ब्रिटीश अधिकाऱ्यांनी पॅडिंग्टन बेअर या प्रिय पेरुव्हियन पात्राला पासपोर्ट जारी केला आहे. कापसाने भरलेल्या प्राण्यांच्या बाहुल्या तयार करणारे मॉरिस मिश्टम यांनी पेपरातल्या एका व्यंगचित्रावरून प्रेरणा घेऊन कापूस भरलेले अस्वलाचे पिल्लू तयार केले; ज्याला नंतर टेडी बेअर म्हणून संबोधले जाऊ लागले. त्यावर अनेक चित्रपटही आले आहेत. पॅडिंग्टन बेअर या चित्रपटातील टेडी बेअर पेरुव्हियन लोकांमध्ये लोकप्रिय आहे. सोमवारी प्रकाशित झालेल्या रेडिओ टाईम्स मासिकाला दिलेल्या मुलाखतीत, पेरूमधील पॅडिंग्टन बेअर या आगामी चित्रपटाचे सह-निर्माते रॉब सिल्वा यांनी ब्रिटीश पासपोर्टविषयीची माहिती दिली. पण, या काल्पनिक पात्राला ब्रिटीश पासपोर्ट का दिला गेला? नेमके हे प्रकरण काय? त्याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पॅडिंग्टन बेअरसाठी खरा पासपोर्ट

पॅडिंग्टन बेअर या चित्रपट निर्मात्यांनी अस्वलासाठी पासपोर्टची मागणी केली होती, ज्याचा वापर त्यांना पेरूमधील पॅडिंग्टनमध्ये चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करायचा होता. लोकप्रिय पॅडिंग्टन बेअर चित्रपटाच्या तिसर्‍या भागात पॅडिंग्टन बेअरचे पात्र, त्याची आंटी लुसीला भेटण्यासाठी पेरूला घरी परतते. सिल्वा यांनी रेडिओ टाईम्सला सांगितले की, त्यांनी पासपोर्टच्या प्रतिकृतीची विनंती केली होती, मात्र त्याऐवजी त्यांना अधिकृत प्रतिकृती प्रदान करण्यात आली. “आम्ही ब्रिटीश सरकारमधील गृह कार्यालयाला पत्र लिहून विचारले होते की, आम्हाला पासपोर्टची प्रतिकृती मिळेल का आणि आता त्यांनी पॅडिंग्टन बेअरला अधिकृत पासपोर्ट दिला आहे,” असे रॉब सिल्वा पॅडिंग्टनच्या फोटोसह पासपोर्ट दाखवताना म्हणाले. ‘बीबीसी’ला गृह कार्यालयाकडून माहिती देण्यात आली होती की, हे कागदपत्र केवळ एक नमुना आहे आणि प्रत्यक्षात त्याचा वापर केला जाऊ शकत नाही.

पॅडिंग्टन बेअर या चित्रपट निर्मात्यांनी अस्वलासाठी पासपोर्टची मागणी केली होती, ज्याचा वापर त्यांना पेरूमधील पॅडिंग्टनमध्ये चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करायचा होता. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : कोकेन पिझ्झा तुम्हाला माहितेय का? काय आहे नेमकं प्रकरण? का झाली कारवाई?

h

भूतकाळात अशी उदाहरणे आहेत, जेव्हा पॅडिंग्टन बेअर ब्रिटनच्या गृह कार्यालयात पोहोचले. ‘द इंडिपेंडंट’च्या म्हणण्यानुसार, कंझर्व्हेटिव्ह सरकारच्या वादग्रस्त योजनेचा भाग म्हणून रवांडा येथे निर्वासितांना पाठवल्याच्या निषेधार्थ कर्मचारी सदस्यांनी २०२२ मध्ये गृह कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर काल्पनिक अस्वलाच्या हद्दपारीचे आदेश प्रदर्शित केले होते.

पॅडिंग्टन बेअरचे महत्त्व

१९५८ मध्ये दिवंगत मुलांसाठी लिहिणारे लेखक मायकेल बॉन्ड यांची लघुकथा ‘A Bear Coled Paddington’ मध्ये छापण्यात आलेल्या व्यंगचित्रापासून पॅडिंग्टन बेअर ब्रिटीश मुलांच्या प्रत्येक पिढीसाठी भावनिक विषय आहे. बॉन्डला हे पात्र तयार करण्याची प्रेरणा रेल्वेस्थानकांवर आलेल्या युद्धकाळातील निर्वासितांच्या व्हिडीओतून मिळाली. या व्हडिओत पॅडिंग्टन रेल्वेस्थानकावर सापडलेल्या अस्वलाच्या गळ्यात ‘कृपया या अस्वलाकडे लक्ष द्या’ असे लिहिलेले होते. त्यानंतर घरोघरी या टेडी बेअरला प्रसिद्धी मिळाली. पुस्तके, चित्रपट, दूरदर्शन मालिकांमधून असंख्य पिढ्यांतील ब्रिटीश मुलांमध्ये याची लोकप्रियता वाढली. शांतपणे बोलणारे हे अस्वल २० व्या शतकात ब्रिटिशत्वाचे प्रतीक ठरले.

राणी एलिझाबेथ द्वितीय दीर्घकाळापासून पॅडिंग्टन बेअरशी जोडलेल्या होत्या. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : पुण्यात तयार होतंय क्लाऊड चेंबर, हे कशासाठी असतं?

१९९४ मध्ये जेव्हा चॅनेल टनेलच्या दोन बाजूंचे बांधकाम पूर्ण झाले, तेव्हा ब्रिटिशांकडून फ्रेंच बांधकाम कामगारांना हस्तांतरित केलेली पहिली वस्तू पॅडिंग्टन टेडी होती, असे ‘न्यू स्टेट्समन’मध्ये सांगण्यात आले आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय दीर्घकाळापासून पॅडिंग्टन बेअरशी जोडलेल्या होत्या. जून २०२२ मध्ये राणींच्या प्लॅटिनम ज्युबिलीसाठी तयार केलेल्या पॅडिंग्टन बेअरच्या चित्राने अनेकांचे लक्ष वेधले. चित्रपटातील काही भागांमध्ये राणी आणि अस्वल यांचे एकत्र पात्र दाखवण्यात आले आहे. ८ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांचे निधन झाले, तेव्हा शोक व्यक्त करणाऱ्यांनी पॅडिंग्टन बेअरची खेळणी बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर ठेवली, त्यामुळे ब्रिटनमध्ये पॅडिंग्टन बेअरला खूप महत्त्व आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uk has granted paddington bear a real passport rac