रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध गेली अडीच वर्षे सुरू आहे. आपल्या युद्धसज्जतेच्या जोरावर युक्रेनवर सहज मात करू, असे रशियाला वाटत होते, मात्र युक्रेन रशियाला जशास तसे प्रत्युत्तर देत आहे. स्वत:चे पारंपरिक नौदल नसतानाही युक्रेनने नावीन्यपूर्ण नौदल तंत्रज्ञानाचा वापर करून रशियाला जेरीस आणले आहे. रशियाच्या ‘ब्लॅक सी फ्लीट’वर हल्ला करण्यासाठी युक्रेनने अत्याधुनिक तंत्रज्ञान व शस्त्रांचा वापर केला. युक्रेनच्या अत्याधुनिक नौदल सज्जतेविषयी…

युक्रेनचे नवे नौदल तंत्रज्ञान काय आहे?

‘ब्लॅक सी फ्लीट’ हा काळा समुद्र, अझोव्ह समुद्र आणि भूमध्य समुद्रातील रशियन नौदलाचा ताफा आहे. युक्रेनवर समुद्री मार्गाने हल्ला करण्यासाठी ‘ब्लॅक सी फ्लीट’ रशियासाठी महत्त्वपूर्ण आहे. मात्र युक्रेनने आधुनिक युद्धसज्जतेच्या आधारावर ‘ब्लॅक सी फ्लीट’ खिळखिळी करण्याचे प्रयत्न केले आहेत. तीन लष्करी नवकल्पनांच्या आधारावर युक्रेनने ‘ब्लॅक सी फ्लीट’वर हल्ले केले आहेत. रशियाच्या ताब्यात असलेल्या क्रिमियाजवळ एका विशेष मोहिमेद्वारे युक्रेनने रशियाची ‘मिसाइल कॉर्वेट इवानोवेट्स’ ही युद्धनौका बुडवली. युक्रेन संरक्षण मंत्रालयाच्या गोपनीय विभागाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर या यशस्वी मोहिमेची माहिती दिली. युक्रेनचे डिजिटल परिवर्तन मंत्रालय आणि युनायटेड २४ प्लॅटफॉर्मच्या सहकार्यामुळे शक्य झाले, असे त्यात म्हटले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण नौदल संकल्पना यांच्या आधारावर युक्रेनला हे यश मिळाले आहे. त्यासाठी त्यांनी तीन लष्करी नवकल्पनांचा आधार घेतला. त्यांचे डावपेच इतके यशस्वी ठरले आहेत की, ‘ब्लॅक सी फ्लीट’ कार्यात्मकरीत्या निष्क्रिय झाले असून त्यांच्या जहाजांना युक्रेनच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी क्रिमियन द्वीपकल्पातून पळून जाण्यास भाग पाडले आहे. ‘मागुरा व्ही ५ सागरी ड्रोन’, ‘नेपच्यून अँटी-शिप मिसाइल’ आणि ‘सी बेबी नेव्हल ड्रोन’ या अत्याधुनिक व लष्करी नवकल्पनांमुळे युक्रेन यशस्वी झाले आहे.

ukraine nuclear bomb
रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलणार? युक्रेनची अणुबॉम्बची तयारी? काय होणार जगावर परिणाम?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
butter theft in russia amid ukrain war
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशियात बटरची चोरी; नेमकं प्रकरण काय?
Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray over bag checking
बँगा तपासल्या तर आगपाखड कशासाठी ? श्रीकांत शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका
ukraine israel war increase carbon emissions
युक्रेन, इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ
Jammu And Kashmir
Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील सैन्याच्या गोळीबारात ट्रेकर्स सापडले; गोळीबार थांबवत सैनिकांनी केली सुटका
sex ministry in russia
‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा

हेही वाचा : व्हेनेझुएलात अध्यक्ष निकोलस मादुरो यांची फेरनिवड वादग्रस्त का ठरली? या निवडणुकीचा आंतरराष्ट्रीय तेलपुरवठ्यावर कोणता गंभीर परिणाम?

‘मागुरा व्ही ५ सागरी ड्रोन’ काय आहे?

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्य गुप्तचर संचालनालयाच्या विशेष विभागाने मार्च महिन्यात क्रिमियाजवळ रशियाच्या ‘सर्गेई कोटोव्ह’ नावाच्या गस्ती जहाजावर हल्ला केला. या जहाजाच्या उजव्या बाजूचे प्रचंड नुकसान झाल्यानंतर या जहाजाने जलसमाधी घेतली. हे जहाज बुडवण्यात महत्त्वाचा वाटा होता, ‘मागुरा व्ही ५ सागरी ड्रोन’चा. हा बहुउद्देशीय मानवरहित जल ड्रोन (चिमुकली युद्धनौकाच जणू) आहे. युक्रेनच्या स्वदेशी बनावटीच्या या ड्रोनची लांबी सुमारे साडेपाच मीटर (१८ फूट) आहे आणि तो ३२० किलोग्रॅम वजन वाहून नेऊ शकतो. ४२ नॉट्स (सुमारे ४८ मैल प्रतितास) या उच्च गतीने मार्गक्रमण करणाऱ्या नौकेलाही लक्ष्य करण्याची क्षमता या युद्धनौकेत आहे. टेहळणी, गस्त, शोध, बचाव आणि आक्रमण अशा प्रत्येक उद्दिष्टांमध्ये तो उपयुक्त ठरला आहे. रशिया-युक्रेन युद्धात अनेक महत्त्वाच्या घटनांमध्ये हा ड्रोन सहभागी असल्याची माहिती पुढे आली आहे. युक्रेनियन गुप्तचरांनी म्हटले आहे की रशियन कॉर्व्हेट इव्हानोवेट्स, सर्गेई कोटोव्ह गस्ती जहाज आणि सीझर कुनिकोव्ह लँडिंग क्राफ्टवर हल्ला करण्यासाठी ‘मागुरा व्ही ५ सागरी ड्रोन’चा वापर करण्यात आला होता. या ड्रोनची माहिती मे महिन्यात उजेडात आली असली तरी या आधीच्या अनेक माेहिमांमध्ये त्याचा सहभाग होता. युक्रेनच्या संरक्षण गुप्तचरांनी म्हटले आहे की. ‘आर ७३’ हे कमी पल्ल्याची हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे वाहून नेण्यासाठी ‘मागुरा व्ही ५ सागरी ड्रोन’चा वापर करण्यात आला.

‘नेपच्यून अँटी-शिप मिसाइल’विषयी…

‘आर-३६० नेपच्यून’ हे युक्रेनची राजधानी किव्हमध्ये विकसित केलेले क्रूझ क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता सुमारे २०० मैल आहे आणि त्याचे वजन सुमारे २००० पौंड आहे. युक्रेनने या क्षेपणास्त्रांचा वापर उच्च-मूल्य लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी आणि अमेरिकेच्या ‘एटीएसीएमएस’ या क्षेपणास्त्राला पर्याय म्हणून केला आहे. अमेरिकानिर्मित ‘एटीएसीएमएस’ या क्षेपणास्त्राचा वापर करण्यास बायडेन प्रशासनाने मर्यादा आणल्याने या नव्या क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला. ‘ब्लॅक सी फ्लीट’मध्ये तैनात असलेल्या मॉस्क्वा या युद्धनौकेला बुडवण्यासाठी हे क्षेपणास्त्र वापरले गेले. या क्षेपणास्त्राच्या सुधारित आवृत्तीचा वापर क्रिमियामध्ये तैनात असलेल्या ‘एस-४००’ या रशियन क्षेपणास्त्रासह रशियाच्या हवाई संरक्षणास निष्प्रभ करण्यासाठीही केला गेला. जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी युक्रनेने नेपच्यून क्षेपणास्त्रात बदल केला. रशियामध्ये अगदी दूरवर तीव्र हल्ले करण्यासाठी युक्रेनने नेपच्यून क्षेपणास्त्रे आणखी विकसित आणि सुधारित करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : विश्लेषण: ‘निर्वासितांचा ऑलिम्पिक संघ’ ही संकल्पना काय आहे?

‘सी बेबी नेव्हल ड्रोन’विषयी…

देशांतर्गत उत्पादित केलेली ‘सी बेबी’ हा युक्रेनचा आणखी एक मानवरहित ड्रोन किंवा छोटी युद्धनौका. जमिनीवरून हवेत मारा करण्याची तिची क्षमता. ‘मागुरा व्ही ५ ड्रोन’पेक्षा या ड्रोनची लांबी किंचित जास्त आहे. जवळपास सहा मीटर लांबी (जवळजवळ २० फूट) असून ४९ नॉट्सपर्यंत (सुमारे ५६ मैल प्रति तास) सर्वोच्च वेगावर मारा करू शकतो. हा ड्रोन ५४० नॉटिकल मैलापर्यंत प्रवास करू शकतो आणि ८५० किलोग्रॅमपर्यंत वजन वाहून नेऊ शकतो. या महिन्याच्या सुरुवातीला युक्रेनच्या सुरक्षा विभागाचे प्रवक्ते आर्टेम देहतियारेन्को यांनी ‘सी बेबी’मध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे, असे युक्रेनच्या माध्यमांना सांगितले होते. गेल्या वर्षी हा ड्रोन क्रिमिया पुलावर आदळल्यानंतर त्याच्यात अधिक सुधारणा करण्यात आली. आता त्याच्या वैशिष्ट्यांमध्ये काही बदल झाला असून तो अधिक शक्तिशाली झाला आहे, असे देहतियारेन्को यांनी सांगितले. वर्षभरापूर्वी ‘सी बेबी नेव्हल ड्रोन’ ८०० किलोग्रॅम स्फोटके सुमारे ८०० किलोमीटर अंतरापर्यंत वाहून नेऊ शकत होता. आता मात्र तो १००० किलोमीटर स्फोटके, १००० किलोमीटरपर्यंत वाहून नेऊ शकतो. त्यामुळे तो काळ्या समुद्रात कोठेही शत्रूच्या जहाजांवर हल्ला करू शकतो. रशियाच्या अनेक युद्धनौकांवर हल्ला करण्याच्या मोहिमांमध्ये ‘सी बेबी’ सहभागी झाला होता. ऑक्टोबरमध्ये पॅव्हेल डेरझाव्हिन आणि ऑगस्टमध्ये ओलेनेगोस्र्की गोर्नियाक या रशियन जहजांवर ‘सी बेबी’ने हल्ला केला होता. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या केर्च ब्रिजला हानी पोहोचवण्याचे श्रेयही ‘सी बेबी’ला देण्यात येते.

sandeep.nalawade@expressindia.com