देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह २३ ऑगस्टपासून चार दिवसीय अमेरिका दौर्यावर होते. या दौर्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षर्या करण्यात आल्या. हे दोन्ही करार पुरवठा केल्या जाणार्या वस्तूंना प्राधान्य आणि संपर्क अधिकार्याच्या कामकाजासंदर्भात आहेत. आजपर्यंत दोन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण द्विपक्षीय लष्करी करार होत आले आहेत; ज्यांनी गेल्या दशकात दोन्ही देशांमधील संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य बळकट केले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या अधिकृत भेटीदरम्यान, भागीदार राष्ट्रांनी ‘२०२३ यूएस-इंडिया रोडमॅप’अंतर्गत जेट इंजिन, मानवरहित फलाट, युद्धसामग्री व ग्राउंड मोबिलिटी सिस्टीमसह प्राधान्य सह-उत्पादन प्रकल्पांना पुढे नेण्यास सहमती दर्शविली. काय आहेत हे करार? या करारांचा भारताला काय फायदा होणार? याविषयी जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा