रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलण्याची शक्यता वाढली आहे. नुकतेच काही अहवाल समोर आले आहेत, ज्यात नमूद आहे की, युक्रेनने पश्चिमेकडून पाठिंबा गमावल्यास काही महिन्यांत युक्रेनमध्ये आण्विक उपकरण विकसित केले जाऊ शकते. जर्मन प्रकाशन ‘बाइल्ड’ला शस्त्रास्त्र खरेदीमध्ये तज्ज्ञ असलेल्या एका वरिष्ठ युक्रेनियन अधिकाऱ्याने सांगितले, “आमच्याकडे साहित्य आहे, आमच्याकडे ज्ञान आहे. जर सूचना मिळाली, तर आम्हाला पहिला बॉम्ब तयार करण्यासाठी काही आठवडे लागतील.” युक्रेनचे अध्यक्षीय संप्रेषण सल्लागार दिमित्रो लिटवीन यांनी हे दावे फेटाळून लावले आणि ही केवळ रशियाकडून पसरवण्यात येणारी अफवा आहे, असा त्याचा उल्लेख केला. मात्र, या दाव्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात. खरंच युक्रेन अणुबॉम्ब तयार करत आहे का? असे असेल, तर त्याचा काय परिणाम होणार? युक्रेन अणुबॉम्ब तयार करण्यास सक्षम आहे का? त्याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युक्रेन अणुबॉम्ब तयार करण्यास सक्षम आहे?

युक्रेनियन लष्करी थिंक टँकच्या अभ्यासात असे नमूद आहे की, युक्रेन संभाव्यतः त्यांच्या नऊ ऑपरेशनल पॉवर प्लांटमधून खर्च केलेले अणुइंधन मूलभूत अणू उपकरण तयार करण्यासाठी वापरू शकते. थिंक टँकच्या अहवालात नमूद केले आहे की, युक्रेनकडे उपलब्ध अणुभट्टीतील प्लुटोनियमचे वजन सात टन इतके मोजले जाऊ शकते, जे आण्विक शस्त्रास्त्रांचे मर्यादित शस्त्रागार तयार करण्यासाठी पुरेसे आहे. अहवालाचे लेखक ओलेक्सी यिझाक यांच्या मते, “संपूर्ण रशियन एअरबेस किंवा केंद्रित लष्करी, औद्योगिक किंवा लॉजिस्टिक प्रतिष्ठान नष्ट करण्यासाठी ते पुरेसे असेल.”

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही ब्रुसेल्समधील युरोपियन कौन्सिलमधील अलीकडील भाषणात आण्विक मुद्द्याचा उल्लेख केला होता. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : एलॉन मस्क मंगळावर पोहोचवणार इंटरनेट सेवा? कारण काय? त्याचा फायदा कोणाला?

हे स्पष्ट असूनही, अनेक अधिकाऱ्यांनी आण्विक कार्यक्रम पुढे जाण्याबाबतची शक्यता कमी केली आहे. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हेओर्ही टिखी यांनी ठामपणे सांगितले, “आमच्याकडे अण्वस्त्रे विकसित नाहीत किंवा ती मिळवण्याचा विचारही नाही.” त्यांनी असेही सांगितले की, युक्रेन आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA)बरोबर पारदर्शकता राखत आहे. ही एजन्सी अण्वस्त्र सामग्रीच्या कोणत्याही लष्करी अनुप्रयोगास प्रतिबंधित करते.

युक्रेनचा इतिहास काय सांगतो?

युक्रेनजवळ एकेकाळी शक्तिशाली आण्विक शस्त्रे होती. ११९१ मध्ये ‘यूएसएसआर’च्या पतनानंतर अंदाजे १,७०० आण्विक वॉरहेड्सचा वारसा युक्रेनला मिळाला आणि त्या वेळी हा देश जगातील तिसरी सर्वांत मोठी आण्विक शक्ती ठरला. त्यांच्या शस्त्रागारात 130 UR-100N इंटरकॉंटिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, प्रत्येकी सहा वॉरहेड्स, 46 RT-23 Molodets ICBM-प्रत्येकी १० वॉरहेड्स व ३३ बॉम्बर्स समाविष्ट होते. परंतु, ही शस्त्रे रशियन ऑपरेशनल नियंत्रणाखाली होती. १९९४ मध्ये युक्रेनने बुडापेस्ट करारांतर्गत रशियाला आपले आण्विक शस्त्रागार सोडण्यास सहमती दर्शविली. हा करार म्हणजे एक सुरक्षा व्यवस्था होती; ज्यामध्ये अमेरिका, ब्रिटन व रशियाने अप्रसाराच्या वचनबद्धतेच्या बदल्यात युक्रेनचे सार्वभौमत्व आणि सीमा टिकवून ठेवण्याचे वचन दिले होते. हा करार तेव्हापासून एक वादग्रस्त मुद्दा राहिला आहे. विशेषत: रशियाने २०१४ आणि २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण करून त्यांच्यामधील अटींचे उल्लंघन केल्यामुळे युक्रेनने आपली आण्विक क्षमता पुनर्संचयित करण्याचा विचार करावा की नाही, यावर पुन्हा वादविवाद सुरू झाले आहेत.

झेलेन्स्की यांचे आण्विक शस्त्राविषयीचे मत

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही ब्रुसेल्समधील युरोपियन कौन्सिलमधील अलीकडील भाषणात आण्विक मुद्द्याचा उल्लेख केला आणि असे सुचवले की, युक्रेनची सुरक्षा नाटोचे सदस्यत्व किंवा आण्विक क्षमतेवर अवलंबून असेल. झेलेन्स्की यांनी असे म्हटले आहे की, नाटो सदस्यत्व हा युक्रेनच्या पसंतीचा मार्ग आहे. रशियात झालेल्या ताज्या आक्रमणापूर्वी २०२१ मध्ये जर्मनीतील युक्रेनचे माजी राजदूत आंद्री मेल्निक यांनी भाष्य केले होते की, युक्रेनच्या संरक्षणाची हमी केवळ नाटोमध्ये सामील होऊन किंवा अण्वस्त्र क्षमतेत सामील होऊन दिली जाऊ शकते. ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील नवीन प्रशासनाच्या अंतर्गत अमेरिकेने लष्करी समर्थनाचा विचार करण्यास सुरुवात केले आहे, त्यामुळे अमेरिकेवर कितपत अवलंबून राहावे, हा प्रश्नही झेलेन्स्की यांच्यासमोर आहे.

हेही वाचा : भारतीय विद्यार्थ्यांना नोकरी देणार ऑस्ट्रेलिया; काय आहे ‘MATES’ योजना? याचा लाभ कसा घेता येणार?

युक्रेनला आण्विक सक्षम करणे कितपत व्यावहारिक?

युक्रेनला आण्विक सक्षम करण्याबाबत तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. अनेकांनी याबाबतच्या महत्त्वपूर्ण आव्हानांविषयी सांगितले आहे. या युद्धात अणुबॉम्बचा वापर झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल. युक्रेनमध्ये युरेनियम संवर्धन आणि इंधन उत्पादन सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे २०२२ च्या आक्रमणापर्यंत इंधननिर्मितीसाठी हा देश रशियावर अवलंबून होता. सेंटर फॉर आर्मी, कन्व्हर्जन व नि:शस्त्रीकरण अभ्यासाचे संचालक व्हॅलेंटीन बद्रक युक्रेनसमोरील अस्तित्वात्मक दबाव व्यक्त करत म्हणाले, “जर रशियन लोकांनी युक्रेनवर ताबा मिळवला, तर लाखो युक्रेनियन मारले जातील. आपल्यापैकी असे लाखो आहेत, जे त्यांच्या ताब्यात जाण्यापेक्षा मृत्यूला सामोरे जाणे पसंत करतात.” हे युद्धाचे तिसरे वर्ष आहे. रशियन सैन्याने युक्रेनियन पायाभूत सुविधांवर मोठ्या क्षेपणास्त्र आक्रमणाची तयारी केली आहे. काही व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये उत्तर कोरियाचे सैन्य रशियामध्ये प्रशिक्षण घेत असल्याचे दिसून आले आहे.