अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाच्या हद्दीत अमेरिकेची शस्त्रास्त्रे वापरण्यास युक्रेनवर असलेले निर्बंध अलिकडेच शिथिल केले. यामुळे युक्रेनच्या युद्धप्रयत्नांना अधिक बळ मिळाल्याचे मानले जात असतानाच आता रशिया अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या बदललेल्या धोरणामुळे युरोपात दोन वर्षांपेक्षा अधिक काळ चाललेल्या युद्धाचे चित्र बदलेल का, यामुळे ‘नेटो’ राष्ट्रगट अधिक आक्रमक होण्याची शक्यता किती, बायडेन यांच्या या भूमिकेवर रशियाची प्रतिक्रिया काय असेल, याचा धांडोळा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमेरिकेच्या निर्णयामागील कारण काय?
आतापर्यंत युक्रेनला रशियाच्या हद्दीत अमेरिकेची अस्त्रे वापरण्यास बंदी होती. मात्र गेल्या काही आठवड्यांत ईशान्य युक्रेनमधील खारकीव्हमध्ये रशियाने हल्ले वाढविले आहेत. हे युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असून रशियाच्या सीमेपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर आहे. रशियातून होणारे हल्ले रोखण्यासाठी तेथील लष्करी आस्थापना मोडीत काढणे आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर ‘नेटो’ परराष्ट्रमंत्र्यांच्या प्रागमध्ये झालेल्या अनौपचारिक बैठकीनंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन महत्त्वाची घोषणा केली. अमेरिकेने दिलेली शस्त्रे वापरण्यासाठी युक्रेनवर असलेल्या बंदीमध्ये बायडेन यांनी अंशत: सूट दिल्याचे त्यांनी जाहीर केले. यामुळे युक्रेन-रशिया युद्धात अमेरिकेच्या धोरणात मोठा बदल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बायडेन प्रशासनाने युक्रेनच्या शस्त्रास्त्र पुरवठा धोरण शिथिल करण्याची ही या वर्षातील दुसरी वेळ आहे. वर्षाच्या सुरुवातीला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे युक्रेनला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
हेही वाचा >>>विश्लेषण: हवामान अंदाज वर्तवणाऱ्यांसाठी परवाने लागू करावेत का?
यावर रशियाची प्रतिक्रिया काय?
अर्थातच अमेरिकेच्या या निर्णयावर रशियामधून संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. “युक्रेनच्या पाश्चात्य मित्र राष्ट्रांनी धोरण बदलल्यास आणि युक्रेनला अधिक मुक्तहस्त दिल्यास गंभीर परिणाम होतील,” असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला. यावेळीही ते आपल्या आण्विक सामर्थ्याचा उल्लेख करण्यास विसरले नाहीत. कनिष्ठ सभागृहाच्या संरक्षण समितीचे प्रमुख आंद्रेई कार्तपोलोव्ह यांनी अमेरिकेच्या शस्त्रांचा रशियात वापर झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिल्याचे रशियातील ‘आरआयए नोवोस्ती’ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. वरिष्ठ रशियन सुरक्षा अधिकारी दिमित्री मेदवेदेव यांनीही धोरणात्मक अण्वस्त्रांचा युक्रेनविरुद्ध वापर करण्याचा रशियाचा इशारा ही पोकळ धमकी नसल्याचे म्हटले आहे.
अन्य ‘नेटो’ राष्ट्रांची भूमिका काय?
अमेरिकेने युक्रेनला अधिक मोकळीक दिल्यानंतर आता युरोपातील ‘नेटो’ची अन्य बडी राष्ट्रेही हाच कित्ता गिरविण्याची शक्यता आहे. फ्रान्सने युक्रेनला रशियामधील लष्करी लक्ष्यांवर आपली शस्त्रे वापरण्याची परवानगी देण्याबाबत संकेत दिले आहेत. जर्मनीनेही पाश्चात्य देशांकडून मिळालेली शस्त्रे रशियाच्या सीमेतील सैन्यावर हल्ला करण्यासाठी वापरली जाऊ शकतील, असे सुचविले आहे. खारकीव्हमध्ये रशियातून हल्ले सुरू झाल्यानंतर यासंदर्भात मित्रराष्ट्रांशी चर्चा केल्याचे जर्मन सरकारच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. युक्रेनला हल्ल्यांपासून स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार असून आंतरराष्ट्रीय कायद्याने तशी हमी दिल्याचे या प्रवक्त्याने म्हटले आहे. ‘नेटो’चे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग यांनीही युक्रेनच्या नागरिकांना स्वतःचा बचाव करण्यास सक्षम करण्याची वेळ आली आहे, असे आली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा >>>विश्लेषण : ‘३५० पार’साठी भाजपला यंदा दक्षिणेचा हात? एक राज्य वगळता अन्यत्र लाभच?
बदललेल्या धोरणाचा परिणाम काय?
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेसह ‘नेटो’ सदस्यांच्या बदललेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे. खारकीव्हवर रशियाच्या क्षेपणास्त्रांचे हल्ले वाढले असून अलिकडेच काही सर्वसामान्य नागरिकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे युक्रेनने पाश्चिमात्य देशांनी दिलेली लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे रशियाच्या सीमेत डागण्यास परवानगी मागितली होती. आता मर्यादित स्वरूपात ही विनंती मान्य झाल्याने युक्रेनला दिलासा मिळणार आहे. युक्रेन लष्कराने देशांतर्गत बनावटीची ड्रोन आणि शस्त्रांचा वापर रशियातील लष्करी आस्थापनांवर यापूर्वीही केला आहे. अलिकडेच क्रॅस्नोडार येथील रशियाचे रडार ड्रोन हल्ल्याने नष्ट करण्यात आले होते. हे ठिकाण रशियाच्या सीमेत बरेच आतपर्यंत आहे. मात्र युक्रेनकडे स्वनिर्मित ड्रोन, क्षेपणास्त्रे यांचा साठा मर्यादित असल्याने अशा प्रतिहल्ल्यांवर मर्यादा होता. आता मित्रराष्ट्रांनी निर्बंध शिथिल केल्यामुळे रशियाच्या सीमेतील संभाव्य धोके हेरून नष्ट करणे युक्रेनला शक्य होणार आहे. युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासूनच पुतिन आणि रशियाचे लष्कर अण्वस्त्रांची धमकी देत आहेत. ही धमकी खरी होणे जवळपास अशक्य असले, तरी अमेरिकेच्या नव्या धोरणाचे निमित्त करून पुतिन युक्रेनवरील हल्ल्यांची तीव्रता अधिक वाढविण्याची मात्र भीती आहे.
amol.paranjpe@expressindia.com