२०२४ हे निवडणुकांचे वर्ष आहे. भारतातील सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. दक्षिण आफ्रिकेमध्येही निवडणूक झाली. आता अमेरिका आणि ब्रिटनमध्येही सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सध्या ब्रिटनमध्ये हुजूर पक्षाची सत्ता असली तरी वारे मात्र मजूर पक्षाच्या बाजूने वाहताना दिसत आहेत. मतदानपूर्व सर्व चाचण्यांचे कल हे मजूर पक्षाच्या बाजूनेच दिसत आहेत. त्यामुळे ब्रिटनमधील ही निवडणूक सत्ताबदलाची नांदी ठरेल, असे म्हटले जात आहे. सहा आठवड्यांपूर्वी ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आपला कार्यकाळ संपण्यापूर्वीच निवडणुकीची घोषणा केली होती. कदाचित देशातील वारे आपल्याविरोधात वाहत आहेत, याची जाणीव झाल्यानेच त्यांनी आणि त्यांच्या सरकारने हा निर्णय घेतला असावा. आज (४ जुलै) या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. अर्थातच, ४ जुलै हा गुरुवार आहे आणि कित्येक वर्षांपासून ब्रिटनमधील निवडणुका या गुरुवारीच पार पडतात. ही थोडी रंजक बाब आहे. त्यामुळे ब्रिटनमधील निवडणूक गुरुवारीच का घेतली जाते? ते आपण जाणून घेऊ.

हेही वाचा : ब्रिटनमध्ये मजूर पक्ष सत्तेवर आल्यास भारत-ब्रिटन मुक्त कराराचे काय होणार?

mumbai This election polling stations increased and started in housing societies to avoid evening crowding
साडेसहाशे गृहनिर्माण संस्थांमध्ये होणार मतदान, मुंबईत प्रथमच मोठ्या स्तरावर प्रयोग, मतदान वाढण्याची अपेक्षा
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
मुख्यमंत्री येती शहरा, आधी रस्ते दुरुस्त करा; अंबरनाथमधील खड्ड्यांपासून खाचखळगे तातडीने दुरुस्ती
Pune Voting Free Petrol, Pune Voting, Petrol,
पुणेकरांनो मतदान करा अन् मोफत पेट्रोलसोबत बरंच काही मिळवा! विविध संघटनांकडून मतदान वाढविण्यासाठी पाऊल
Vidhan Sabha Elections, Elections Pune City,
विचार करण्याची हीच ती वेळ…
suspension of recruitment in Chandrapur district bank due to Congress raise issue of recruitment in campaign
नोकरभरतीचा मुद्दा प्रचारात आणणारा काँग्रेस पक्ष तोंडघशी, चंद्रपूर जिल्हा बँकेतील नोकरभरतीला स्थगिती
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!
Konkan has been left behind due to electing the wrong people till date says Raj Thackeray
चुकीची माणसं आजपर्यंत निवडून दिल्याने कोकण मागे पडले – राज ठाकरे

गेल्या ८९ वर्षांपासून गुरुवारीच होते मतदान

ब्रिटनमधील निवडणुकीचे मतदान गुरुवारीच व्हावे, याबाबत कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. मात्र, आठ दशकांपासून गुरुवारीच मतदान घेण्याबाबतचा संकेत अविरतपणे पाळला जात आहे. सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान असो, पोटनिवडणूक असो वा स्थानिक निवडणुका असो, ब्रिटनमधील सगळ्या प्रकारच्या निवडणुकांचे मतदान गुरुवारीच पार पडते. १९३५ साली पहिल्यांदा गुरुवारी मतदान झाले होते आणि तेव्हापासून ब्रिटनमधील निवडणुकीचे मतदान नेहमी गुरुवारीच घेतले जाते, अशी माहिती ‘इंडिपेंडन्ट’ने दिली आहे. ‘फिक्स्ड-टर्म पार्लमेंट्स अॅक्ट्स २०११’मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, सार्वत्रिक निवडणुका साधारणपणे दर पाच वर्षांनी एकदा मे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी घेतल्या पाहिजेत. मात्र, आजवर असे घडलेले नाही. निवडणुकीच्या मतदानाचा दिवस पुढे-मागे झालेला आहे. उदाहरणार्थ, या वर्षी होत असलेल्या निवडणुकीचे मतदान जुलै महिन्यात होत आहे. मागील निवडणूक १२ डिसेंबर २०१९ रोजी झाली होती. २०१७ मधील सार्वत्रिक निवडणूक ८ जून रोजी पार पडली होती. मे महिन्यात पार पडलेली शेवटची निवडणूक ही २०१५ साली झाली होती. त्यावेळी मतदानाचा दिवस ७ मे होता. मात्र, या सगळ्याच निवडणुका गुरुवारी पार पडल्या होत्या, हे विशेष!

पण, गुरुवारीच का?

खरे तर यामागे काहीच विशेष असे कारण नाही. ही एक प्रथा झाली आहे. सध्या संकेत म्हणून प्रत्येक निवडणुकीचे मतदान गुरुवारीच घेतले जाते. मात्र, तरीही यामागे काही सिद्धांत असल्याचे बोलले जाते. काहींचे असे मत आहे की, शुक्रवार हा पारंपरिकरीत्या पगाराचा दिवस असल्याने तो मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यास अयोग्य मानला जात होता. बीबीसीने असे वृत्त दिले आहे की, या दिवशी लोक निवांत असतात, मित्र-मैत्रिणींबरोबर वेळ घालवतात. थोडक्यात, हा दिवस प्रत्येकाच्या विश्रांतीचा असतो. रविवारी ब्रिटनमधील बहुतांश लोक चर्चमध्ये जातात. तिथे गेल्यावर जे ऐकायला मिळेल, त्यामुळे लोक प्रभावित होऊ शकतात, असाही एक मतप्रवाह असल्याने ब्रिटनमध्ये रविवारी मतदान घेतले जात नाही, असे म्हटले जाते. मात्र, आठवड्यातील कामाच्या दिवशीच मतदान घेतले, तर बहुतांश लोक मतदानाला प्राधान्य देतील, असे म्हटले जाते. पूर्वी ब्रिटनमधील अनेक शहरे आणि गावांमध्ये गुरुवार हा पारंपरिकपणे बाजाराचा दिवस मानला जात असे. त्यामुळे बाजारासाठी गेलेले नागरिक बाजारपेठेच्या मार्गावरच असलेल्या मतदान केंद्रावरही सहज जाऊ शकतील आणि मतदान करू शकतील, असा होरा यामागे होता. याच उद्देशाने गुरुवारी मतदान घेतले जाते, असेही म्हटले जाते. गुरुवारी मतदान पार पडल्यानंतर त्याचे निकाल सामान्यत: शुक्रवारी सकाळी जाहीर होतात. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी सत्तेचे हस्तांतरण अत्यंत सुरळीतपणे होऊ शकते. पंतप्रधानांनाही आपले मंत्रिमंडळ निवडण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि मग ते सोमवारी सकाळी ‘डाऊनिंग स्ट्रीट’वरून त्याची घोषणा करू शकतात, अशी माहिती ‘इंडिपेंडन्ट’ने दिली आहे.

हेही वाचा : ऋषी सुनक यांच्यासमोरील आव्हान मोठे! ब्रिटनच्या निवडणुकीत भारतीयांची मते का महत्त्वाची ठरतील?

प्रथेत बदल करण्याची मागणी

इतर अनेक देशांमध्ये निवडणुकीचे मतदान शक्यतो आठवड्याच्या शेवटी घेण्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे ब्रिटनमध्येही याच प्रकारे आठवड्याच्या शेवटी मतदान घेतले जावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. एडिनबर्ग विद्यापीठातील प्रोफेसर आयल्सा हेंडरसन यांनी ‘बीबीसी’शी बोलताना म्हटलेय की, आठवड्याच्या शेवटी मतदान घेतल्यास मतदानाचा टक्का आणखी वाढण्यास मदत होईल. मात्र, याआधी अशी टीका झाली होती की, शनिवार व रविवारी मतदान घेतल्यास निवडणूक कर्मचाऱ्यांना ‘ओव्हरटाइम’चा अतिरिक्त खर्च द्यावा लागेल.

‘गुरुवार’ला अपवाद

गेल्या ८९ वर्षांपासून, ब्रिटनमधील निवडणुकीचे मतदान गुरुवारीच घेतले जाते. मात्र, या प्रथेला १९७८ हे वर्ष अपवाद ठरले होते. हॅमिल्टन या स्कॉटिश शहरामधील पोटनिवडणूक बुधवारी घेण्यात आली होती. कारण- त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी अर्जेंटिना येथे १९७८ चा फुटबॉल विश्वचषकातील सामना सुरू होणार होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला, असे वृत्त बीबीसीने दिले आहे. मात्र, ऑक्टोबर १९३१ मध्ये झालेली सार्वत्रिक निवडणूक गुरुवारी झालेली नव्हती. हा एकमेव असा अपवाद होता; ज्याला काही विशेष कारणही नव्हते.