉक द ब्लू’ ही मोहीम चालवली.
ब्लू टिकवरून झालेल्या गोंधळानंतर ट्विटरने अद्याप भूमिका व्यक्त केलेली नाही. त्यामुळे गोंधळात आणखीच भर पडली. ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर २०२२ मध्ये कंपनीने संवाद विभागातील कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. ज्यामुळे ट्वीट वापरकर्त्यांच्या शंकांना उत्तर देणे बंद झाले.

Story img Loader