दोन दिवसांपूर्वी झालेल्या शिवसेनेच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी गारदींचा उल्लेख केले होता. भाजप आणि एकनाथ शिंदे यांना उद्देशून त्यांनी गारदी हा शब्दप्रयोग केला. परंतु, हे गारदी कोण होते? त्यांचा आणि पेशव्यांचा संबंध काय? गारदींचा इतिहास काय आहे, हे जाणून घेणे रंजक ठरेल.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी ‘गारदीं’चा उल्लेख केला. ”आज आपल्या सभेला शिवसैनिकांची गर्दी झाली आहे आणि मुंबईच्या एका कोपऱ्यात गारदी जमले आहेत. गारदी शब्दाचा अर्थ माहीत आहे का? गारदी म्हटल्यावर राघोबादादा, नारायणराव सगळे आठवतात. गारदी शब्दाचा अर्थ असा आहे की, पेशवे काळात गोंधळ घालण्यासाठी, वसुली करण्यासाठी अशा काही गारद्यांची टोळी तिकडे जमली आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर टीका केली.

Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
uddhav thackeray loksatta news
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊत यांनी मांडली भूमिका
Walmik Karad, Dhananjay Munde
“फरार असताना वाल्मिक कराडने संपत्तीचं…”, ठाकरे गटाला वेगळाच संशय; धनंजय मुंडेंचा उल्लेख करत म्हणाले…
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”

गारदी म्हणजे काय?

मोल्सवर्थ शब्दकोशामध्ये गारदी या शब्दाचा अर्थ पुढीलप्रमाणे दिलेला आहे.
गारदी gāradī m A foot-soldier & c. its derivative signifies Insurrectionary tumult amongst such soldiers; and, hence, tumult, confusion, uproar, more generally: also dense and clamorous crowding; wild pressing and thronging: also laxly, ruin, disorder, damage, spoiledness;
गारदी म्हणजे अव्यवस्था, नुकसान, त्रासदायक, तसेच सैनिक असा या शब्दाचा अर्थ होतो.
गारदीचा अपभ्रंश असणारा गाडदी हा शब्द. याचाही अर्थ मोल्सवर्थ शब्दकोशात दिलेला आहे.
गाडदी gāḍadī m (Guardá. Port. The word, however, is found in the oldest records, and is not viewed as foreign.) A soldier, an infantry-soldier, esp. a soldier employed about the person of the Peshwá or of other Rájá; a guardsman or guard. More frequently understood of Musalmans… गाडदी म्हणजेही सैनिक, पेशवे यांचा सैनिक, मुस्लीम लोकांमध्ये अधिक वावर असणारी व्यक्ती.
यशवंत दाते आणि चिंतामण कर्वे यांच्या महाराष्ट्र शब्दकोशात गारदी हा शब्द विध्वंसक अर्थी आलेला दिसतो. गारदी—(पु.) ते गारदी निष्ठुर, त्यांजला दया कोठून? इच्छारामपंत गाईच्या आड पडला असतां, गाई- सुद्धां गारद्यांनीं इच्छारामपंतास ठार केलें.’ -पेब ९१. गार- दाई-स्त्री. १ गाडद्यांचा दंगा, बंड. २ (ल.) गोंधळ; दंगा; गलगा; गर्दी; धिंगामस्ती. ३ नाश; नुकसान; खराबा; बिघाड. ‘धनाची मालाची, संसाराची गारदाई.’
यामध्येही गारदी आणि गाडदी या शब्दांचे अर्थ नुकसान, लढाई या अर्थी आलेले दिसतात.

हेही वाचा : विश्लेषण : प्राचीन काळी पृथ्वीवर १९ तासांचा दिवस होता ? काय सांगते नवीन संशोधन

गारदी कोण होते?

मराठा किंवा निझाम असे शासक एक विशेष फौज बाळगून असत. ही फौज जे गुंडगिरी, लुटमारी आणि युद्धात कामी येत असे. उत्तर भारतात ‘पेंढारी’ आणि दक्षिणेकडे ‘गारदी’ प्रसिद्ध होते. ‘पेंढारी’ नावाची एक जमात त्या वेळी पेशवे, होळकर, शिंदे या शासकांकडे होतीच. परंतु, पेशव्यांकडे गारदी नावाची अजून एक जमात होती. कधी कधी हे गारदी शत्रूवर हल्ला न करता ते शत्रूच्या प्रदेशात धुडगूस घालत. गोंधळ माजवत. त्यांची रसद लुटत. लोकांना त्रास देत. कारण, पेशव्यांनी असा नियम केला की, स्वारीने पैसा स्वारीतूनच उभा करावा व आपली गरज भागवावी. पर्यायाने मग ही लुटालूट सुरू झाली.
काही गारदी युरोपीय पद्धतीने कवायत शिकलेले होते. त्यामुळे उत्तरोत्तर त्यांचे महत्त्व वाढतच गेले. गारदी लोक मध्य प्रदेश , महाराष्ट्र, कर्नाटक आणि निझामच्या प्रदेशातून आले. मराठ्यांच्या मध्ये पहिल्या बाजीरावानंतर इंदौरचे होळकर ग्वाल्हेरचे शिंदे, नागपूरचे भोसले, धारचे पवार, बडोद्याचे गायकवाड़ यामध्ये संघर्ष चालू झाला आणि कोणत्याही मराठा सैनिकाला नोकरीला घेण्याअगोदर त्याची जात, कूळ आणि गाव विचारू लागले. त्यामुळे मराठी सैनिकांना नोकरीसाठी आपल्या सरदाराकडे जाणेच गरजेचे झाले. थोरल्या बाजीरावानंतर पेशव्यांनी ज्या ज्या मोहीम काढल्या, त्याला खर्च अपार झाला. त्यात शाहू महाराजांनी सांगितले की, मोहिमेचा खर्च परस्पर काढा. त्यामुळे या गारदीचे महत्त्व वाढले .युरोपियनांची कवायत फौज पाहून महादजी शिंदे यांच्या मनांत अशी फौज तयार करण्याचे आले. त्यांनी फ्रेंच सेनापती डिबॉइन याच्या मदतीने फौज तयार केली .
काहींच्या मते गारदी हे राजस्थानातल्या एका जातीचे नाव आहे. काही जण म्हणतात की, तापी नदीच्या दक्षिणेकडे आजच्या तेलंगण राज्यापर्यंत असलेल्या भूभागात राहणाऱ्या काही विशिष्ट समुदायांतले लोक म्हणजे गारदी.

हेही वाचा : स्त्रियांची भाषा म्हणजे काय ? ‘स्त्री’चे भाषिक योगदान

गारदींचे इतिहासातील संदर्भ

इब्राहिम खान गारदीने केलेल्या पराक्रमामुळे पुढे शनिवार वाड्याची जबाबदारी गारदींकडेच दिली .परंतु, गारदी जास्त पैसे देत तिकडे जायचे. त्यामुळे सुमेरसिंग, मोहम्मद इसाफ यांनी नारायणराव पेशवे यांचा खून जास्त पैसा घेऊन केला. गारदी लोकांनी अनेक वेळा पगारासाठी पेशव्यांबरोबर किती भांडणे केली आहेत, याचे उल्लेख असणारी पेशवेंच्याच्या दफ्तरात अनेक दस्तावेज उपलब्ध आहेत.

२९ ऑक्टोबर, १७५९ ला सदाशिवभाऊ यांचा मुक्काम गारपीराजवळ म्हणजे ससून रुग्णालयाजवळ असताना एका गारदीने त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. पण ते काही कारणास्तव खाली वाकले असल्यामुळे त्यांचा जीव वाचला. एका मराठा सरदाराने त्या हल्लेखोराला पकडले. निजामानेच पेशव्यांकडे असणाऱ्या एका गारदीला अधिक पैसे देऊन भाऊसाहेबांना मारण्याची सुपारी दिली.
इंग्रज या देशात आले, त्या वेळी इंग्रजांनी हिंदुस्थानात, अ‍ॅडॅम स्मिथच्या विचाराप्रमाणे, कोणत्याही सुधारणा आणण्यापूर्वी प्रथमत: कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. भारतात त्या वेळी गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा म्हणजे गारदी , पेंढारी आणि ठग यांचाच कारभार चालू होता आणि त्याखेरीज, इतर अनेक संस्थानिकसुद्धा असे पेंढारी व ठग पदरी बाळगून त्यांच्याकडून लूटमार करवून त्या मिळकतीवर जगत असत. इंग्रजांनी येथे आल्यावर सर्वप्रथम पेंढारी आणि ठग यांचा बंदोबस्त केला. यामुळे जंगलांच्या उत्पन्नावर जगणाऱ्या आदिवासी समाजात फार मोठा रोष तयार झाला आणि त्यांनी पहिल्यांदा इंग्रज सरकारविरोधात बंड उभे केले. १८५७ च्या बंडात याच लोकांचा विशेष सहभाग होता .

गारद आणि गारदी

गारदीपासून ‘गारद’ किंवा ‘गारत होणे’ असा शब्दप्रयोग तयार झाला की, ‘गारत/द’ पासून ‘गारदी’ हे नक्की सांगता येणार नाही. नष्ट होणे, बुडणे, गाडले जाणे, बिघडणे अशा विविध अर्थांनी आपण तो वापरतो. जोशी-गोरेकर यांच्या उर्दू-मराठी शब्दकोशानुसार ‘ग़ारत’ हा शब्द मूळचा अरेबिक भाषेतला आहे. त्याला ‘गर’ हा फारसी प्रत्यय जोडला तर लुटारू, विध्वंसक, दरोडेखोर असा अर्थ होतो.

इब्राहिम गारदी

इब्राहिम खान गारदी हा हैदराबादच्या निजामाच्या सेवेत होता. तुकडीचे नेतृत्व असल्याने त्याने खान या नावाची पदवी धारण केली होती. मराठ्यांनी त्याची उपयुक्तता पाहून आपल्या बाजूला वळवले. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत इब्राहिम खान गारदीने गारद्यांच्या तुकडीचे नेतृत्व केले. ह्या तुकडीने फ्रेंच सैन्याकडून प्रशिक्षण व हत्यारे घेतली होती. १७५० च्या दशकात मराठा सैन्याचे अतिशय प्रबळ सैन्यात रूपांतर होण्यात या तुकडीचा मोठा वाटा होता. हे सैनिक त्यांच्या प्रशिक्षण व हत्यारांमुळे युरोपीय सैन्यासाठी देशी मस्केटियर्स होते. गारद्यांची हल्ला पद्धती ही ब्रिटिश अथवा फ्रेंच सैनिकांप्रमाणे होती. पुढे जाणाऱ्या पायदळामागून धडाडणाऱ्या तोफांचे संरक्षण मिळे. जेव्हा पायदळ सेना शत्रूजवळ पोहोचे तेव्हा तोफा थांबून पायदळ बंदूकीने हल्ला करत. जेव्हा समोरची फौज एकदम जवळ येई त्या वेळेस तलवार, भाला या पारंपरिक शस्त्रांनी शत्रूवर हल्ला चढवण्यात येई. गोलाची लढाई करण्यात गारदींचे सैन्य निपुण होते.

उद्धव ठाकरे यांनी गारदी असा फक्त उल्लेख केला असला तरी या शब्दाला विस्तृत इतिहास आहे.

Story img Loader