अमोल परांजपे

रशियाने हल्ला केल्यापासून युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की अमेरिकेकडे एफ-१६ या अद्ययावत लढाऊ विमानांची मागणी करीत आहेत. एवढे दिवस नकारघंटा वाजविणारे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी आपला सूर बदलला असून युक्रेनच्या वैमानिकांना एफ-१६चे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. अमेरिकेच्या या बदललेल्या भूमिकेमुळे युद्धाचे चित्र पालटणार का, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Seven maoists killed in abhujmad encounter
गडचिरोली : अबुझमाडमध्ये जवान व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक;  सात नक्षल्यांना कंठस्नान
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Russias Voronezh radar system
चीनची घुसखोरी रोखण्यासाठी भारताला रशियाची मदत! काय आहे वोरोनेझ रडार प्रणाली?
russia ins tushil
रशियाने भारताला सुपूर्द केली क्षेपणास्त्राने सुसज्ज युद्धनौका; ‘आयएनएस तुशील’ काय आहे? भारतासाठी याचे महत्त्व काय?
Image of Zelensky
Russia Vs Ukraine War : “जोपर्यंत नाटोचे सदस्यत्व…”, झेलेन्स्की यांनी का केली युक्रेनमध्ये परदेशी सैन्य तैनात करण्याची मागणी?
Russia Discovers Ancient Gold Treasure in Crimea — Ukraine Considers It Looting
“ते आमचा वारसा लुटत आहेत,” युक्रेनचा आरोप; रशियाने क्रिमियामध्ये शोधला प्राचीन सोन्याचा खजिना !
Bashar al-Assad And Vladimir Putin.
Syrian Civil War : सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचं विमान खरंच क्रॅश झालं का? असद कुटुंबीयांसाठी पुतीन यांचे मोठे पाऊल
President Bashar al Assad forces defeated in parts of Syria
सीरियावर बंडखोरांचा ताबा… अध्यक्ष बशर अल असद परागंदा… नेमके काय घडले? अमेरिका, रशिया, इराण, तुर्कीयेचा काय संबंध?

युक्रेन हवाईदलाची सध्याची स्थिती काय?

युक्रेनकडे असलेली विमाने आणि हेलिकॉप्टर सोव्हिएत काळातील आहेत. यात मिग-२९ बॉम्बर आणि मालवाहू विमानांचा समावेश आहे. युक्रेनकडे असलेले सगळय़ात ‘नवे’ विमान १९९१ मधील आहे. त्यामुळे रशियाची अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, ड्रोन यांचा मुकाबला करण्यात युक्रेनचे वायूदल कमी पडत आहे. त्यातच युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनच्या हवाई तसेच जमिनीवरील सुरक्षा यंत्रणेचा एकतृतीयांश भाग नष्ट झाल्याचा अंदाज आहे. युक्रेनने १४५ पैकी ६० विमाने आणि १३९ पैकी ३२ हेलिकॉप्टर आतापर्यंत एक तर गमावली आहेत अथवा नादुरुस्त झाली आहेत. ही विमाने रशियन बनावटीची असल्यामुळे दुरुस्तीसाठी सुटय़ा भागांची कमतरता जाणवत आहे.

एफ-१६ विमानाची वैशिष्टय़े काय?

एफ-१६ विमानांमध्ये अद्ययावत रडार यंत्रणा, सेन्सर्स आणि क्षेपणास्त्रे डागण्याची अचूक क्षमता आहे. सिंगल इंजिन असलेले हे विमान झपाटय़ाने हालचाली करण्यासाठी ओळखले जाते. १९९१चे पर्शिया आखाती युद्ध, बाल्कन युद्ध, तसेच अफगाणिस्तान आणि इराकमध्ये या विमानाची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. अमेरिकेच्या वायूदलाने दिलेल्या माहितीनुसार एफ-१६ हे ध्वनीच्या दुप्पट वेगाने उडू शकते आणि ५०० मैल अंतरावरून अचूक लक्ष्यभेद करण्याची त्याची क्षमता आहे. युक्रेनला एफ-१६सारख्या विमानांची गरज असल्याचे पाश्चिमात्य युद्धतज्ज्ञ सातत्याने सांगत आहेत. त्यामुळेच झेलेन्स्की यांनी या विमानासाठी आग्रह धरला आहे.

झेलेन्स्कींकडून एफ-१६ची मागणी का?

युद्धाच्या सुरुवातीच्या काळात रशियाने युक्रेनची जमिनीवरील क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा बंद पाडली असताना मिग-२९, सुखोई सू-२७ या विमानांनी शहरांना सुरक्षा पुरविली. मात्र वर्षभराच्या युद्धात झालेल्या नुकसानामुळे विमानांची संख्या घटल्याचा परिणाम हवाई सुरक्षेवर होत आहे. पोलंड आणि स्लोव्हाकिया या देशांनी अलीकडेच युक्रेनला काही मिग-२९ दिली असली, तरी ती पुरेशी नाहीत, शिवाय ती एफ-१६ इतकी अद्ययावतही नाहीत. युद्धाच्या सुरुवातीला युक्रेनचा प्रदेश जिंकल्यानंतर त्या भागात रशियाने हवाई सुरक्षा कडक केली आहे. मिग, सुखोईसारखी कालबाह्य विमाने ही सुरक्षा भेदण्यास असमर्थ आहेत. युक्रेनची विमाने रशियानियंत्रित युक्रेनच्या हवाई सीमेतही जाऊ शकत नाहीत. आपल्याच प्रदेशातून कमी उंचीवरून क्षेपणास्त्रे डागतात आणि माघारी फिरतात. त्याचा फारसा परिणाम होत नाही. एफ-१६ हाती आल्यास रशियानियंत्रित भागात आगेकूच करणाऱ्या पायदळाला हवेतून सुरक्षा पुरविता येईल, असे युक्रेनचे म्हणणे आहे. युक्रेनमधून गव्हाची निर्यात करणारा सागरी मार्ग रोखून धरणाऱ्या रशियन विमानांना पळवून लावण्यासाठीही एफ-१६ उपयोगी पडू शकतात.

अमेरिकेची सावध भूमिका का?

बायडेन यांच्यापासून अमेरिकेतील तमाम अधिकारी युक्रेनच्या मागणीला कायम स्वच्छ नकारच देत होते. तसेच इतर देशांनीही युक्रेनला एफ-१६ची फेरनिर्यात करण्यास अमेरिकेने मनाई केली होती. युक्रेनला रशियाचे हल्ले परतवून लावण्यासाठी आवश्यक तीच आयुधे दिली जातील, अशी अमेरिकेची भूमिका आहे आणि या निकषात एफ-१६ बसत नसल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. एफ-१६मुळे रशियाची मुख्य भूमी युक्रेनच्या टप्प्यात येईल आणि हे कारण काढून हल्ल्यांची व्याप्ती वाढविण्याची संधी पुतिन यांना मिळेल, याची अमेरिकेला भीती आहे.

अमेरिकेचे धोरण का बदलले?

जपानमधील हिरोशिमामध्ये नुकत्याच झालेल्या जी-७ राष्ट्रगट बैठकीमध्ये अमेरिका युक्रेनच्या वैमानिकांना एफ-१६चे प्रशिक्षण सुरू करणार असल्याचे जाहीर केले. विमाने देण्याबाबत निर्णय झालेला नसला, तरी यामुळे अमेरिकेची भूमिका बदलल्याचे स्पष्ट झाले आहे. युक्रेनच्या वैमानिकांना एफ-१६ सारख्या अद्ययावत विमानाचा सराव होण्यास किती काळ लागेल, याची चाचपणी अमेरिकेने सुरू केली आहे. युक्रेनच्या दोन वैमानिकांना अ‍ॅरिझोनामधील हवाई दलाच्या तळावर नेऊन एफ-१६ची ‘ओळख’ करून देण्यात आली. त्यांनी एफ-१६ ‘सिम्युलेटर’वर सरावही केला. प्रत्यक्ष प्रशिक्षण कुठे होणार, किती वैमानिक सहभागी होणार, हे मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Story img Loader